पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण उपक्रम
-------------------------------------
आज संपूर्ण जगापुढे पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण ही एक जागतिक समस्या निर्माण झाली आहे . त्यासाठी पर्यावरण बाबत आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.आपल्या अवती भोवती असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांना पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरणात सजीव व निर्जीव या दोन्हीही घटकांचा समावेश होतो.आपण ज्या परिसरात राहतो तेथील परिसर म्हणजे पर्यावरण आपल्याला जीवन जगण्यासाठी अनुकूल असणे महत्त्वाचे आहे.हवा ,पाणी ,अन्न या आपल्या व इतर सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत.आपल्या या गरजा परिसरातून पूर्ण होत असतात.या गरजांपैकी एकाचे जरी प्रदूषण झाले तरी आपल्यासह इतर सर्व सजीवांच्या जीवनास धोका निर्माण होतो.म्हणून आपल्याला आणि सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण करणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही काळाची खूप मोठी गरज निर्माण झाली आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे .शाळा हे राष्ट्र व समाजविकासाचे केंद्र आहे.राष्ट्राचे भावी सुजान नागरिक हे शिक्षणातून घडत असतात. देशाचे हे सुजाण नागरिक निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात विविध उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण हे मूल्य रुजने अतिशय महत्वाचे असते. मूल्य ही शिकवावी लागत नाही तर ती विविध उपक्रमातून रुजवावी लागतात. यासाठी शाळेत आम्ही पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण विषयी विद्यार्थ्यांना सविस्तरपणे विविध उपक्रम तसेच कृतीद्वारे प्रत्यक्ष अनुभव व माहिती देऊन पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणबाबत महत्व सांगितले जाते .सर्व सजीवांच्या जगण्यासाठी त्यांच्या सभोवतालची नैसर्गिक व इतर परिस्थिती अनुकूल असणे गरजेचे आहे ,
यासाठी शाळेत पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे रुजविले आहे .
१) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन उपक्रम -- आपल्या जीवनात झाडांचे खूप महत्वाचे स्थान आहे .झाडे आपणास फळे ,फुले ,सावली देतात .सर्वात म्हणजे झाडे आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देतात.या प्राणवायूचे महत्व आपल्याला कोरोना काळात समजले आहे. झाड आहे तर आपली वाढ आहे.म्हणून विद्यार्थ्यांच्या घराजवळ ,शेताच्या कडेला वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यासाठी वर्षभर वेळोवेळी आपण जी फळे खातो त्या फळांच्या बियांचा संग्रह केला जातो.विविध झाडांच्या बियांचा संग्रह केल्यामुळे त्यांपासून विद्यार्थी घरच्या घरी विविध झाडांच्या रोपांची निर्मिती करतात. विद्यार्थ्यांना वृक्षारोपण,वृक्षसंवर्धनाचे महत्व सांगून त्यांना प्रतिवर्षी वृक्षारोपणासाठी शाळेच्या वतीने विविध झाडांची रोपे आम्ही वाटप करतो, ही सर्व रोपे विद्यार्थी शाळेत ,घराजवळ ,शेताच्या कडेला लावून या सर्व झाडांचे संवर्धन करतात .विद्यार्थ्यांना झाडांचे महत्व समजल्यामुळे त्यांनी झाडाशी मैत्री करून ह्या सर्व झाडांचे संगोपन केले आहे .झडांचेही वाढदिवस आनंदाने साजरे केले जातात. यामुळे शाळा आणि घर यांचा परिसर सुंदर निसर्गरम्य व आकर्षक केल आहे .तसेच गावातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व सांगून त्यांना वृक्षारोपणासाठी अनेक रोपे वाटप केली .त्यांनी ती रोपे लावून त्यांचे संवर्धन केले आहे.त्यांनाही
पर्यावरणप्रेमी बनविले आहे .
२) विद्यार्थ्यांचे पर्यावरणपूरक वाढदिवस उपक्रम -- शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस पर्यावरणपूरक साजरे केले जातात . विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यासाठी झाडाचे रोप भेट दिले जाते. तसेच शाळेत इतर अनेक कार्यक्रम साजरे केले जातात , त्यावेळी वृक्षारोपणासाठी उपस्थित सर्वांना झाडाचे रोप भेट म्हणून दिले जाते .ही सर्व झाडे लावून त्यांचे शंभर टक्के संवर्धन करतात.
३)प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करणे उपक्रम -
हवा,पाणी अन्न यांपैकी
हवा ही सर्व सजीवांची अत्यावश्यक मूलभूत गरज आहे .म्हणून हवा स्वच्छ ,शुद्ध राहणे गरजेचे आहे .त्यामुळे हवेचे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करण्याचे महत्व कृतीद्वारे विद्यार्थ्यांना वेळोवेळी सांगून तशी प्रतिज्ञा घेऊन विद्यार्थी वर्षभर प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करतात .गावातील लोकांनाही वेळोवेळी प्रदूषण मुक्त सणसमारंभ साजरे करण्याचे महत्व पटवून दिले जाते. त्यामुळे गावात याबत परिवर्तन होत आहे .
विद्यार्थी आणि पालक फटाकेमुक्त दीपावली साजरी करून शाळेला विविध बाबींसाठी मदत करतात.
४) परिसर व क्षेत्रभेट - परिसरातून आपल्या अनेक गरजा पूर्ण होतात.त्यामुळे परिसराची जपणूक करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परिसराची सविस्तर माहिती होऊन परिसराविषयी आत्मीयता निर्माण होण्यासाठी परिसर व क्षेत्रभेट उपक्रम अनेकवेळा राबविला जातो .परिसरातील ऐतिहासिक स्थळे ,व्यवसाय ,पिके ,नदी ,डोंगर ,शिवार पाहणी ,भेट देऊन त्यांविषयी सविस्तर माहिती मिळवली.त्यातून परिसराविषयी आत्मीयता निर्माण होऊन ते परिसराची जपणूक करतात .
५) सेंद्रिय परसबाग व भाजीपाला बाजार उपक्रम -अन्न ही एक आपली मूलभूत गरज आहे .हे अन्न शेतीतून मिळते.आपल्याला प्रदूषणमुक्त अन्न मिळाले पाहिजे.त्यासाठी शाळेत आणि विद्यार्थ्यांच्या घराजवळ सेंद्रिय परसबाग निर्मिती करून त्यात विविध प्रकारचा भाजीपाला लागवड केली.विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व प्रत्यक्ष कृतीद्वारे समजाऊन सेंद्रिय भाजीपाला बाजार शाळेत भरविला .
विद्यार्थ्यांना या उपक्रमातून अन्न प्रदूषण करू नये हे पटवून देऊन त्यांच्यामध्ये तसे मूल्य रुजविले आहे.
६) पाणी व्यवस्थापन - पाणी ही एक सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे .म्हणून पाणी व्यवस्थापन हा उपक्रम शाळेत नेहमी राबविला जातो . आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून शुद्ध पाणी पिणे ,पाण्याचा वापर जपून करणे पाणी झाकून ठेवणे ,पाणी उकळून, गाळून पिणे ,पाणी प्रदूषण करू नये ,पाण्यात कचरा टाकू नये , सांडपाण्यासाठी शोषखड्डे घेणे ,दूषित पाणी ओढ्यात ,नदीत सोडू नये कारण हे पाणी सर्व सजीवांना पिण्यासाठी लागते .दूषित पाण्यामुळे विविध आजार होतात म्हणून कधीही पाणी प्रदूषण करू नये . पाणी आडवा पाणी जिरवा ,पाणी वाचवा देश वाचवा हे मूल्य प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे .
७) गणित विज्ञान प्रदर्शन मधून पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण - शाळा आणि तालुका पातळीवरील गणित विज्ञान प्रदर्शनात शिक्षक आणि विद्यार्थी आनंदाने सहभागी होतात . या प्रदर्शनात पर्यावरण पूरक व प्रदूषणविरहित खेडेगाव मॉडेल , पर्यावरणपूरक पिशव्या ,कागदी पिशव्या ,पाकिटे ,विविध पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याचे महत्व सांगून ,पर्यावरण संवर्धन ,संरक्षणबाबत वस्तू निर्मिती करून त्यांचे प्रदर्शन भरविले.त्यामधून याबात जनजागृती केली .
८) प्लॅस्टिकमुक्त शाळा व प्लॅस्टिकमुक्त गाव -- पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी प्लॅस्टिकमुक्त शाळा आणि प्लॅस्टिकमुक्त गाव हा उपक्रम शाळेतून नेहमी राबविला जातो .विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या वापराचे दुष्परिणाम कृतीद्वारे सांगितले जातात ,शाळेच्या परिसरातील तसेच गावातील प्लॅस्टिक वेळोवेळी गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते .विद्यार्थ्याना तसेच गावालाही प्लॅस्टिकच्या वापराचे दुष्परिणाम बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करून जनजागृती प्लॅस्टिक वापरू नये म्हणून त्यांना आवाहन आवाहन केले जाते .विद्यार्थी प्लॅस्टिक वस्तू वापरत नाहीत.ते पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करतात.गावातही याबाबत परिवर्तन होत आहे .
९) स्वच्छ सुंदर शाळा व कचरा व्यवस्थापन उपक्रम -- जेथे स्वच्छता तेथे प्रसन्नता याप्रमाणे पर्यावरणात स्वच्छतेला खूप महत्व आहे ,त्यासाठी शाळेत कचरा व्यवस्थापन केले आहे .ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवला जातो .कचरा कशामुळे होतो हे विद्यार्थ्यांना समजावून दिले .त्यामुळे विद्यार्थी कचरा होऊ देत नाहीत. झाडांचा पाला पाचोळा यांपासून शाळेत तसेच विद्यार्थ्यांच्या घरी सेंद्रिय खत प्रकल्प निर्मिती केली आहे.हे खत झाडांना वेळोवेळी दिले जाते.विद्यार्थी शाळेत कचरा होऊ देत नाहीत .त्यामुळे शाळा स्वच्छ सुंदर राहते .शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण केले.
१०) शिक्षक पालक आणि माजी विद्यार्थी मेळाव्यातुन पर्यावरण संवर्धन -- शाळेत वेळोवेळी शिक्षक पालक आणि माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला जातो ,त्यामध्ये पर्यावरण संवर्धन ,प्रदूषण निवारण यांविषयी चर्चा करून जनजागृती केली जाते . पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणसाठी माजी विद्यार्थी पुढाकार घेतात त्यांनाही वृक्षारोपणासाठी झाडांची रोपे देऊन त्यांचे स्वागत केले जाते .अनावश्यक खर्च टाळून ते शाळेला पर्यावरण संवर्धन व इतर बाबीसाठी लोकसहभाग म्हणून मदत करतात .
११) बाल आनंद मेळाव्यातून पर्यावरण संवर्धन --जिल्हा परिषद गटाच्या बाल आनंद मेळाव्यात पर्यावरण पूरक पिशव्या ,टोप्या ,पाकिटे व विविध पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती करून त्या वस्तूंचे प्रदर्शन भरविले .यामधून पर्यावरण पूरक वस्तू वापरण्याबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांनी जनजागृती केली .
१२)वाचन प्रकल्प मधून पर्यावरण संवर्धन-शाळेत नेहमी निरंतर वाचन उपक्रम राबविला जातो.त्यासाठी अवांतर वाचनासाठी पुस्तके , वृत्तपत्र यासाठी बालवाचनालयाची व्यवस्था केली आहे. विद्यार्थी
वृत्तपत्रातील व पुस्तकातील पर्यावरण ,प्रदूषण बाबत माहिती , लेख वाचतात, काही सारांश विद्यार्थी स्वतःच्या शब्दात सांगतात . त्यामुळे त्यांना वाचनातून पर्यावरण संवर्धनाची आवड निर्माण झाली आहे.
१३) व्हि .डी.ओ.कॉन्फरन्स उपक्रम -- जिल्ह्यातील अनेक भूमिपुत्र परदेशात राहून आपल्या भारत देशासाठी महान शैक्षणिक व सामाजिक कार्य करत आहे . या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना होऊन प्रेरणा मिळावी म्हणून परदेशातील भूमीपुत्रांशी आणि पाठ्यपुस्तकातील विविध लेखकांशी व्ही .सी .द्वारे संवाद साधून पर्यावरण व इतर विविध बाबींची माहिती मिळवली जाते ,
त्याबाबत मार्गदर्शन घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी ,प्रदूषण निवारणासाठी आणखी कोणते उपक्रम राबविता येतील याबाबत माहिती घेऊन तसेही उपक्रम शाळेत राबविले जातात.म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्स हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे . वेळोवेळी हा उपक्रम राबविला जातो .
१४)पर्यावरण संदेश प्रसार उपक्रम --पर्यावरण संवर्धन ,संरक्षण हे कार्य विस्तारित होण्यासाठी शाळेत पर्यावरण संदेश लेखन प्रसार स्पर्धा हा उपक्रम राबविला. त्यामधून पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण करण्यासाठी संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांना पाठविले.त्यातून पर्यावरण संवर्धनबाबत प्रसार केला.उत्कृष्ट संदेश लेखन केलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला .त्यामुळे पर्यावरण संवर्धन विषयी विद्यार्थ्याचे व समाजात जनजागृती झाली आहे.
१५)पक्षांना चारा पाणी -- पक्षी हे पर्यावरण संवर्धनासाठी खूप उपयुक्त असतात.त्यांच्यामुळे बिजप्रसार होवून अनेक ठिकाणी झाडे उगवतात.त्यासाठी पक्षी संवर्धन करणे गरजेचे आहे.उन्हाळ्यात पाणी,अन्न मिळणे अवघड असते म्हणून उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ ,घराच्या छतावर मातीच्या भांड्यात पक्षांना चारा पाणी ठेवतात. पक्षी वाचवा उपक्रम शाळेत नेहमी राबविला जातो . पर्यावरण संवर्धनात पक्षी महत्वाचे कार्य करतात .तसेच शिल्लक अन्न इतरत्र ठिकाणी टाकून देत नाहीत ते अन्न पशु पक्षांना देतात .त्यासाठी शाळेतही पशु पक्षांसाठी अन्न ,पाण्याची सोय केली आहे.
१६)वृक्षदिंडी उपक्रम --पर्यावरण संवर्धन हे कार्य वाढविण्यासाठी , वृक्षारोपणाबाबत गावातून विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढली जाते .यामधून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन बाबत समाजात जनजागृती केली जाते.या दिंडीत अनेक पालक ग्रामस्थ सहभागी होतात.
१७)शैक्षणिक सहल उपक्रम -- शैक्षणिक सहली मधून विविध स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्या स्थळांची सविस्तर माहिती देऊन त्यांची जपणूक करण्याचे महत्व प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले जाते .त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आपुलकी ,आत्मीयता निर्माण झाली आहे.ते निसर्गाची जपणूक करून संरक्षण करतात.
तसेच पाठ्य पुस्तकातील विविध पाठ व कविता यांच्या अध्यापणातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण निवारण हे मूल्य रुजविले आहे.
शिक्षणातून राष्ट्राचे सुजाण पर्यावरण प्रेमी नागरिक निर्माण होण्यास असे अनेक उपक्रम राबविले.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य परिवर्तन झाले याबाबत मनस्वी आनंद झाला.असे विविध उपक्रम निरंतरपणे राबवित आहे.त्यामुळे प्रदूषणमुक्त भारत निर्माण होण्यास मदत होत आहे.
लेखिका
श्रीमती संजना भगवंत चेमटे
उपाध्यापिका
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर
ता. जि. अहिल्यानगर
मो.7588168948
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा