✨ *प्रस्तावना* ✨
आजच्या काळामध्ये जेवढ्या आधुनिक सुविधा वाढत चाललेल्या आहेत तेवढ्याच प्रमाणात आरोग्याच्या समस्या ही वृद्धिंगत होत चाललेल्या दिसून येत आहेत. संपूर्ण जगावर जेव्हा कोरोनाचे संकट आले त्या वेळेला आरोग्य,स्वच्छता हा विषय किती महत्त्वाचा आहे याची जाणीव सर्वांना होऊ लागली. वैयक्तिक स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता यांचा परिणाम थेट आपल्या आरोग्याशी जोडलेला असतो. भारताचे नागरिक म्हणून त्या व्यक्तीचे आरोग्य व्यवस्थित असेल तरच भारताचे भविष्यही उज्वल बनण्यास तो तेवढ्याच पद्धतीने आपला सहभाग नोंदवू शकतो याकरिता वैयक्तिक स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता हे विषय अभ्यासक्रमामध्ये असणे खूप गरजेचे वाटते.
✨ *वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व व गरज*✨
स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या चांगल्या जीवनमानासाठी महत्त्वाची आहे. जर प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने स्वच्छता राखण्यास प्राधान्य दिले, तर एक निरोगी आणि सुंदर समाजाची निर्मिती होईल.
आजारी पडण्यापासून बचाव – स्वच्छता राखल्यास जंतूंपासून बचाव होतो.
चांगले आरोग्य – स्वच्छता राखल्याने शरीर निरोगी राहते.
आत्मविश्वास वाढतो – स्वच्छ व नीटनेटके राहिल्यास लोक आपल्याबद्दल चांगले मत ठेवतात.
चांगल्या सवयी लागतात – लहानपणापासून स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावल्यास त्याचा उपयोग आयुष्यभर होतो.
स्वच्छता राखण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी
१. शरीराची स्वच्छता
रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी अंघोळ करावी.
केस स्वच्छ धुवावेत आणि नियमित विंचरावेत.
नखे वेळच्या वेळी कापावीत व स्वच्छ ठेवावीत.
हात पाय स्वच्छ धुवावेत, विशेषतः बाहेरून आल्यावर आणि जेवणाच्या आधी व नंतर.
२. दात आणि तोंडाची स्वच्छता
दररोज दोन वेळा (सकाळी व झोपण्यापूर्वी) दात घासावेत.
तोंड नीट धुवावे आणि जीभ स्वच्छ करावी.
३. स्वच्छ कपडे
रोज स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालावेत.
घामाच्या दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी कपडे दररोज बदलावेत.
मळलेले कपडे स्वच्छ धुवावेत.
४. हात व पायांची स्वच्छता
नखांखाली जंतू तयार होतात, त्यामुळे नखे वेळच्या वेळी कापावीत.
घरात किंवा बाहेरून आल्यावर हात-पाय धुवावेत.
शौचालय वापरल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
५. आहार व स्वच्छता
नेहमी स्वच्छ व पौष्टिक अन्न खावे.
उघड्यावरचे आणि अस्वच्छ अन्न टाळावे.
पाणी उकळून प्यावे किंवा स्वच्छ गाळलेले पाणी प्यावे.
६. आजूबाजूच्या स्वच्छतेची काळजी
आपले घर, वर्गखोली आणि खेळण्याची जागा स्वच्छ ठेवावी.
कचरा कचरापेटीत टाकावा.
शौचालय स्वच्छ ठेवावे आणि नीट वापरावे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये किंवा घाण करू नये.
✨ *उद्धीष्टे* ✨
*वैयक्तिक स्वच्छतेची उद्दिष्टे*
शरीर, वस्त्र आणि राहत्या ठिकाणाची स्वच्छता राखणे
हात धुण्याची सवय लावणे (विशेषतः अन्न ग्रहण करण्याआधी आणि स्वयंपाक करण्याआधी)
नियमित आंघोळ करून आरोग्याची काळजी घेणे
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, घाण टाकणे टाळणे
घराच्या आत आणि आजूबाजूच्या परिसराची नियमित स्वच्छता राखणे
ओला व सुका कचरा वेगळा करून योग्य प्रकारे टाकणे
शौचालयांची योग्य स्वच्छता आणि वापर सुनिश्चित करणे
प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबणे
सार्वजनिक स्वच्छता मोहीमेत सहभागी होणे.
पाणी, हवा आणि मातीचे प्रदूषण कमी करणे
नद्यांचे आणि तलावांचे स्वच्छता अभियान राबवणे
पुनर्वापर आणि पुनर्नवीनीकरण (Recycling) वाढवणे.
* *✨कार्यवाही*✨
इयत्ता तिसरी ते पाचवीचा गट या गटामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण स्वच्छतेची आवड व रुजवणूक करू शकतो.
✨ *उपक्रमांची यादी* ✨
स्वच्छता शपथ
स्वच्छ मी सुंदर मी
आरसा माझा दोस्त
स्वच्छता दूत
प्लास्टिक मुक्त शाळा
स्वच्छता सप्ताह साजरा करणे
नाट्यकरणातून स्वच्छतेचे महत्व
वक्तृत्व स्पर्धा
चित्रकला स्पर्धा
कथाकथन
जाहिराती मधून प्रबोधन
कचरा व्यवस्थापन
पारितोषिक वितरण
स्वच्छता मोहीम राबवणे
अशा विविध उपक्रमातून स्वच्छता हे मूल्य रुजवणूक करून
वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता उद्दिष्टे साध्य करता येतील.
प्रिया राहुल सुरवसे
जिल्हा परिषद शाळा बेलाटी. उत्तर सोलापूर.
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा