अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ हे राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रमाची महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी कोल्हापूर येथील राष्ट्रीय शिक्षण संमेलनात विशेष अभिनंदन केले आहे.
कृतिशील शिक्षक महाराष्ट्रच्या (ATM)वतीने २० मे ते २१ मे रोजी
राष्ट्रीय शिक्षण सम्मेलन कृतिशील शिक्षक महाराष्ट्रचे राष्ट्रीय संयोजक विक्रम अडसूळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.या राष्ट्रीय शिक्षण संमेलनात राज्यातील शिक्षकांनी आपले नाविन्यपूर्ण उपक्रम सादरीकरण केले.गीतेवाडी शाळेत उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ हे कोरोनाकाळापासून आजअखेर निरंतर वाचन उपक्रम ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम नेहमी राबवित आहेत. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे ,राज्याचे मा.शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे ,राज्याचे मा.शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,SCERT चे अधिकारी योगेश सोनवणे आणि राज्यातील शिक्षकांसमोर गीतेवाडी शाळेतील निरंतर वाचन उपक्रमाचे उत्कृष्टपणे सादरीकरण केले. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी शिक्षक तुकाराम अडसूळ यांच्या या उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.त्यांनी तुकाराम अडसूळ यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन हा उपक्रम अतिशय उत्कृष्ट असल्याचे सांगितले.शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी या निरंतर वाचन उपक्रमाबद्दल स्वतःच्या हस्ताक्षरात अतिशय उत्कृष्ट अभिप्राय दिला.मा.शिक्षण संचालक डॉ.गोविं नांदेडे ,शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,SCERT चे योगेश सोनवणे ,कृतिशील शिक्षक महाराष्ट्र चे राष्ट्रीय संयोजक विक्रम अडसूळ सर ,ज्योतीताई बेलवले यांनीही या उपक्रमाबद्दल तुकाराम अडसूळ यांचे विशेष अभिनंदन करून अतिशय उत्कृष्ट अभिप्राय दिले. तुकाराम अडसूळ यांनी ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या घरी विविध अवांतर पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची अनेक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली.विद्यार्थ्यांनी आनंदाने या पुस्तकाचे वाचन केले.कोरोनाकाळानंतर शाळा सुरू झाल्यावर पुन्हा शाळेत आठवड्यातून एकदा पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी विविध पुस्तके उपलब्ध करून दिली.विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले.तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत पुन्हा ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या घरी पुस्तकांचे प्रदर्शन भरवून त्यांना वाचनासाठी विविध पुस्तके उपलब्ध करून दिली .सध्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत .सध्या हा उपक्रम ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी यशस्वीपणे राबविला जातोय .सध्या विद्यार्थ्यांच्या घरी आठवड्यातून एकदा विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली आहेत.विद्यार्थी आनंदाने या पुस्तकांचे वाचन करत आहे.त्यांच्या बरोबर त्यांचे बहिणभाऊ पण ही पुस्तके वाचन करत आहेत. सुट्टीच्या काळात या उपक्रमाने सदुपयोग होत आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजली आहे.या उपक्रमामुळे लोकसहभागातून म्हणजे मिशन आपुलकीतून शाळेला अनेक पुस्तके मिळाली आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील ,माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस ,संगमनेर डायट चे प्राचार्य भगवान खारके ,पाथर्डी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल भवार ,विस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ ,केंद्रप्रमुख राजेंद्र बागडे ,गीतेवाडीचे सर्व ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे विशेष अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा