🌹 *क्रांतीसुर्य महानायक बिरसा मुंडा*🌹
👉🏻आदिवासी जननायक बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्यलढयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर, १८७५ रोजी रांची जवळील लिहतू खेडेगावात सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्पत्याच्या पोटी झाला. याच बालकाने लढवय्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्याला तोड नाही.त्यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा कीताब जनतेनेच बहाल केला. त्यांचे वडील शेतमजूर होते. घरच्या गरीबीमुळे त्यांना इंग्रजी माध्यमाच्या चाईबासा इंग्लिश मिशनरी स्कूलमध्ये शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्यांच्यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्यांना भारतीय संस्कृतीचा मनस्वी अभिमान होता व तो त्यांनी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केला. ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारावर बाधा येण्यास सुरुवात झाली.
💐💐💐💐💐
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा