श्रवण ,भाषण , वाचन , लेखन हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची कौशल्य आहेत .त्यातील वाचन हे कौशल्य अतिशय महत्त्वाचे आहे . 'वाचाल तर वाचाल 'असे आपण वेळोवेळी ऐकले आहे . आज सोशल मिडियामुळे वाचनसंस्कृती कमी होताना दिसते . आपल्या जीवनात वाचन किती महत्त्वाचे आहे हे समजले पाहिजे. वाचनाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते .वाचनातून उत्कृष्ट लेखक तयार होतात .मोठेपणी केलेल्या वाचनाने विद्वत्ता येत असेल तर लहानपणी केलेल्या वाचनाने बालवाचकांच्या मनावर चांगले संस्कार होतात .उदा- श्यामची आई या कादंबरीमधील आई श्यामवर जेव्हा एक एक संस्कार करते तेव्हा श्यामची आई वाचणार्या छोट्या मुलांवरही ते संस्कार होत असतात . वाचनाने माणूस बहुश्रुत होतो .ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी आपल्याला वाचनाने मिळतात . वाचनाच्या छंदातून साऱ्या विश्वाची ओळख होत असते. वाचन केल्यामुळे आपल्याला आपले विचार उत्कृष्टपणे मांडता येतात .'ग्रंथ हे गुरु आहेत 'असे आपण म्हणतो . वाचनातून आपल्या जीवनाची योग्य जडणघडण होत असते .जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्याला चांगले लिहिता येते. पुस्तके ही काळाच्या विशाल स...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ