विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे अध्यापन करताना प्रत्यक्ष कृतीद्वारे अध्यापन व प्रयोग करणे महत्वाचे असते .त्यामुळे त्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो.मी विज्ञान विषयाचे अध्यापन करताना विविध घटकांवर अनेक लहान लहान व सोपे प्रयोग केले .त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण मिळाले.त्यांची निरीक्षण ,अनुमान शक्ती वाढीस लागली. परिसर अभ्यास मधील पिण्याचे पाणी हा घटक शिकविताना काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही हे प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून देताना काचेच्या काही बाटल्या घेतल्या .त्या प्रत्येक बाटलीत पाणी टाकले.एका बाटलीत साखर ,दुसऱ्या बाटलीत मीठ ,धुण्याचा सोडा टाकला तर काही बाटलीत वाळू ,लाकडाचा भुसा टाकला .साखर ,मीठ ,धुण्याचा सोडा हे पाण्यात विरघळले तर वाळू ,लाकडाचा भुसा हे पाण्यात विरघळले नाही.यावरून विद्यार्थ्यांना कोणते पदार्थ पाण्यात विरघळतात व कोणते विरघळत नाही हे कृतीद्वारे समजले. काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू पाण्यात तरंगत नाहीत.हे प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून देण्यासाठी एका काचेच्या भांड्यात पाणी घेतले.त्यात खोडरबर ...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ