मुख्य सामग्रीवर वगळा

सायबर सुरक्षा

मेसेज मोठा आहे परंतु पूर्ण वाचा

🚫 *सायबर स्कॅमची अद्ययावत यादी देतोय. ते धोके ओळखा आणि यापासून दूर राहा. त्याच्याच या टिप्स देतोय !*
➖➖➖➖➖➖➖➖
✅ पुणे अनलिमिटेड 
➖➖➖➖➖➖➖➖

*१)* जर तुम्हाला ट्राय (टेलिफोन ऍथॉरिटी) कडून तुमचा फोन कसा डिस्कनेक्ट करणार आहे याबद्दल सांगितले गेले, तर प्रतिसाद देऊ नका. हा स्कॅम आहे.
*२)* जर तुम्हाला फेडएक्सने पॅकेज बद्दल बोलावले आणि मोबाईलवर 1, 9 किंवा काहीही बटण दाबण्यास सांगितले, तर दाबू  नका. तुमचा फोन हॅक होऊ शकणारा हा स्कॅम आहे.
*३)* जर एखादा पोलीस अधिकारी तुम्हाला फोन करून तुमच्या आधार कार्ड बद्दल बोलत असेल, तर प्रतिसाद देऊ नका. पोलिसांतर्फे असे कधीही कॉल वर विचारले जात नाही. हा स्कॅम आहे.
*४)* जर ते तुम्हाला सांगत असतील की तुम्ही 'डिजिटल अरेस्ट' मध्ये आहात, आणि कुणालाही कॉल करू नका, जिथे आहात तिथून हलू नका पुढचे ४८ तास. तर याला  प्रतिसाद देऊ नका. हा स्कॅम आहे.
*५)* जर ते तुम्हाला सांगत असतील की तुमच्यासाठी पाठवलेल्या किंवा तुम्ही पाठवलेल्या एखाद्या पॅकेज मध्ये ड्रग्ज  सापडली आहेत, तर प्रतिसाद देऊ नका. हा स्कॅम आहे. (लक्षात ठेवा.. कर नाही तर डर कशाची) हे विसरू नका.
*६)* जर ते म्हणाले की तुमचा मुलगा, मुलगी ऍक्सीडेन्ट मध्ये सापडला असून आता आमच्या हॉस्पिटल मध्ये आहे, पंधरा मिनिटात ऑपरेशन करावे लागेल, तर तोवर टोकन मनी म्हणून अमुक इतके पैसे पाठवा. तर अजिबात पाठवू नका. हा स्कॅम आहे. त्यासाठी आधी मुलाला कॉल करून खात्री करून घ्या. मग कळेल की तो तर ऑल रेडी सेफ आहे, कॉलेजात, कँटीन मध्ये.
*७)* जर ते तुमच्याशी व्हॉट्सअँप  किंवा एसएमएस द्वारे संपर्क साधत असतील, तर प्रतिसाद देऊ नका. हा स्कॅम  आहे. (शक्यतो अननोन नम्बर वरून आलेले कोणतेही कॉल अटेंड करू नका. व्हिडीओ कॉल तर मुळीच करू नका अटेंड.
*८)* जर कोणी तुम्हाला फोन करून सांगितले की त्यांनी चुकून तुमच्या यू.पी.आय. आयडीवर पैसे पाठवले आहेत आणि त्यांना फक्त त्यांचे पैसे परत हवे आहेत, तर प्रतिसाद देऊ नका. हा स्कॅम  आहे. तुमच्याकडे ते शंभर रुपये पाठवतील आणि लिंक अथवा क्यू आर कोड देतील आणि सांगतील की इथे रिटर्न करा. ते अजिबात करू नका. त्यातून तुमचा फोन हॅक करून तुमचे अकाउंट 'रिकामे' करण्याचा हा स्कॅम आहे.
*९)* जर कोणी तुमची गाडी किंवा तुमचे वॉशिंग मशिन किंवा तुमचा सोफा विकत घ्यायचा आहे असे म्हणत असेल आणि ते लष्कर किंवा सी.आर.पी.एफ. चे आहेत असे म्हणत असेल आणि तुम्हाला त्यांचे ओळखपत्र दाखवले तर प्रतिसाद देऊ नका. हा स्कॅम  आहे.
*१०)* जर कोणी म्हणत असेल की ते स्विगी किंवा झोमॅटो वरून फोन करत आहेत आणि तुम्हाला १ किंवा इतर कोणताही नंबर काहीही दाबून तुमच्या पत्त्याची पुष्टी करण्याची आवश्यकता असेल, तर प्रतिसाद देऊ नका. हा स्कॅम  आहे.
*११)* जर ते तुम्हाला फक्त ऑर्डर रद्द करण्यासाठी किंवा प्रवासासाठी किंवा जे काही करण्यासाठी ओ.टी.पी. शेयर करण्यास सांगत असतील, तर प्रतिसाद देऊ नका. हा स्कॅम  आहे. कोणत्याही परिस्थितीत, तुमचा ओ.टी.पी. कोणाशीही फोनवर शेअर करू नका.
*१२)* व्हिडिओ मोडवर कोणत्याही कॉलला कधीही उत्तर देऊ नका. त्यासाठी वाटलं तर अशा वेळी तुमच्या मोबाईलचा स्क्रीन छताकडे धरून पहा. समोरून कोण कसल्या अवस्थेत (न्यूड टाईप) बोलत असेल तर तुम्हाला ते दिसेल, पण त्यांना तुम्ही दिसणार नाही त्यामुळे नंतर होणारे इमोशनल ब्लॅक मेल थांबेल. नंतर त्या नंबरला लगेच ब्लॉक करा.
*१३)* तरी गडबडीत तुम्ही त्याला रीस्पॉन्ड केला जरी तरी आणि तो गोंधळ झाल्यास फक्त तो नंबर ब्लॉक करा. आणि थोडा वेळ तुमचा मोबाईल बंद ठेवा. 
*१४)* निळ्या रंगात लिहिलेल्या कोणत्याही लिंकवर  कधीही घाईघाईत क्लिक करू नका. पाठवणारा माहितीतील आहे का ते आधी चेक करा, नाही तर सरळ तो मेसेज डिलीट करून त्या नंबर ला ब्लॉक करा.
*१५)* जरी तुम्हाला सर्वोच्च अधिकारी पोलिस (डिपार्टमेंट), सी.बी.आय., ई.डी., आय.टी. विभागाकडून नोटीस पाठवली आहे असं कॉल, मेसेज करून सांगितलं असलं तरी पॅनिक होऊ नका. संबंधित खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याची आधी खात्री करून घ्या. कारण या विभागातर्फे असे कधीही कॉल, मेसेज करून नोटीस पाठवली जात नाही. अधिकृत पोस्टातर्फे तरी येते किंवा त्यांची माणसे फिजिकली नोटीस घेऊन येतात. हे विसरू नका.
*१६)* अशी पत्रे सरकारी पोर्टल्स मधून आली आहेत का ते नेहमी तपासा, कारण अनेकदा खाजगी कुरियर तर्फे हि येतात जी डुप्लिकेट असतात. सरकारी नोटीस कधीही खाजगी कुरियर कडून येत नाही. 
*१७) जर कोणी तुम्हाला उप-समन्स (अमेरिकेचे कॉल समन्स ऑफ कोर्ट हे उप-समन्स) असे सांगत फोन करत असेल आणि तुम्हाला येऊन ते गोळा करावे लागेल किंवा ते पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील, तर त्याला/तिला समन्स किंवा खटल्याच्या फाईलवर संबोधित करण्यासाठी न्यायालयाच्या प्रोसेस सर्व्हर द्वारे किंवा नोंदणीकृत पोस्ट द्वारे पाठविण्यास सांगा. जर ते तुम्हाला धमकावत असतील, तर त्या व्यक्तीचा वेळ वाया घालवा. तसेच न्यायाधीशाचे नाव, न्यायालयीन खोली क्रमांक आणि मजला आणि/किंवा इमारत क्रमांक विचारा. जर ती व्यक्ती सांगू शकत नसेल, तर याचा अर्थ असा आहे की हा एक खात्रीलायक स्कॅम आहे. 
*१८)* जर कोणी फोन करून म्हणतो की तो/ती पोलिस ठाण्यातून फोन करत आहे आणि तुम्हाला बोलावले जात आहे, तर त्याला/तिला ते स्थानिक पोलिस ठाण्यात पाठवण्यास सांगा (तुमचे ठिकाण/शहर उघड करू नका) आणि स्थानिक पोलिस स्टेशनला ते तुम्हाला देऊ द्या.
*१९)* क्रेडिट/डेबिट/आधार कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही, मुदत संपण्याची तारीख यासह कोणत्याही डेबिट/क्रेडिट/रुपे कार्ड तपशीलासह कोणालाही कधीही देऊ नका.
*२०)* ट्रूकॉलर मिळवा. स्पॅम किंवा फसवणूक असे चिन्ह असलेले कॉल उचलू नका. या श्रेणीत येणारे सर्व कॉल ब्लॉक करा.
*२१)* "तुमचे बाबा-आई म्हणाली म्हणून आणि त्यांनी सांगितले म्हणून मी तुम्हाला इतकी आणि इतकी रक्कम पाठवली आहे, चेक करून सांगा" अशी माहिती देणारे कोणतेही कॉल डिस्कनेक्ट करा. तुम्हाला पैसे पाठवत असलेल्या "खऱ्या" व्यक्तीला फोन करा आणि खात्री करा. मात्र, त्यांनी एखादी लिंक पाठवली असेल तर त्यावर अजिबात क्लिक करू नका किंवा क्यू.आर.कोड स्कॅन करू नका किंवा ओ.टी.पी. शेअर करू नका.
*२२)* कोणी प्रिय व्यक्ती/नातेवाईक/मित्राला आपत्कालीन/आजारपण/अपघाताची माहिती देण्यासाठी फोन केल्यास, पैसे पाठवण्यास/जमा करण्यास सांगत असल्यास तसे काहीही करू नका. जरी तो व्हिडिओ कॉल किंवा व्हॉईस कॉल असला तरीही. प्रिय व्यक्ती/नातेवाईक/मित्र/त्यांच्या कुटुंबियांना स्वतः थेट फोन करा आणि खात्री करा. जर त्या व्यक्ती पर्यंत पोहोचता येत नसेल, तर स्वतः गुगल करा आणि रुग्णालयाला फोन करा आणि चौकशी करा. शक्य असल्यास त्या ठिकाणी शारीरिकरीत्या पोहचा. 
*२३)* समभाग (शेयर्स) किंवा क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याचा सल्ला देणाऱ्या कोणत्याही कॉल/संदेशांना प्रतिसाद देऊ नका. असा साठा खरेदी करू नका कारण "निश्चित नफा" अपेक्षित आहे. जो तुम्हाला भासवला जातो, पण रियल मध्ये कधीही तो तुम्हाला मिळत नाही. उलट जे पैसे गुंतवले ते सगळे घेऊन हे भामटे फरार होतात. 
*२४)* "वर्क फ्रॉम होम" करण्याचे आश्वासन देणाऱ्या कॉल/संदेशांना शक्यतो प्रतिसाद देऊ नका. ते तुम्हाला जाळ्यात अडकवतात, तुम्हाला "नफा" दर्शविताना "गुंतवणुकीसाठी" पैसे पाठवतात. कधीही नफा मिळत नाही. हा स्कॅम  आहे.
*२५)* जर तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीचा/नातेवाईक/मित्राचा वेदनादायक आवाज ऐकू आला, मदत मागत असेल तर पॅनिक होऊन लगेच घराबाहेर पडू नका. खास करून रात्रीच्या वेळी. बाहेर कोण आहे याचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करा. प्रिय व्यक्ती/नातेवाईक/मित्राच्या मोबाईलवर/घरी फोन करा. गरज भासल्यास पोलिसांना बोलवा. कारण असं इमोशनली गुंतवून बाहेर बोलावून लुटण्याचा हा स्कॅम आहे. 
*२६)* 'सोप्या कर्जाच्या' अ‍ॅप्सच्या जाळ्यात अडकू नका. तुम्ही परत करू शकत नाही अशी अनेक कर्जे घेण्यासाठी ते हळूहळू तुम्हाला फसवतात. कधीकधी, ते मोठ्या परताव्याचे आश्वासन देतात आणि तुम्हाला गुंतवणुकीसाठी कर्ज देतात. कधीही नफा मिळत नाही. तुम्ही गुंतवलेले पैसे गेले आहेत. तुम्ही केवळ काही घोटाळ्यात गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेता. तुमची "गुंतवणूक" नष्ट होईल, परंतु कर्ज आणि व्याज भरण्यासाठी तुम्ही जबाबदार असाल. अशा रीतीने फसवणूक झालेल्या अनेक तरुणांनी शेवटी आत्महत्या केल्यात. इतकं हे भीषण आहे. 
*२६)* लक्षात ठेवा की सायबर भामट्याकडून कधीही  काहीही मोफत मिळत नाही. "सोपे पैसे/परतावा/एकदा आजीवन सौदा" असे काहीही नाही. आणि, जर तुम्ही अमली पदार्थ/बंदी घातलेली औषधे/बनावट पारपत्र/बेकायदेशीर शस्त्रे आणि दारूगोळा/मानवी तस्करी किंवा मनी लॉन्ड्रिंग सारख्या इतर गुन्ह्यांचा व्यवहार करत नसाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
*२७)* अशा फसवणूक करणार्यांना माहिती देण्यासाठी सोबत लिंक देतोय. तिथं तक्रार दाखल करा https://cybercrime.gov.in / तसेच 1930 या नम्बरवर संपर्क साधून तक्रार दाखल करा.

*डॉ. डीडी क्लास लक्षात ठेवा- कोणतेही न्यायालय/पोलिस स्टेशन/सरकारी तपासणी एजन्सी तुम्हाला फोन करून माहिती देत नाहीत किंवा आदेश काढून बोलवू पण शकत नाहीत. ते कागदी पद्धतीने सरकारी नियमात राहून काम करतात. शेवटचं  एकच सांगतो. काहीही घडो, मन शांत ठेवा, पॅनिक होऊ नका. तुम्ही पॅनिक झालात की त्या भामट्याचे काम निम्मे सोपे होते, मग हिप्नोटाईज पद्धतीने ते तुम्हाला गोंधळून टाकतात आणि लुटतात. त्यामुळे पॅनिक होऊ नका. प्रसंगी सायबर सेल अथवा आमच्या सारख्या सायबर एक्सपर्ट चा सल्ला घ्या. सावध राहा, सुरक्षित राहा.*

*महत्वाची माहिती व टिप्स दिल्यात तर कृपया इतरांबरोबर जरूर शेअर करा.*

*©️ ®️ डॉ. धनंजय देशपांडे (dd)*
*ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State Mentor : transcendental-technologies Association with Pune University ( SPPU)*

✅ *सर्वांना ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा*
➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏