🙏सर मी शाळेत येणार 🙏
आमच्या शाळेतील पहिलीमधील एक चिमुकला पळत चालल्यामुळे पडला त्यामुळे त्याच्या पायाला थोडी जखम झाली.त्याला प्राथमिक उपचार करून दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी औषधोपचार केले.त्याला मी दवाखान्यातून आणल्यावर विश्रांती घेण्यासाठी त्याच्या आईकडे घरी सोडले.तू आज आराम कर तुला बरे वाटल्यावर शाळेत ये.तुला माझ्याबरोबर शाळेत घेऊन येत जाईन व शाळा सुटल्यावर घरी सोडविल. आईनेही सांगितले तू आज आराम कर परंतु या चिमुकल्याने आईचे न ऐकता मला सरांच्या बरोबर शाळेत जायचे .मी पुन्हा सांगितले तू आज आराम कर .त्याने सांगितले सर मी घरी अराम करणार नाही मी तुमच्या बरोबर शाळेत येणार मी घरी राहणार नाही.अखेर मला त्याचे ऐकावे लागले त्याला शाळेत घेऊन आलो.सर्व मुलांच्यात त्याचा आजार विसरून आनंदाने राहिला.शाळा सुटल्यावर त्याला कडेवर घेऊन त्याच्या घरी सोडले.आई घरी वाट पहात होती.आईने व शेजारील लोकांनी खूप खूप धन्यवाद दिले.मी माझे कर्तव्य केले.लेकरांसाठी जेवढे शक्य असेल तेवढे करत राहणार आहे आहे.
सेवेत आल्यापासून शाळेत कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची इजा अथवा जखम झाली की लगेच प्रथमोपचार करून जवळच्या दवाखान्यात घेऊन जात असतो.
सर्वांना धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा