वाचनाचा लळा
फुलवी जीवनाचा मळा.
---------------------------------
श्रवण ,भाषण ,वाचन ,लेखन ही भाषा विकासाची कौशल्ये माणसाच्या जीवनात व्यक्तिमत्व विकासासाठी खूप महत्वाची आहेत.त्यापैकी वाचन कौशल्य अतिशय महत्वाचे आहे.वाचाल तर वाचाल असे आपण अनेकवेळा ऐकले आहे.यामधून आपल्याला वाचनाचे महत्व समजते.वाचनाने आपल्याला ज्ञान मिळते.वाचन माणसाला चांगला माणूस बनविते. जीवनाला योग्य दिशा मिळते.वाचनाने योग्य-अयोग्य याची जाणीव होते.म्हणून वाचाल तर वाचाल असे आपण म्हणतो.वाचनाने माणसाचा सर्वांगीण विकास होतो.वाचनामुळे वाचकावर चांगले संस्कार होऊन योग्य परिवर्तन होते.यामुळे विविध प्रकारच्या योग्य मूल्यांची रुजवणूक होते.आजचे विद्यार्थी हे उद्याचे आपल्या देशाचे भावी नागरिक व आधारस्तंभ आहेत. शिक्षणातून देशाचे सुजान नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजने अतिशय महत्वाचे आहे.वाचन हे पुस्तकांचे ,मासिकांचे ,कादंबरीचे ,वर्तमानपत्रांचे असे विविध घटकांचे असते.वाचनातून ज्ञानाबरोबर आनंद मिळतो . त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होणे गरजेचे असते. वाचनामुळे व्यक्तीला आपले विचार प्रभावीपणे मांडता येतात.कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी वाचन महत्वाचे असते.वाचनाने माणसाचा सर्वांगीण विकास होतो.त्यासाठी बालवयात शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृती रुजण्यासाठी निरंतर वाचन उपक्रमात वाचनाचा लळा ,
फुलवी जीवनाचा मळा.
या उपक्रमाची निवड करून यशस्वीपणे राबविला.
शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य विकसित होणे महत्वाचे असते.प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांची योग्य जडणघडण होण्यासाठी वाचन खूप महत्त्वाचे आहे.वाचन ही एक चांगली सवय व छंद आहे.म्हणून वाचनाची आवड लहानपणापासून जोपासली गेली पाहिजे.प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांच्या वाचनाचा पाया पक्का होणे गरजेचे असते.आज संगणकाच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचन कमी होताना दिसून येते.त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती विकसित होणे गरजेचे होते. म्हणून आमच्या शाळेत अनेक विद्यार्थ्यांचे विविध बाबींचे वाचन घेतले असता अनेक विद्यार्थ्यांचे वाचनात मन रमत नव्हते.त्यांना वाचनाचा खूप कंटाळा होता.वाचनासाठी पुस्तके हातात धरावीत असे त्यांना वाटत नव्हते.जरी वाचन करण्यास दिले तरी ते मर्यादित स्वरूपाचे वाचन केले जात होते. वाचलेले पुस्तक किंवा पुस्तकातील वाचलेला मजकूर यामधील माहिती सारांश रूपाने सांगता येत नव्हते.विद्यार्थी समजपूर्वक वाचन करत नव्हते.त्यामुळे त्यांचे ज्ञान वाढलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. त्यांचा आत्मवविश्वास वाढणे गरजेचे होते.विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व विचारशक्तीला वाव मिळत नव्हता.शाळेच्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आवडीनिवडीची पुस्तके नव्हती.शाळेचे ग्रंथालय समृद्ध नव्हते. ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी पुरेशा प्रमाणात पुस्तके नव्हती.लोकसहभागातून ग्रंथालयात विद्यार्थ्यांना वाचनासाठी त्यांच्या आवडीची पुस्तके घेऊन ग्रंथालय व विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध करणे गरजेचे होते. ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागल्यावर आपण अन्न खातो त्याप्रमाणे आपल्या बुद्धीचा विकास होण्यासाठी आपल्याला वाचनाची गरज असते. म्हणून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजण्यासाठी याबाबत पालकांशी सविस्तर चर्चा करून त्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले.म्हणून विद्यार्थ्यांचा अवांतर वाचनाचा पाया पक्का होण्यासाठी हा उपक्रम राबविला.
आजच्या बदलत्या जगात विद्यार्थ्यांना आनंदाने यशस्वी जीवन जगण्यासाठी वाचनाचा छंद प्राथमिक शिक्षणात जोपासला गेला पाहिजे .वाचनाने समाजात वावरण्याचे ज्ञान मिळते.वाचनाने विद्यार्थ्यांचे मन एकाग्र होते.आपण कधीही एकटे नाही, पुस्तके आपले मित्र आहेत ही भावना विद्यार्थ्यांमध्ये तयार होणे महत्त्वाचे होते. वाचनाने विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होत असतो. वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार होऊन योग्य परिवर्तन होते.संस्काराची शिदोरी वाचनाने मिळते.
उदा-श्यामची आई ही कादंबरी वाचल्यावर विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार होतात. ही कादंबरी वाचताना विद्यार्थी तसेच इतर व्यक्ती भावनिक होतात.विविध मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजली जातात.विविध प्रकारच्या बोधकथा वाचनाने विद्यार्थ्यांना जीवनातील व्यवहारज्ञान समजते.तसेच जीवनातील ताणतणाव कमी होऊन विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य विकसित होते.विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते.नवनवीन गोष्टी शिकायला मिळून जीवनाला एक नवी दिशा मिळते.वाचनाने वाचकांचे आयुष्य बदलू शकते. आपल्याला जीवनाचे ध्येय गाठता येते एवढे सामर्थ्य वाचनात असते.वाचनाने माणसाची , देशाची ,जगाची प्रगती होते.जगात वाचन संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे.वाचनामुळे आपले अनुभवविश्व आणि भावविश्व वाढते. यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी बनते.वाचनातून उद्याचे लेखक ,कवी ,साहित्यिक निर्माण होतात.सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन कमी होत आहे .म्हणून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढणे महत्वाचे आहे.वाचनाने माणसाची प्रगती होते. विद्यार्थी हे आपल्या देशाची खरी संपत्ती आहे.त्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. उद्याचे देशाचे सुजान नागरिक निर्माण होऊन त्यांचा विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजने अतिशय महत्वाचे होते.म्हणून या नवोपक्रमाची निवड करून यशस्वीपणे राबविला.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.
लोकसहभागातून शाळेचे ग्रंथालय समृद्ध झाले.विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्यांची रुजवणूक झाली.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजली.यासाठी विविध विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ यांचेशी या वाचन उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली होती.आपल्या जीवनाचा विकास होण्यासाठी जीवनात वाचन किती महत्वाचे आहे हे पटवून दिले.म्हणूनच वाचाल तर वाचाल असे आपण म्हणतो हे त्यांना समजावून दिले.त्यांनी या वाचन उपक्रमासाठी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांशी त्यांच्या आवडी निवडीनुसार चर्चा केली.तुम्हाला चित्रे आवडतात का ? तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची चित्रे आवडतात? तुम्हाला गीते आवडतात का?तुम्हाला कोणकोणती गीते आवडतात?तुम्हाला गोष्टी आवडतात का?तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आवडतात? याबाबत त्यांच्याशी मुक्तपणे, आनंदाने संवाद साधून चर्चा केली. विद्यार्थ्यांनी आम्हाला अनेक चित्रे ,गाणी ,गोष्टीची पुस्तके आवडतात हे अतिशय आनंदाने सांगितले.त्यासाठी त्यांच्या आवडीनिवडीला प्राधान्य देऊन त्यानुसार पुस्तकांची निवड केली.यामध्ये प्रथम प्राणी ,पक्षी यांविषयीची पूरक वाचनाची चित्रमय पुस्तके आणली.विद्यार्थ्यांना ही चित्रमय पुस्तके पाहून आवडू लागली. विविध प्रकारची चित्रे पाहून त्यांना या पुस्तकांचे आकर्षण वाटू लागले.त्यांनी आनंदाने ही पुस्तके पाहिली. या पुस्तकात चित्राखाली जाड टाईप मध्ये थोडा मजकूर होता.चित्रे पाहून विद्यार्थी या चित्राखाली असणारा मजकूरही वाचू लागले.या चित्रांबाबत त्यांच्याशी आनंदाने चर्चा केली.त्यांनी या चित्राबाबत माहिती सांगण्याचा प्रयत्न केला.त्यांनी या चित्रांबाबत स्वतःच्या शब्दात थोडक्यात माहिती सांगितली.विद्यार्थ्यांनी सांगितलेली माहिती आनंदाने स्वीकारून त्यांचे वेळोवेळी अभिनंदन करून वाचनासाठी प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह आणखी वृद्धिंगत केला.त्यांना घरी वाचनासाठी आठवड्यातून एकदा पुस्तके दिली.यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची लहान लहान चित्रमय गोष्टींची पुस्तके पूरक वाचनासाठी दिली. विद्यार्थ्यांना गोष्टी नेहमी आवडत असतात.या पुस्तकाचे आठवड्यातून एकदा प्रदर्शन भरवून त्यांना वाचनासाठी शाळेत व घरी पुस्तके उपलब्ध करून दिली.विद्यार्थ्यांनी आनंदाने या पुस्तकांचे वाचन केले .वाचन केलेल्या पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली .त्यांनी या पुस्तकात असलेली माहिती सारांश रूपाने आनंदाने स्वतःच्या शब्दात सांगितली.त्यांचे वेळोवेळी कौतूक करून त्यांना वाचनासाठी आणखी प्रेरणा देऊन प्रोत्साहित केले. शाळेतून विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिलेली पुस्तके देवघेव बाबत आणि लोकसहभागातून मिळालेल्या विविध प्रकारच्या पुस्तकांच्या शाळेत स्वतंत्रपणे सविस्तर नोंदी ठेवल्या . विद्यार्थी अवांतर वाचनासाठी आनंदाने पुस्तके घेऊन वाचू लागले.त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.पूरक वाचनाकडून विद्यार्थी वाचनाकडे वळू लागले.पुस्तक वाचून झाल्यावर पुन्हा दुसऱ्या पुस्तकाची वाट पाहू लागले.त्यांना वेळोवेळी वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके दिली.त्यांनी ही सर्व पुस्तके आनंदाने वाचली.त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा