मुख्य सामग्रीवर वगळा

मी वाचवतो

स्टार्स ( STARS)उपक्रमांतर्गत २५६० व्हिडिओ निर्मिती

पटकथा लेखन
-------------------------------------------

व्हिडिओ क्रमांक २०
इयत्ता -  नववी 
विषय - मराठी
पाठ घटक क्रमांक -९
 पाठाचे/ घटकाचे नाव - कविता क्रमांक (९)मी वाचवतोय 
उपघटक /पाठ्यांश -१) कवीचा परिचय 
२)कविता वाचन व काव्य प्रकारची ओळख.
 वेळ -३५ मिनिट 
शिक्षकाचे नाव - श्री .तुकाराम तुळशीराम अडसूळ 

पदनाम -उपाध्यापक 
शाळेचे नाव- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी तालुका -पाथर्डी जिल्हा- अहिल्यानगर

 अध्ययन निष्पत्ती- १) गीते, समूहगीते ,कविता व त्यांची भाषणे व विविध साहित्य प्रकाराच्या ध्वनिफिती समज पूर्वक ऐकतात.

 २)गाणी, कविता, समूहगीते स्वरा घातासह म्हणतात.

दिनदर्शिकेतील पाठ क्रमांक -९
निर्मिती कार्यालयाचे नाव -  जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहिल्यानगर
पाठाचे स्वरूप -  विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसताना ,व्हिडिओ स्वरूपात 
साहित्य -  स्मार्ट बोर्ड किंवा फळा , पी.पी.टी.स्लाईड, ईमेज चित्र /फोटो.

----------------------------------------

नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कसे आहात?
खूप आनंदी दिसतात .तुम्ही दररोज नवनवीन गोष्टी आनंदाने शिकत आहात.असेच आपण आज आनंदाने शिकणार आहोत.
----------------------------------------
स्लाईड -  येथून सुरू
स्लाईड 3

साहित्य, कविता आणि गीतांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव असतो.

साहित्य म्हणजे  लिखित कलेचा प्रकार होय.
साहित्यात अर्थ ,भावना आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर केला जातो.
साहित्य हा कोणत्याही लिखित कार्याचा संग्रह असतो.

साहित्य हे कथा, कादंबरी ,कविता ,नाटक, आत्मचरित्र अशा अनेक रूपाने  असते.

स्वर , ताल आणि पदांनी बनलेले गीत म्हणजे गाणे.
गीत हे कवितेचे एक अंग असते. 

कवितेच्या लयीवर सुरांची रचना केली जाते आणि ती गीत बनते.
गीत हे एक लोकप्रिय साहित्य आहे. 
गीत आपणा सर्वांना आवडते.




----------------------------------
स्लाईड बदलणे 
स्लाईड 4


कविता म्हणजे साहित्याचा एक प्रकार जो छंदबद्ध आणि रसबद्ध असतो.

कवितेतून जीवन कळते, समजते,उमगते.
कविता ही एक उदात्त कला असते.

कवितेमध्ये मनाच्या भावना वस्तुस्थिती किंवा मनस्थिती व्यक्त केली जाते.


कविता ही केवळ शब्दांची जुळवा जुळव नसते तर ती मनाला विचार करायला भाग पाडते.

कवितांच्या माध्यमातून कवी समाजातील वास्तव मांडतात . विचार करायला लावतात आणि हृदयाला भिडणारे संदेश देतात.

शब्द हे केवळ उच्चारले जात नाहीत तर ते काळजाला भिडतात.

कविता आनंददायक असते. कविता अनेकांना आवडते .
आतापर्यंत तुम्ही अनेक कविता शिकले आहात.

मराठी साहित्य विश्वात अनेक प्रतिभावान ,संवेदनशील कवी होऊन गेले.


--------------------------------------
स्लाईड बदलणे 
स्लाईड 5



आज आपण अशाच एका संवेदनशील कवीची ओळख करून घेणार आहोत.

 ते म्हणजे "मी वाचवतोय " या कवितेचे कवी सतीश काळसेकर यांचा परिचय करून घेऊ या.

---------------------------------------
स्लाईड बदलणे 
स्लाईड 6


कवी सतीश काळसेकर यांचा जन्म  १९४३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातमध्ये  झाला.

त्यांचे शालेय शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात  आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले.
-------------------------------------

स्लाईड बदलणे 
स्लाईड 7


सतीश काळसेकर हे मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाचे कवी ,लेखक व विचारवंत होते.


इंद्रियोपनिषद ,साक्षात ,विलंबित हे त्यांचे कवितासंग्रह आहेत.

त्यांच्या कवितांमध्ये समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब दिसते.

वास्तव म्हणजे खरे.

' कविता लेनिसाठी ' या 
लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे त्यांनी संपादन केले .

--------------------------------------

स्लाईड बदलणे 
स्लाईड 8


'तात्पर्य  '   ' मागोवा '     'लोकवाङ्मय ' या नियतकालिकांच्या संपादनात त्यांचा मोठा सहभाग होता.

त्यांच्याकडे विविध पुस्तके , वृत्तपत्रे, नियतकालिके यांचा प्रचंड साठा होता.

----------------------------------
स्लाईड बदलणे 

स्लाईड 9


मुंबई येथे पुस्तकांसाठी घर कमी पडले म्हणून ते रायगड जिल्ह्यातील पेन येथे निसर्गाच्या सानिध्यात पुस्तकांसाठी घर बांधून राहू लागले.

--------------------------------------
स्लाईड बदलणे 

 स्लाईड 10


त्यांचे लेखन हे समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे.

कवी सतीश काळसेकर हे परिवर्तनवादी विचाराचे कवी होते .

परिवर्तन म्हणजे बदल.

------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 11



ज्ञानाच्या अमर्याद कक्षा वाढविण्यासाठी पुस्तकाची गरज असते.
 माझे घर पुस्तकांनी भरलेले आहे.

आपल्या जीवनात वाचन - लेखन अतिशय महत्त्वाचे आहे.

आपण प्रकट होण्यासाठी वाचन केले पाहिजे.
वाचन केल्याशिवाय चांगले भाषण व लेखन येत नाही.
माझ्याकडे पुस्तके वाचायला वेळ नाही असे म्हणू नका 
यासाठी कोणतीही सबब सांगू नका.
ज्या दिवशी माझे वाचन थांबेल त्या दिवशी माझा श्वास थांबेल असे ते वेळोवेळी  म्हणायचे.

आता मला सांगा वाचनाचे  कोणकोणते फायदे आहेत?
वाचनाने चांगली संस्कार होतात.
वाचनाने आत्मविश्वास निर्माण होतो. 
वाचन केल्यामुळे जीवनाला दिशा मिळते. 
जीवनात कोणते योग्य अयोग्य याची जाणीव होते. 
वाचनाने चांगले साहित्यिक , लेखक ,विचारवंत ,कवी निर्माण होतात. 

वाचनाने पुस्तक रूपाने एक नवीन मित्र मिळतो. 

वाचन माणसाला माणूस बनविते. 
वाचनाने आपले व्यक्तिमत्व घडते. 
म्हणूनच म्हणतात वाचाल तर वाचाल. 
 म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमी वाचन केले पाहिजे.

----------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 12


कवी सतीश काळसेकर यांचे लेखन समाजातील वास्तव दाखवणारे आणि परिवर्तनवादी विचार मांडणारे आहे.
आपल्याला विचार करायला भाग पाडतात.
त्यांच्या विचारांपासून आपल्याला एक वेगळी प्रेरणा मिळते.

-------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 13


कवी सतीश काळसेकर यांच्या कविता  केवळ शब्दांचा खेळ नसतो ते वास्तव बदलण्याचं सामर्थ्य बाळगते.
त्यांच्या कवितेत सामाजिक संदेश आहे.
-------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 14



 त्यांची कविता फक्त वाचण्याची नाही तर समजून घेवून , कृतीत आणणे   महत्त्वाचे आहे.

त्यांच्या शब्दांचा प्रकाश आपल्याला नेहमी मार्ग दाखवत राहील.

त्यांच्या कवितांमध्ये समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब दिसते.


-------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 15

त्याच्या पुस्तकांनी मराठी साहित्य समृद्ध केले.

समृद्ध होणे म्हणजे विकसित होणे.

----------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 16

 
"वाचणाऱ्याची रोजनिशी " या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

वाचणाऱ्यांची   रोजनिशीतून त्यांनी जगभरातील गाजलेल्या पुस्तकांचा परिचय करून दिला.
तसेच 
त्यांनी  देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या कवींचा मराठी वाचकांना परिचय करून दिला.

-------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 17


कवी सतीश काळसेकर यांना
सोवियत लँड नेहरू पुरस्कार, लालजी पेंडसे पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार ,
कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, 
महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार,
 आचार्य अत्रे पुरस्कार असे अनेक मिळाले.

---------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 18


"मी वाचवतोय" ही कविता सामाजिक बदलांची प्रतिबिंब आहे .कवीने हरवणाऱ्या परंपरा , बोलीभाषा ,मातीशी असलेले नाते आणि जीवनशैलीवर होणारा ताण यांची वेदनादायक जाणीव शब्दबद्ध केली आहे .
कवितेतून कवी नुसते वर्णन करत नाहीत तर हरवत चाललेल्या संस्कृतीसाठी एक हाक देतात. 

माझी आई ,माझी बोली आणि माझी भूमी यांचे रक्षण करण्याचे आवाहन  कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले गेले आहे. ही कविता फक्त भावनिक नाही तर विचार प्रवर्तकही आहे.
----------------------------------------


स्लाईड बदलणे
स्लाईड -19


आधुनिकतेच्या प्रवाहात भाषा, संस्कृती आणि माणुसकी हरवण्याच्या संकटाचा वेध घेत ही कविता त्यांचे महत्त्व अधोरेखित करते.


---------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 20


शब्द हे संवादाचे माध्यम आहे.
कवी म्हणतात.
मी शब्द वाचवतो.
पण तेच आता हरवत चालले आहे.

भाषा, संवेदना , माणुसकी आणि संस्कृती हरवत चालली आहे.
मी संस्कृती वाचवतोय कारण तीच आपली ओळख आहे.
मी माणुसकी वाचवतोय कारण तीच मला माणूस बनवते.

----------------------------------------
स्लाईड बदलणे
स्लाईड 21



ही कविता  संपूर्ण जीवन मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देते.

मूल्य म्हणजे चांगले गुण

या कवितेतून 
 कवी अनेक बाबी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

----------------------------------------
स्लाईड बदलणे
स्लाईड -22


वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र या कवितेतून कवीने रेखाटले आहे.



ही कविता म्हणजे आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे वास्तव दर्शविणारा आरसा आहे .
तिच्या प्रत्येक ओळीत समाज प्रबोधनाचा विचार आहे.
----------------------------------------
स्लाईड बदलणे
स्लाईड 23



समाजाचे वास्तव वेगाने बदलत चालले आहे .
जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

अशा काही  जुन्या खेळांची नावे तुम्हाला सांगता येईल का?,

भोवरा खेळ, सूर पारंब्या खेळ ,
सायकलच्या टायरचा खेळ ,माझा रुमाल हरवला ,मामाचे पत्र असे अनेक खेळ आता दिसत नाहीत.


ही कविता समाजातील बदलत्या परिस्थितीची जाणीव करून देते  आणि वाचवण्याच्या प्रयत्नांची गरज दर्शविते.

 कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचवू इच्छितात .

महानगरी जीवनावरील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण कवी सतीश काळसेकर यांच्या कवितेत आहे .

----------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 24


ही कविता साधना दिवाळी अंक २००५ या मासिकातून घेतली आहे

तुम्हाला काही मासिकांची नावे सांगता येतील का?

मासिका मध्ये उपयुक्त शैक्षणिक माहिती असते.
जीवन शिक्षण मासिक ,
किशोर मासिक,
शिक्षण संक्रमण मासिक अशी अनेक मासिके आहेत.
ती आपण वाचली पाहिजेत.
त्यामुळे आपल्याला आणखी माहिती मिळते.


--------------------------------------
स्लाईड बदलणे
स्लाईड 25 ते 30


  

आज आपण कवी सतीश काळसेकर यांच्या लेखणीने साकारलेली"  मी वाचवतोय "ही संवेदनशील कविता वाचून समजून घेऊया.

हाकेतून हद्दपार होतेय आई ,
 हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई .


हरवत चाललाय किराणा आणि भुसार ,
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर .


 लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा ,
 निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट .


 कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली,
 मागच्या धागीवर रटरटणारी आमटी ,
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर .


बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली ,
सुटीत आता खेळत नाहीत मुलं ,
 विटीदांडू आणि लगोऱ्या ,
थांबून गेलाय त्यांचा दंगा , 
आट्यापाट्या आणि पिंगा ,
परकऱ्या मुली खेळत नाहीत आता ,
आधीचे मातीतले खेळ .




पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर 
बघत क्रिकेटची मॅच ,
आणि उलगडत क्राईम थ्रिलर .


 लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते ,
शब्द बापुढे केवळ वारा ,
तसे विरून जातायत .


मी वाचवतोय माझी कविता , 
आणि माझी आई ,
आणि माझी बोली ,
आणि माझी भूमी ,
कवितेसोबत.


आता आपण ही कविता समजून घेऊया 


वाचवणे म्हणजे बचाव करने.

बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दात व्यक्त करताना कवी म्हणतात -


---------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 31


हाकेतून हद्दपार होतेय आई हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई 


हद्दपार होणे म्हणजे सीमापार होणे.

कवी म्हणतात
आई अशी  हाक आता ऐकू येत नाही .ही हाक जणू काही सीमापार गेली आहे.
आई या शब्दात खूप मोठे प्रेम असते. 
आई हा शब्द आपल्या कानावर पडताच आपल्याला आपल्या आईची आठवण येते.
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आईचे स्थान खूप महान असते.
परंतु ही हाक आता ऐकू येत नाही.

 गोठ्यातल्या गाई सुद्धा आता हंबरणे विसरल्या आहेत .

हंबरणे म्हणजे गायीचा आवाज 

त्या आता आपल्या वासरासाठी हंबरत नाहीत.

----------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 32


हरवत चाललाय किराणा आणि भुसार ,
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर.

कवी म्हणतात

मोठमोठे मॉल्स व सुपर मार्केट निर्माण झाल्यामुळे त्यांच्या  झगमगाटी दुनियेत आता पूर्वीच्या किराणा व भुसाराची दुकाने हरवून जात आहेत.

किराणा भुसार म्हणजे किराणा सामान व अन्न धान्याच्या वस्तू.

सुपर मार्केट म्हणजे अन्नधान्य ,
भाजीपाला खाण्याचे तयार पदार्थ तसेच अन्य अगणित वस्तू एका छताखाली मिळतील असे भव्य दुकान.

पूर्वी गावात लहान लहान किराणा  दुकाने असायची.
किराणा दुकानात किराणा सामान मिळते.

आता आपल्याला सुपर मार्केट आणि मॉल्स दिसतात. 

मॉल्समध्ये एकच ठिकाणी विविध प्रकारचे सामान ,वस्तू मिळतात.


----------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 33



लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
 निघून चाललाय गावगाड्या सोबत  मुकाट.

मुकाट म्हणजे शांतपणे .

कवी म्हणतात 

पूर्वीच्या गावच्या संस्कृतीत असलेले जुने व्यावसायिक लोहार ,कुंभार नि त्यांचे भाते व चाके गावगाड्याबरोबरच निमुटपणे नाहीसे होत आहेत.

लोहरचा भाता म्हणजे
 लोखंडी वस्तू बनवन्यासाठी लोहार वापरत असलेल्या वारा  घालण्याचे साधन.

कुंभाराचा आवा म्हणजे ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्यांचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असलेले लाकडी गोल चाक .

गावगाडा म्हणजे गावची जुनी संस्कृती ,परंपरा .
------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 34


कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली ,
 मागच्या धगीवर रटरटणारीआमटी 
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर.

विस्तव म्हणजे निखारे.
रटरटणारी म्हणजे शिकणारी.


कल्हईची  झिलई म्हणजे तांब्या पितळेची भांडी कळकू नयेत म्हणून कथिलाची तार तापवून त्याच्या रसापासून तयार केलेला मुलामा भांड्यांना दिला जातो.

कवी म्हणतात
पूर्वीच्या भांड्यांची कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली आहे .
चुलीच्या जाळावर शिजत असलेली आमटी राखेसहित दूर गेली .
आता  ही आमटी  गॅस शेगडीवर शिजत असलेली दिसते.

-----------------------------------
स्लाईड बदलणे
स्लाईड 35
 

बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली 
 सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटीदांडू आणि लगोऱ्या 
थांबून गेलाय त्यांचा दंगा. आट्यापाट्या आणि पिंगा
 परकऱ्या मुली खेळत नाहीत आता
 आधीचे मातीतले खेळ.

बोलाचाली म्हणजे संभाषण.
बोली म्हणजे भाषा.
आईची बोली म्हणजे मातृभाषा .

विटीदांडू म्हणजे लाकडाची छोटी विटी व मोठा दांडू यांचा जुना मैदानी खेळ.

लगोऱ्या म्हणजे दगडांच्या चकत्या एकावर एक रचून चेंडूने फोडण्याचा जुना मैदानी खेळ.

आट्या पाट्या म्हणजे जमिनीवर आडव्या उभ्या रेषा आखून खेळता येणारा खेळ.

परकऱ्या  म्हणजे परकर परिधान करणाऱ्या .

पिंगा म्हणजे मान गोल गोल फिरवून घुमण्याचा खेळ.

गिल्ला म्हणजे येथे मुलांचा दंगा,मुलांचा आवाज.

कवी असे म्हणतात

संभाषणातून -संवादातून हल्ली मातृभाषा म्हणजे आईची बोली  निघून चालली आहे .
 आता मुले सुट्ट्यांमध्ये पूर्वीसारखी विटी दांडू व लगोरीचे खेळ खेळत नाहीत .
त्यांचा गिल्ला आता थांबलाय. आता आट्या पाट्या किंवा पिंगा असले जुने खेळ नाहीसे झाले आहेत.
 परकर घालणाऱ्या लहान मुली आता पूर्वीचे मातीतले खेळ खेळताना दिसत नाहीत.

----------------------------------------
स्लाईड बदलणे
स्लाईड 36


पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर 
बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम- थ्रिलर


क्राईम थ्रिलर म्हणजे गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या दूरदर्शनवरील मालिका.


कवी म्हणतात 
 आता  मुले दूरदर्शनच्या  चॅनेलवर  क्रिकेटची मॅच पाहण्यात रमून जातात आणि गुन्हेगारी विश्वातील मालिका बघत असतात.

----------------------------------------
स्लाईड बदलणे
स्लाईड  37


लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते ,
 शब्द बापुडे केवळ वारा 
 तसे विरून जातायत.

विरून जाणे म्हणजे नाहीसे होणे.

लिहिते हात म्हणजे लेखनाचा सराव .

बापुडे म्हणजे केविलवाणे.

कवी म्हणतात
आता कोणाकडूनही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत .
लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय .
शब्द केविलवाणे होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जातात.

----------------------------------------

स्लाईड बदलणे
स्लाईड 38


मी वाचवतोय माझी कविता, आणि माझी आई ,
आणि माझी बोली ,
आणि माझी भूमी ,
कवितेसोबत.


भूमी म्हणजे धरती.

कवी म्हणतात

अशा या बदलत्या भयानक वास्तवात मी माझी कविता सांभाळतोय आणि कविते सोबतच माझी आई ,माझी भाषा आणि माझी भूमी यांचा मी या आधुनिक वास्तवापासून बचाव करतो आहे.

कवितेतून कवी आपल्याला कोणता संदेश देतात ते आपण थोडक्यात पाहू या.


यंत्रयुगातील नवीन बदलामुळे जुनी मूल्य  वाचवणे व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची जोपासना झाली पाहिजे.
जुन्या जमान्यातील काही चांगल्या गोष्टी हरवत व दुरावत चालल्या आहेत.त्या आपण सर्वांनी वाचवल्या पाहिजेत.




विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल.

ही कविता तुमच्यामध्ये नक्कीच योग्य  परिवर्तन करील.

विद्यार्थी मित्रांनो आपल्या आसपास परिसरात अनेक चांगल्या बाबी आहेत .
त्या आपण जतन केल्या पाहिजेत.
---------------------
स्लाईड 39

स्वाध्याय

या कवितेमधून आपल्याला अशा  जुन्या  कोणकोणत्या  चांगल्या बाबी वाचवता येईल याची  सविस्तर यादी  तुमच्या शब्दात तयार करा .

यानंतर आपण  कवितेच्या पुढील भागात पुन्हा भेटूया.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏