मुख्य सामग्रीवर वगळा

SQAAf

*शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि* *आश्वासन* 
 *आराखडा( SQAAF)* 
🌷🌷🌷🌷🌷🌷
 *शाम माने*  *अपडेट* 
SQAAF राज्य मार्गदर्शक 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*माझ्या मुख्याध्यापक मित्रांनो....*
*सध्या आपल्याला SQAAF च्या साईट वर संबंधित मानकांचे फोटो अपलोड करायचे काम करायचे आहे. हे काम कसे करावे याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आहे*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*`1️⃣ शाळेचे खाते कसे तयार करायचे?`*
*`उत्तर`*
*1) scert-data.web.app या लिंक ला क्लिक करा*

*2) आता तुमच्यासमोर SQAAF चा इंटरफेस येईल. यात..*
*अ) खाते तयार करा*
*ब) लॉगिन*
*क) पासवर्ड बदला* 
*हे तीन विंडो दिसतील*

*3) "खाते तयार करा" या विंडो ला क्लिक करा* 
*यात तुम्हाला पुढील विंडो दिसतील...*
*अ) येथे ईमेल प्रविष्ठ करा - यात शाळेचा किंवा मुख्याध्यापकांचा ईमेल टाईप करावा*
*ब) या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड  लिहा- यात तुमचा पासवर्ड तयार करा*
(पासवर्ड कमीत कमी 8 अक्षरी असावा 1 कॅपिटल, 1 स्मॉल, 1 स्पेशल कॅरेक्टर,1 अंक सर्व मिळून 8)
*क) बनवलेल्या पासवर्ड ची पुष्टी/खात्री करा - यात तुम्ही जो पासवर्ड तयार केला आहे तोच पुन्हा प्रविष्ठ करा*

*4) आता खाते तयार करा या विंडो ला क्लिक करा*
*5) आता  तुम्ही जो ईमेल एंटर केला होता त्या gmail वर जा.तुम्हाला SQAAF कडून शाळा व्हेरिफाय करण्यासाठी एक मेल येईल. त्यावर क्लिक करा व तुमची शाळा व्हेरिफाय करा*

*6) आता पुन्हा scert-data.web.app या लिंक ला क्लिक करा*

*7) आता तुमच्या स्क्रीन वर जो इंटरफेस येईल त्यातील लॉगिन या विंडो ला क्लिक करा*

*8)आता तुम्हाला 2 विंडो दिसतील*
*अ) येथे ईमेल प्रविष्ठ करा -*
*आता जो ईमेल तुम्ही अगोदर प्रविष्ठ केला होता तोच ईमेल या विंडो मध्ये टाईप करा*
*ब) या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड लिहा -*
*यात तुम्ही जो पासवर्ड तयार केला आहे तो टाईप करा*
*क) लॉगिन - आता लॉगिन वर क्लिक करा*

*9) आता तुम्ही तुमच्या शाळेच्या SQAAF च्या साईट वर आला आहात*
*10) तुम्हाला एकूण 128 मानके दिसत आहेत. त्यापैकी   काही मानके तुमच्या शाळेला लागू नाहीत. शिवाय प्रत्येक मानकाला क्लिक केल्यावर मुख्य मानकामध्ये आणखी काही उपमानके आहेत*

*`2️⃣ किती मानके भरावीत?`*
*उत्तर - सर्वप्रथम आपल्या शाळेला किती मानके भरायची आहेत व किती लागू नाहीत हे पहा. लागू नसलेली मानके भरायची नाहीत*
*`3️⃣ SQAAF म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांचे टीम वर्क`*
*उत्तर - SQAAF हे शाळेतील सर्व शिक्षकांनी एकत्रित करायचे टीम वर्क आहे. त्यामुळे लागू नसलेली मानके वगळून जेवढी मानके येतात त्यांना आपल्या शाळेतील एकूण शिक्षक संख्येने भाग द्या व जे उत्तर येईल तेवढी मानके प्रत्येक शिक्षकांनी भरावीत त्यामुळे काम सोपे व एकदम लवकर होईल*

*उदा● 128 मानकांपैकी 14 मानके तुम्हाला भरायची नाहीत म्हणजे 128-14=114 मानके भरायची आहेत. तुमच्या शाळेत 20 शिक्षक आहेत असे गृहीत धरू. म्हणजे 114÷20=5.7म्हणजे 14 शिक्षकांना 6 मानके भरायची आहेत व उरलेल्या 6 शिक्षकांना 5 मानके भरायची आहेत.*
*4️⃣ मानकांच्या डॉक्युमेंट्स pdf कशी तयार करावी?*
*`उत्तर`*
*1) दिलेल्या 128 मानकांना क्लिक केल्यावर तुम्हाला त्यात पुन्हा 3 ते 6 उप मानके दिसतील.*
*2) त्या त्या उप मानकात जे वर्णन दिले आहे त्या वर्णनाशी संबंधित फोटो/डॉक्युमेंट यांची pdf कॉपी तयार करावी*
*`उदा•`*
1) तुम्ही मानक क्रमांक 1 या विंडो ला ओपन केले त्यात तुम्हाला 4 उप मानके दिसत आहेत. त्यात उप मानक क्र -1 शी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत.
2) उप मानक क्र-2 शी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत
3) उप मानक क्र-3 शी संबंधित जे डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत
*या प्रमाणे ज्या ज्या उप मानकांचे जे जे डॉक्युमेंट तयार होऊ शकतात त्या प्रत्येक उप मानकांचे डॉक्युमेंट तयार करून घ्यावेत*
*3) प्रत्येक उप मानकाच्या डॉक्युमेंट्स ची एकच pdf फाईल बनवावी*
*5️⃣ गुगल ड्राईव्ह ला SQAAF चे फोल्डर बनवणे व pdf फाईल अपलोड करणे-*
*`उत्तर-`*
*1) ज्या ज्या शिक्षकांकडे जेवढी मानके बनवण्याचे निर्धारित झाले आहे त्या त्या शिक्षकांनी आपापल्या गुगल ड्राईव्ह वर SQAAF नावाचे एक मुख्य फोल्डर बनवावे*
*2) त्या मुख्य फोल्डर च्या आत तुम्हाला ज्या ज्या क्रमांकाच्या मानकाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्या प्रत्येक मानकाच्या क्रमांकाचे पुन्हा एक मुख्य फोल्डर बनवून घ्या*
*3) प्रत्येक मानकाच्या फोल्डर च्या आत असलेल्या प्रत्येक उप मानाकाची वेगवेगळी माहिती देणाऱ्या डॉक्युमेंट्स ची एक वेगळी वेगवेगळी pdf फाईल बनवायची आहे*
*उदा०*
*मानक क्रमांक 1 मध्ये 4 उप मानके आहेत तर प्रत्येक उप मानकांची माहिती देणारी फोटो व इतर घटकांची एकत्रित pdf फाईल बनवावी*
*उदा०*
*मानक क्र -1 मध्ये 4 उप मानके आहेत तर....*
*अ) मानक क्र - 1 हा मुख्य फोल्डर तयार होईल*
*ब) या मानक क्र - 1 च्या फोल्डर च्या आत चारही उप मानकांची माहिती देणाऱ्या pdf फाईल असतील*
*क) त्या प्रत्येक pdf फाईल ला...*
मानक 1-1
मानक 1-2
मानक 1-3
मानक 1-4 
*अशी नावे द्यावीत व त्या त्या  फाईल ची लिंक त्या त्या उप मानकाला क्लिक करून लिंक कॉपी करा व  मगचSQAAF च्या प्रत्येक उप मानाकाला क्लिक करून त्या त्या उप मानकाच्या संबंधित ड्राईव्ह च्या विंडो मध्ये पेस्ट करायची आहे व सबमिट बटण क्लिक करायचे आहे*

*6️⃣ अपलोड केलेल्या प्रत्येक मानकांच्या उप फोल्डर च्या pdf फाईल ला "anyone with the लिंक" हा access देणे -*
*1) तुम्ही प्रत्येक मानकांची जी pdf फाईल तुमच्या SQAAF फोल्डर मध्ये अपलोड केली आहे त्या PDF फाईल च्या उजव्या बाजूला जे तीन बिंदू आहेत त्याला क्लिक करा*
*2) त्यात 2 नंबर चा पर्याय manage access ला क्लिक करा*
*3) आता तुम्हाला 2 नंबरचे  Restricted हे असा विंडो दिसेल त्यावर क्लिक करा*
*4) पुन्हा Restricted असा विंडो दिसेल. त्यावर क्लिक करा*
*5) आता Anyone With the link यावर क्लिक करा व अपडेट झाल्यावर ड्राईव्ह च्या बाहेर या*

*7️⃣ प्रत्येक मानाकाच्या फाईल ची गुगल ड्राईव्ह लिंक बनवणे -*
*SQAAF या मुख्य फोल्डर च्या आत तुम्ही प्रत्येक   मानकांच्या ज्या pdf फाईल अपलोड केल्या आहेत त्या प्रत्येक pdf फाईल ची लिंक बनवायची आहे*
*1) pdf फाईल च्या उजव्या बाजूला जे 3 बिंदू दिले आहेत त्याला क्लिक करा.*
*2) आता तुम्हाला 4 थ्या क्रमांकावर copy link चा पर्याय दिसेल. त्यावर फक्त क्लिक करा. त्या मानकाच्या pdf फाईल ची लिंक आपोआपच कॉपी होईल.*
*3) आता ती लिंक त्या त्या मानकाचा नंबर देवून तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअप अकाऊंट वर कॉपी करून पेस्ट करा*
*4) अशा रीतीने प्रत्येक शिक्षकाने त्यांना जेवढ्या मानकांचे काम करायचे आहे तेवढ्या मानकांच्या लिंक तयार करून घ्या*

*8️⃣ SQAAF च्या साईट वर त्या त्या मानकांचा विंडो ओपन करून त्या त्या मानकाच्या गुगल ड्राईव्ह ची लिंक भरणे व माहिती सबमिट करणे*
*1) SQAAF ची साईट ओपन करा*
*2) तुम्हाला ज्या मानकाची गुगल ड्राईव्ह ची लिंक भरायची आहे ते मानक ओपन करा*
*3) आता त्या मुख्य मानकातील प्रत्येक उपमानकाची गुगल ड्राईव्ह ची लिंक जी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप वर पेस्ट करून ठेवली आहे ती पुन्हा कॉपी करा. जर अगोदरच तुम्हाला कोणत्या उप मानकाची लिंक भरायची आहे हे तुमचे निश्चित झाले असेल तर अगोदरच त्या मुख्य मानकाच्या उप मानकाची लिंक कॉपी करून SQAAF ड्राईव्ह ओपन करा*

*4) आता जे मानक तुम्ही ओपन केले आहे त्यातील ज्या उप मांकाची लिंक तुम्हाला भरायची आहे त्या उप मान कावर क्लिक करा. ताबडतोब ते उप मानक आकाशी रंगाचे होईल*

*5) आता सर्वात खाली  "पुरावे" या विंडो वर या.*

*6) "उपरोक्त विषयांचे समर्थन करणारी....." असे वाक्य ज्या विंडो मध्ये लिहिले आहे त्या विंडो वर क्षणभर बोट दाबून धरा*
*तुम्हाला paste असा शब्द दिसला की त्यावर क्लिक करा व तुम्ही उप मानकाची जी लिंक कॉपी केली होती ती पेस्ट करा*
*7) ताबडतोब तुम्हाला सबमिट हे बटण हाय लाईट झालेले दिसेल त्यावर क्लिक करा व माहिती सबमिट करा*
*8) अशा रीतीने सर्व मुख्य मानकांच्या उप मानकांची लिंक भरा व सबमिट करा व SQAAF चे काम पूर्ण करा*
🙏🙏🙏🙏
आपल्या सेवेसाठी तत्पर
🙏🙏🙏🙏🙏
 *शाम माने* 
 *SQAAF राज्य मार्गदर्शक* 
9325791593
9637697260

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या वतीने सन्मानपत्र

नवनीत एज्युकेशन  लिमिटेड मुंबई ही संस्था महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी व शिक्षकांसाठी नेहमी कार्य करते. विद्यार्थ्यांना  विविध शैक्षणिक बाबतीत ज्ञान मिळावे त्यासाठी  विविध मार्गदर्शक पुस्तिका तयार करते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 108 शिक्षकांना राज्य पुरस्कार प्रदान केला. राज्यातील या सर्व पुरस्कार्थी शिक्षकांना नवनीत लिमिटेडच्या वतीने आज सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे, आज  आमच्या गीतेवाडी येथे मला नवनीत एज्युकेशन लिमिटेड मुंबईच्या वतीने विशेष सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना नवनीतचे प्रतिनिधी मा.औटी साहेब ,गीतेवाडी सरपंच मा.भाऊसाहेब पोटे,उपसरपंच राजेंद्र गीते ,धारवाडीचे सरपंच बापूसाहेब गोरे ,अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे पत्रकार आंबादास गोरे साहेब ,गीतेवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष महादेव गीते ,नवनीतचे  लिमिटेडचे होळकर साहेब .  आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏