दळणवळणाची साधने बदलली
जग अतिशय गतिमान झाले.
प्रत्येकाला आपला प्रवास जलद व्हावा असे वाटू लागले.
या गतिमान जगात पूर्वी दळवणासाठी वापरत असलेली बैलगाडी दुर्मिळ होत आहे.
बैलगाडीतून प्रवास करण्याचा आनंद वेगळाच असतो.
आमच्या शाळेतील मुलांना रानातून शाळेत येण्यासाठी त्यांच्या घरातील माणसे कधी कधी बैलगाडी आणतात.
यामध्ये मुलांना प्रवास करताना वेगळा आनंद मिळतो.
हा आनंद आपण लहान असताना घेतला.
म्हणून हे दृश्य पाहिल्यावर बालपणीचा काळ आठवतो.
प्रत्येकाच्या बालपणी ज्या बाबी होत्या त्या आज पाहायला मिळत नाही.
परंतु या गतिमान जगात आपल्यासाठी ज्या बाबी उपयुक्त आहेत त्या आपण जतन करणे गरजेचे वाटते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा