शासनाच्या शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमात शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे पर्यावरणावर उत्कृष्टपणे कृतिशील सादरीकरण पुणे-- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे आयोजित राज्यस्तरीय" शिकू आनंदे "या उपक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी पर्यावरणावर आधारीत सेंद्रिय परसबाग , कुंडीतील फुलझाडांची लागवड आणि घरच्या घरी रोप कसे तयार करावे याविषयी शनिवारी १० जुलै २०२१ रोजी राज्यातील सहावी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईनपद्धतीने कृतिशील पाठाचे उत्कृष्टपणे सादरीकरण केले.यावेळी राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,शिक्षण सहसंचालक विश्वास पाटील ,शिक्षण उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे ,शिक्षण उपसंचालक विकास गरड ,शिक्षण उपसंचालक कमलादेवी आवटे ,शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे ,SCERT चे बाळकृष्ण वाटेकर व...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ