शिक्षक माहिती -
महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार 2021-22 प्राप्त
नाव-तुकाराम तुळशीराम अडसूळ
शाळेचे नाव-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी ता.पाथर्डी
जिल्हा-अहमदनगर
शिक्षण-एम .ए. डी.एड.
एकूण सेवा
26 वर्ष
उल्लेखनीय कार्य-
1) पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी आणि नगर तालुक्यातील जेऊर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून शाळेचा कायापालट करून विद्यार्थ्यांना विविध भौतिक सुविधा निर्माण केल्या.
2)लोकसहभागातून शाळेत संगणक ,एलईडी ,पिण्याच्या पाण्याची सुविधा , शाळा दुरुस्ती,स्वच्छतागृह ,रेन वॉटर हार्वेस्टिंग , शाळा पेंटिंग , डिजिटल , ई लर्निंग , बेंचेस, विविध खेळांचे साहित्य , सुसज्ज वाचनालय सुरू केले.
3)कोरोनाकाळात ग्रंथालय प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये आणि घराघरात वाचन संस्कृती रुजविली.
आजही शाळेत आठवड्यातून एकदा पुस्तकांचे प्रदर्शन भरवून कायमस्वरुपी वाचन उपक्रम राबविला जातो.
4) ग्लोबल नगरी व्हिडीओ कॉन्फरन्स उपक्रमातून विद्यार्थ्यांना जगाची ओळख करून दिली .
5)लेखक / कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रमातून पाठ्यपुस्तकातील लेखकांचे विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणले.
6) राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ऑनलाईन ,ऑफलाईन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले.शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढली. त्यामुळे विद्यार्थी पटसंख्या वाढली.
7)अध्ययन अध्यापनात संगणक, एल.ई.डी ,विविध प्रकारचेॲप असे अनेक ई साहित्य अशा अनेक आय.सी.टी .तंत्रज्ञानाचा नेहमी आनंददायी पद्धतीने वापर केला.
8)शाळेत आणि गावात पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले.
9)राज्यस्तरावर शासनाच्या शिकू आनंदे, म्हणून उत्कृष्ट काम केले .
10)कोरोना काळात विद्यार्थ्यांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन योग प्राणायाम शिबिर घेतले.
11) राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन आयोजनात कृतिशील सहभाग घेवून राज्यातील शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
12)राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्यातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित कार्यपुस्तिका निर्मितीमध्ये कृतिशील सहभाग.
13)पाठयपुस्तक मंडळाला सादर केलेल्या नवोपक्रमाचा राज्यात दुसरा क्रमांक आला
-----------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा