मला भावलेले मराठी कवी , लेखक - साने गुरुजी महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाने महान ठरलेल्या अनेकांचे जीवनचरित्र आपणास पहावयास मिळतात. त्यांपैकी एक महान मराठी कवी , लेखक , आदर्श शिक्षक , समाजसुधारक , समाजसेवक , देशभक्त , स्वातंत्र्यसैनिक म्हणून सानेगुरुजी यांचे नाव आवर्जून घेतले जाते . `खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे` हा परमपुज्य साने गुरुजींनी आपल्या कवितेतून जगाला दिलेला अनमोल संदेश आहे . आज संपूर्ण जगाला कशाची गरज आहे याचा विचार आपण केला तर सानेगुरुजींच्या विचारांची खूप गरज आहे . साने गुरुजींनी दिलेला संदेश जेव्हा जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजेल तेव्हा हे जग खऱ्या अर्थाने सुंदर व सुरक्षित असेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने . परंतु त्यांची ओळख आपल्याला साने गुरुजी या नावाने परिचित आहे . त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला . तेथेच त्यांचे बालपण गेले . महात्मा गांधींपासून त्यांनी प्रेरणा घेतली व आपले सर्व जीवन देशसेवेसाठी अर्पण केले . ...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ