निष्काळजीमुक्त महाराष्ट्र हे उद्दिष्ट समोर ठेवून गेली दोन महिने महाराष्ट्र शासनाच्या पी.एल.सी .स्वच्छता मॉनिटर उपक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने या उपक्रमात अतिशय उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राज्यातील टॉप शंभर शाळेमध्ये गीतेवाडी शाळेची टॉप पन्नास शाळेत निवड झाली आहे. त्यामुळे या उपक्रमात गीतेवाडी शाळेची शासनाच्या राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पी.एल.सी.
स्वच्छता मॉनिटर उपक्रमात जिल्हा परिषदेच्या गीतेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटर म्हणून प्रभारी मुख्याध्यापक व समन्वयक राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट कार्य केले. या उपक्रमात शाळेतील शिक्षक नवनाथ आंधळे यांचेही मार्गदर्शन मिळाले. राज्यातील ६४,१९८ शाळांनी या उपक्रमात नोंदणी करून सहभाग घेतला. राज्यातील ५९,३१,४१० विद्यार्थ्यांनी यामध्ये कृतिशील सहभाग घेतला .विविध सोशल मिडियावर या उपक्रमाचे विद्यार्थी अनुभवांचे विडिओ मोठ्या संख्येने शेअर केले होते.त्यासाठी सलग दोन महिने विद्यार्थी व शिक्षक परिश्रम घेत होते.
महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजीमुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या पी.एल.सी.(P. L. C.) स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा दोन ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता कारण ह्या प्रकल्पात विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंव्हा संदेश देणारे दूत नसून कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर आहेत.या प्रकल्पाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री श्री दिपक केसरकर आणि उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत यांनी केला होता. वाटेल तिथे बेफिकिरपणे कचरा टाकणाऱ्यांना आणि थुंकणाऱ्यांना शाळेतील विद्यार्थी (स्वच्छता मॉनिटर) जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून दुरुस्त करून घेत होते. स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे सफाई करणे किंव्हा भाषणबाजी नसल्यामुळे मुलांना यामध्ये समाधान मिळते आणि त्यापुढे घटनेचे विवरण सांगतानाचे मजेशीर व्हिडीओ करून सोशल मीडियाला शेअर करणे त्यांच्या आवडीचे कार्य बनून जाते. पहिल्या टप्प्यात असे १५ लाखहुन अधिक विद्यार्थ्यांचे विडिओ शेअर झाले आहेत.या टप्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत ६४ हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी १०० शाळांचा गौरव मुंबई येथे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , शिक्षणमंत्री ,शिक्षणसचिव यांचे हस्ते एका विशेष समारंभात केला जाणार आहे.यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने उल्लेखनीय कार्य केल्यामुळे टॉप पन्नास मध्ये आली असून राज्यातील सर्वोत्तम १०० च्या यादीत निवड झाली आहे.शाळेला या उपक्रमात शासनाच्या वतीने राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व शाळेतील या उपक्रमाचे समन्वयक महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ आणि शिक्षक नवनाथ आंधळे यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून याबाबत मार्गदर्शन केले.जागोजागी निष्काळजीपणे कोठेही कचरा टाकणाऱ्या व थुंकणाऱ्या लोकांना विद्यार्थ्यांनी (स्वच्छता मॉनिटर ) थांबविले . शाळेतील या उपक्रमाचे समन्वयक राज्य पुरस्कारप्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी नियमितपणे विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून, त्यांचे अनुभव ऐकून त्यांना दोन महिने सतत दररोज मार्गदर्शन केले. त्याबाबत विद्यार्थ्यांचे व्हिडीओ निर्मिती करून सोशाल मिडीयावर अपलोड केले .या उपक्रमामुळे गावात ,परिसरात योग्य परिवर्तन झाले.याबद्दल अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,
जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील ,
जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस ,
पाथर्डी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल भवार ,विस्तार अधिकारी लहू भांगरे ,केंद्रप्रमुख सचिन शेरकर ,गीतेवाडीचे सर्व पालक ,ग्रामस्थ यांनी गीतेवाडी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा