जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
---------------------------------------------
शाळेची स्थापना -2 जून 1946
--------------------------------------
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत खालील प्रमाणे विविध उपक्रम राबविले-
1) शाळा व्यवस्थापन समिती , माजी विद्यार्थी ,स्वयंसेवी संस्था यांच्या लोकसहभागातून म्हणजे मिशन आपुलकीतून शाळा इमारत दुरुस्ती ,पेंटिंग ,चित्रकाम करून शाळा डिजिटल करून शाळेत बेंचेस , वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन ,परसबाग ,कुंडीप्रकल्प राबवून शाळेत निसर्गरम्य आनंददायी वातावरण निर्माण केले.विद्यार्थी घरी विविध झाडांची रोपे तयार करून वृक्षारोपण करतात.वाढदिवसास झाडाचे रोप भेट देतात.शाळेची परसबाग पाहून विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराजवळ परसबाग निर्मिती केली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे राष्ट्रहिताचे मूल्य रुजविले.
2) लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा सुविधा निर्माण केली.
3)लोकसहभागातून प्रत्येक वर्गात एल.ई.डी. ,संगणक व सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य उपलब्ध करून त्यांचा नियमित प्रभावीपणे वापर केला.विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे धडे दिले जातात.विविध प्रकारचे खेळ व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
4)जगातील विविध देशातील शिक्षक , शिक्षणतज्ञ यांचेशी विद्यार्थी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून विविध शैक्षणिक बाबींवर मुलाखत घेऊन चर्चा करतात तसेच विचारांची देवाण घेवाण करतात.
5)पाठ्यपुस्तकातील लेखक ,कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला हा उपक्रम राबवून लेखक व कवी यांचेशी विद्यार्थी प्रत्यक्ष आनंदाने संवाद साधून विविध विषयांवर माहिती मिळवली.
6)कोरोनाकाळापासून निरंतर वाचन उपक्रम राबविला जातो. त्यामध्ये ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी व शाळेत पुस्तक प्रदर्शन आणि इतर सुट्टीतही वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली.त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजली आहे.यामुळे लोकसहभागातून ग्रामस्थ ,माजी विद्यार्थी व इतर अनेकांकडून शाळेच्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांना वाचनासाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची पुस्तके मिळाली.या उपक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दखल घेऊन शासनाच्या राज्य पातळीवरील जीवन शिक्षण मासिकातून राज्यात प्रसिद्धी दिली.तसेच या उपक्रमाची टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दखल घेऊन देशपातळीवर प्रसिद्धी देऊन अभिनंदन केले . आकाशवाणी पुणे यांनीही या उपक्रमास बातमी पत्राद्वारे प्रसिद्धी दिली.
7)जिल्हा ,तालुका ,राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ऑनलाईन स्पर्धेत विदयार्थी आनंदाने कृतिशील सहभाग घेऊन यश मिळविले.
8) शाळेत कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली.त्यामुळे विद्यार्थ्यांनीही आपल्या घराजवळ सेंद्रिय खत निर्मिती केली आहे.
9)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा