झाडांचे महत्व--
🌴भविष्यात आपल्याला चांगली शेती करायची असेल तर यावर्षी शेतात किमान २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे आपल्याला शेती करणे अवघड होईल.
🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.
🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.
🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2अंशाने कमी करते.
🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.
🌳एका झाडापासून कुटूंबासाठीअनमोल असे लाकडी सामान तयार होते.
🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत भक्कम आधार देण्याचे कार्य करते ,म्हणजे झाड आहे तर आपण आहे.
🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते आणि जमिनीची धूप थांबविते.
🌳एक झाड फळ,फुल,बिया ,सावली ,औषध आपल्या सर्वांसाठी देते.
एक झाड 50 वर्षांत काय करते आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करून कृती करेल.
🌳आता नाही तर कधीच नाही.याचा विचार करणे आवश्यक आहे.
🌳आपली भावी पिढी पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.
🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
🌳 असं कुठलं स्त्रोत्र आपल्याकडे आहे का ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.
🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र महत्व आपल्याला का समजत नाही.
🌳मित्रांनो आपण प्रत्येकाने दरवर्षी किमान पाच झाडे लावून जगवू आणि आपल्या सर्वांचे व सर्व सजीवांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योगदान देऊ या --जनहितार्थ प्रसिद्ध
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा