मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शुभविवाहात ग्रंथालयास पुस्तके वाटप

अहमदनगर-पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील  महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी आपल्या कन्येच्या शुभविवाहात  लोकसहभाग म्हणजे मिशन आपुलकीतून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यासाठी नऊ शाळांच्या  ग्रंथालयास विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची एक हजार पुस्तके भेट देऊन राज्यात एक वेगळा उत्कृष्ट  प्रेरणादायी उपक्रम राबिवला . ग्रंथालयाची ही पुस्तके महाराष्ट्र राज्याचे मा.शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे ,अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील ,अहमदनगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस ,छत्रपती संभाजीनगर डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.विशाल तायडे ,जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी अरुण धामणे ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे राष्ट्रीय संयोजक विक्रम अडसूळ ,निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे ,माजी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांचे हस्ते वा...