गितेवाडी शाळेला पी.एल.सी. प्रकल्पात महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र शासनाच्या पी.एल.सी(प्रोजेक्ट लेट्स चेंज) .स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाचे शाळा समन्वयक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अतिशय उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राज्यातील टॉप शंभर शाळेमध्ये गीतेवाडी शाळेची टॉप पन्नास शाळेत निवड झाल्यामुळे या प्रकल्पात गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत मंत्रालयाजवळ यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर ,शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल ,या प्रकल्पाचे राज्य समन्वयक रोहित आर्या यांनी प्रदान केला. या प्रकल्पात राज्यात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील १०० शाळांची आणि ३०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा या कार्यक्रमात शिक्षणमंत्री दिपक केसरकर, प्रधान शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांचे हस्ते गौरव करण्यात आला.या विद्यार्थ्यांमध्ये गीतेवाडी शाळेतील इयत्ता तिसरीमधील श्वेता संजय गिते ,वैष्णवी रामकीसन ससाणे ,आराध्या पद्माकर गिते यांनी या प्रकल्पाचे शाळेतील मार्गदर्शक समन्वयक शिक्षक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अतिशय उत्कृष्ट कार्य केल्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्या कार्याबद्दल राज्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांना या प्रकल्पात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे उपक्रमशील शिक्षक शाळा समन्वयक तुकाराम अडसूळ यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यास शाळेतील शिक्षक समन्वयक तुकाराम अडसूळ ,नवनाथ आंधळे ,मुलींचे पालक संजय मोहन गिते ,ज्ञानदेव ससाणे ,संजय धोंडिबा गिते उपस्थित होते .शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या पी.एल.सी.(प्रोजेक्ट लेट्स चेंज)स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात राज्यातील ६४,१९८ शाळांनी नोंदणी करून सहभाग घेतला होता .यामध्ये राज्यातील ५९,३१,४१० विद्यार्थ्यांनी कृतिशील सहभाग घेतला होता.विविध सोशल मिडियावर विद्यार्थी विडिओ शेअर झालेली संख्या १५,००,००० होती. महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजीमुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या पी.एल.सी.(प्रोजेक्ट लेट्स चेंज )स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा दोन ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता कारण ह्या प्रकल्पात विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंव्हा संदेश देणारे दूत नसून कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर आहेत .या प्रकल्पाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री श्री दिपक केसरकर आणि उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत यांनी केला होता. वाटेल तिथे बेफिकिरपणे कचरा टाकणाऱ्यांना आणि थुंकणाऱ्यांना शाळेतील विद्यार्थी (स्वच्छता मॉनिटर) जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून दुरुस्त करून घेत होते. स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे सफाई करणे किंव्हा भाषणबाजी नसल्यामुळे मुलांना यामध्ये समाधान मिळाले आणि त्यापुढे घटनेचे विवरण सांगतानाचे मजेशीर व्हिडीओ करून सोशल मीडियाला शेअर केले होते.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व समन्वयक महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून याबाबत मार्गदर्शन केले.जागोजागी निष्काळजीपणे कोठेही कचरा टाकणाऱ्या व थुंकणाऱ्या लोकांना विद्यार्थ्यांनी (स्वच्छता मॉनिटर ) थांबविले . शिक्षक तुकाराम अडसूळ नियमितपणे विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून, त्यांचे अनुभव ऐकून त्यांना दोन महिने सतत दररोज मार्गदर्शन करत होते.या कार्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील ,
जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस ,पाथर्डी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल भवार ,विस्तार अधिकारी लहू भांगरे ,केंद्रप्रमुख सचिन शेरकर यांनी गीतेवाडी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा