मुख्य सामग्रीवर वगळा

वाचन उपक्रम - तुकाराम अडसूळ

श्रवण ,भाषण , वाचन , लेखन हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची कौशल्य आहेत .त्यातील वाचन हे कौशल्य अतिशय महत्त्वाचे आहे . 'वाचाल तर वाचाल 'असे आपण वेळोवेळी ऐकले आहे . आज सोशल मिडियामुळे वाचनसंस्कृती कमी होताना दिसते . आपल्या जीवनात वाचन किती महत्त्वाचे आहे हे समजले पाहिजे. वाचनाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते .वाचनातून उत्कृष्ट लेखक तयार होतात .मोठेपणी केलेल्या वाचनाने विद्वत्ता येत असेल तर लहानपणी केलेल्या वाचनाने  बालवाचकांच्या मनावर चांगले संस्कार होतात .उदा- श्यामची आई या कादंबरीमधील आई श्यामवर जेव्हा एक एक संस्कार करते तेव्हा श्यामची आई वाचणार्‍या छोट्या मुलांवरही ते संस्कार होत असतात . वाचनाने माणूस बहुश्रुत होतो  .ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी आपल्याला वाचनाने मिळतात . वाचनाच्या छंदातून  साऱ्या विश्वाची ओळख होत असते. वाचन केल्यामुळे आपल्याला आपले विचार उत्कृष्टपणे मांडता येतात .'ग्रंथ हे गुरु आहेत 'असे आपण म्हणतो . वाचनातून आपल्या जीवनाची योग्य जडणघडण होत असते .जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्याला चांगले लिहिता येते. पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून घेऊन जाणारी जहाजे आहेत .आपल्या जीवनात अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य आपल्याला  वाचनातून मिळते. वाचनामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते . म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये  वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी  मी कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या वेगळ्या उपक्रमाची निवड केली .

वाचन हे विद्यार्थ्यांच्या लहानपणापासून राबविले गेले पाहिजे .मग ते वाचन अक्षरांचे , शब्दांचे ,वाक्यांचे , परिच्छेदाचे , उताऱ्याचे , पुस्तकाचे , वर्तमानपत्राचे  किंवा इतर कोणत्याही प्रकारचे असो फक्त वाचन करणे महत्त्वाचे असते .त्यासाठी वाचनाची आवड लहानपणापासून निर्माण झाली पाहिजे .म्हणून  कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा नवोपक्रम कोरोनाबाबत सर्व नियम पाळून योग्य ती दक्षता घेऊन डोंगराळ भागातील  आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी येथे  वर्षभर राबविला .माझ्याकडे इयता दुसरी व चौथी हे दोन वर्ग आहेत .या उपक्रमात इयता दुसरीमधील सात पैकी सात आणि इयता चौथीमधील दहा पैकी दहा विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले . कोरोना काळात शाळा बंद शिक्षण चालू यामध्ये मी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  विविध उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने  राबविले.विविध उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत नेऊन त्यांचा  कृतिशील सहभाग घेतला. त्यांपैकी ' 'ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी 'हा एक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने  उत्कृष्टपणे राबविला .

 विविध प्रकारच्या पुस्तकांचे  प्रदर्शन  वेळोवेळी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी भरविले . या उपक्रमासाठी पुस्तकांची निवडीसाठी विविध चित्रमय बालकथा पुस्तके , मागील अनेक वर्षातील  किशोर मासिके काही मित्रांकडून  उपलब्ध केली,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडून मे महिन्यात आलेली विविध प्रकारची  अवांतर वाचनाची  चित्रमय गोष्टीच्या पुस्तकामध्ये उड्या मारणारे पायमोजे ,विटीदांडू ,आमचा पतंग ,पोपट आणि मांजर ,झोका ,मावशीचे पायमोजे ,कपिला गायीचे वासरू ,आजीचा चष्मा ,,,,,,,अशी मिळालेली सर्व  पुस्तके निवडली . तसेच लोकसहभागातून विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार  मिळवलेली विविध प्रकारची चित्रमय माहिती पुस्तके , महान आदर्श राष्ट्रीय नेते , प्राणी, पक्षी माहिती , गोष्टी , सणसमारंभ ,पर्यावरण ,  गोष्टीची व इतर माहितीची  पुस्तके , श्यामची आई  ही कादंबरी , ग्रंथालयातील विद्यार्थ्यांच्या आवडीची विविध चित्रमय  पुस्तके अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा या उपक्रमात  समावेश करून निवड केली. 

विद्यार्थ्यांनी या पुस्तकांची पाहणी केली .त्यामधून त्यांच्या आवडीची पुस्तके वाचण्यासाठी निवडली .यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाचलेली पुस्तके एकमेकांना अदलाबदल करून  वाचनासाठी दिले.पुस्तके देवघेवसाठी आठवड्यातील शनिवार निश्चित केला.प्रत्येक आठवड्याला शनिवारी  विद्यार्थ्यांच्या घरी  जाऊन कोरोनाबाबत दक्षता घेऊन  पुस्तकांची देवाण-घेवाण करून त्याबाबत स्वतंत्र रजिस्टर मध्ये पुस्तकांच्या सवित्तर नोंदी ठेवल्या व त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सह्या घेतल्या.चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचनासाठी किशोर मासिकाचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला . 'श्यामची आई 'ही कादंबरी वाचनासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना दिली.

वाचनामुळे घरातील वातावरण बदलले. वाचनाने विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होऊन ते आई वडिलांना व समाजातील सर्वांना मदत करू  लागले. वाचनासाठी दिलेली पुस्तके विद्यार्थी मुदतीच्या आत वाचन करत असे .विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाविषयी त्यांना माहिती विचारली असता त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची सवित्तर माहिती आनंदाने सांगितली.
आई ,वडील बहीण, भाऊ हे सुद्धा विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिलेली पुस्तके  आवडीने वाचू लागली . त्यामुळे घरामध्ये वाचन संस्कृती वाढली. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.एक पुस्तक वाचल्यावर विद्यार्थी पुन्हा दुसऱ्या पुस्तकाची वाचनासाठी आतुरतेने  वाट पाहू लागले. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढले . विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढून त्यांना आनंद मिळाला . कोरोनाकाळात शाळा बंद असल्या तरी या उपक्रमात पुस्तके विद्यार्थ्यांचे एक प्रकारे चांगले गुरु ठरले.  विद्यार्थ्यांचे मन वाचनात रमू  लागले.वाचनाने त्यांच्यामध्ये  योग्य संस्कार , प्रगल्भता  ,सर्जनशीलता निर्माण होण्यास मदत झाली. वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती ,कल्पनाशक्ती ,संवेदनशीलता अशा अनेक बाबींचा विकास होण्यास उपयोग झाला.  वाचनामुळे विद्यार्थी भूतकाळात जाऊन  वर्तमानकाळाशी सांगड घालू लागले .पुस्तकांच्या वाचनामुळे कोरोनाकाळात विद्यार्थ्यांमध्ये आनंदाने जीवन जगण्याचे सामर्थ्य निर्माण होण्यास मदत झाली. वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांबरोबर घरातील सर्वांना समजले .विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री केली .पुस्तक हे एक आपले गुरू आहेत हे त्यांना समजले. 
वर्षभर प्रत्येक विद्यार्थ्यांने  वीसपेक्षा जास्त पुस्तके वाचली आहेत.  वाचनाने विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढली त्यामुळे  विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढला . वाचनामुळे विद्यार्थी आपले विचार ठामपणे मांडू लागले.या अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य परिवर्तन झाल्याचे पालकांनी वेळोवेळी सांगितले.आमची शाळा चौथीपर्यंत असल्यामुळे चौथीचे विद्यार्थी परगावी पाचवीला जाणार आहेत. त्यामुळे त्यांना  किशोर मासिक वाचनासाठी या सर्व विद्यार्थ्यांची किशोर मासिकाची वर्गणी मी स्वतः  भरली आहे . या उपक्रमाचा मला मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे हा  उपक्रम कायमस्वरूपी राबविणार आहे.
 लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
प्रभारी मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर .
मो-७५८८१६८९४८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏