अहमदनगर(प्रतिनिधी):-
अॅक्टिव्ह टिचर्स महाराष्ट्र व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील दहा जिल्ह्य़ातील सुमारे एक हजार शिक्षकांना मोरोक्को देशातून आयुष मिनिस्ट्री आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका रचनाताई सदाफुले /फासाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ऑनलाईन योग प्राणायामचे धडे देण्यात आले. ६ जून ते १० जूनपर्यंत पाच दिवस मोफत ऑनलाईन योग शिबिराचे मोरोक्को देशातील योग शिक्षिका रचनाताई फासाटे , कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM )चे राज्य संयोजक विक्रम अडसूळ ,ज्योती बेलवले ,नारायण मंगलारम ,तुकाराम अडसूळ यांनी पुढाकार घेऊन आयोजन केले होते. या शिबिराचा समारोप गुरुवार दि. १० जून रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत योग साधनेने झाला.
या शिबिरात सहभागी झालेल्या शिक्षकांना पूरक व्यायामाबरोबरच विविध प्रकारची आसने शिकविण्यात आली. त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे प्राणायामांचे प्रकारदेखील सादर करण्यात आलेत. योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे. नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते. शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होते. वजन कमी असल्यास वाढण्यासदेखील मदत होते. त्याचप्रमाणे शरीर व मनावर नियंत्रण करणे शक्य होते. हे शिबिर सकाळी व सायंकाळी अशा विविध वेळात ऑनलाईन सुरू होते. शिबिरात नाशिक, पुणे, ठाणे, चंद्रपूर, कोल्हापूर, मुंबई, परभणी, बुलढाणा, बीड व औरंगाबाद जिल्ह्य़ातील सुमारे एक हजार शिक्षकांनी उस्फूर्तपणे कृतिशील सहभाग घेतला होता.
वाढत्या वयातील विविध शारीरिक व्याधींवरही मात करणे योगामुळे शक्य होते.
सदर योग शिबीर यशस्विततेसाठी आर्ट आॕफ लिविंगच्या रचनाताई फासाटे व त्यांची पूर्ण योग शिक्षक टीम दहा जिल्ह्यांत योग प्रणायामची उत्कृष्ट सेवा देत होती. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात सिनीयर आर्ट आॕफ लिविंग टीचर श्री विजयजी हाके व कृतिशील शिक्षक महाराष्ट्रचे राज्य संयोजक श्री विक्रम अडसूळ यांचे बहुमोल मार्गदर्शन शिक्षकांना लाभले.कार्यक्रम यशस्वीततेसाठी योग शिक्षिका रचनाताई फासाटे , राज्य संयोजक विक्रम अडसूळ , ज्योती बेलवले,नारायण मंगलारम, तुकाराम अडसूळ ,उमेश कोटलवार,ज्ञानदेव नवसरे यानी परिश्रम घेतले.शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचे नाशिकचे गजानन उदार यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.या दहा जिल्ह्यात नाशिक-गजानन उदार ,कोल्हापूर -संजय जगताप ,बीड-जया इगे ,औरंगाबाद-संजय खाडे ,ठाणे -भरत चव्हाण ,प्रेरणा शेलवले ,मुंबई -वृषाली पिंपळे ,पुणे-पल्लवी गायकवाड ,चंद्रपूर-राजश्री वसाके ,बुलढाणा-जीवन जाधव ,परभणी -योगेश ढवारे यांनी समन्वयक म्हणून काम केले.या शिबिराचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल या दहा जिल्ह्यातील शिक्षकांनी विक्रम अडसूळ ,रचनाताई फासाटे ,ज्योती बेलवले ,नारायण मंगलारम ,तुकाराम अडसूळ ,ज्ञानदेव नवसरे ,उमेश कोटलवार यांचे विशेष अभिनंदन केले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा