शासनाच्या शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमात शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे पर्यावरणावर उत्कृष्टपणे कृतिशील सादरीकरण
पुणे-- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे आयोजित राज्यस्तरीय" शिकू आनंदे "या उपक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी पर्यावरणावर आधारीत सेंद्रिय परसबाग , कुंडीतील फुलझाडांची लागवड आणि घरच्या घरी रोप कसे तयार करावे याविषयी शनिवारी १० जुलै २०२१ रोजी राज्यातील सहावी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईनपद्धतीने कृतिशील पाठाचे उत्कृष्टपणे सादरीकरण केले.यावेळी राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,शिक्षण सहसंचालक विश्वास पाटील ,शिक्षण उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे ,शिक्षण उपसंचालक विकास गरड ,शिक्षण उपसंचालक कमलादेवी आवटे ,शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे ,SCERT चे बाळकृष्ण वाटेकर व सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थिती होते.
मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेद पुणे मार्फत ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहे. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्तआहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वी. च्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने *“शिकू आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम३ जुलै २०२१ पासून सुरू करण्यात आला आहे. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमात सेंद्रीय परसबाग व कुंडीतील लागवड या विषयाबाबत अहमदनगर जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी राज्यातील इयत्ता सहावी ते आठवी मधील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळ सेंद्रिय परसबाग कशी तयार करावी ?
कुंडीतील फुलझाडांची लागवड कशी करावी ?घरच्या घरी रोप कसे तयार करावे ? या विषयावर कृतिशील पाठ घेऊन उत्कृष्ट पणे सादरीकरण केले आणि इयता पहिली ते पाचवी साठी बीड जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक सोमनाथ वाळके यांनी परसबाग व कुंडी कशी भरावी याविषयी कृतिशील पाठ घेऊन उत्कृष्ट पणे सादरीकरण केले. सकाळी ९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी व सकाळी १० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कृती घेण्यात आल्या.
या उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील रोहिणी बागुल ,सांगली जिल्ह्यातील तारिष आत्तार ,अकोला जिल्ह्यातील निलेश झाडे , मुकुल देशपांडे यांनीही विविध विषयांवर सादरीकरण केले.
या आनंददायी उपक्रमाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ व ज्योती बेलवले यांनी अतिशय उत्कृष्टपणे सूत्रसंचालन केले.या उपक्रमात राज्यातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे कृतिशील सहभाग घेतला.या उपक्रमाबद्दल पालकांनी अभिनंदन केले आहे.
-
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा