अहमदनगर जिल्हा परिषद आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४७ देशातील भूमिपुत्रांनी स्थापन केलेले ग्लोबल नगरी फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यातील काही शाळा निवडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांना वेळोवेळी उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते.यामध्ये आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी शाळेचा समावेश आहे.अमेरिकेत स्थायिक झालेले ग्लोबल नगरीचे अविनाश दादा मेहेत्रे यांनी अमेरिकेतून येवून आज आमच्या शाळेला भेट दिली.आमच्या शाळेत कोरोनाकाळात ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविला. या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्याने वर्षभरात किमान ३० पुस्तकांचे वाचन केले. या उपक्रमामुळे आमच्या शाळेला आतापर्यंत लोकसहभागातून अनेक पुस्तके मिळाली.आज अमेरिकेतील अविनाश दादा मेहेत्रे यांनी लोकसहभाग म्हणून विद्यार्थ्याना वाचनासाठी शाळेच्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांच्या आवडीची पाच हजार रुपयांची पुस्तके दिली. यावेळी आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना विविध ऑनलाईन स्पर्धेत जिल्हा ,राज्य ,राष्ट्रीय पातळीवर प्रमाणपत्रे मिळाली आहेत ,या विद्यार्थ्याना ही प्रमाणपत्रे देवून सन्मानित करण्यात आले.तसेच आमच्या शाळेची विद्यार्थिनी श्रुती पोटे ही आनंद विद्यालय चिचोंडी मध्ये पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयात पहिली आली होती .तिचाही सन्मान करण्यात आला. तसेच शाळेत विद्यार्थ्याना ,शिक्षकांना ,ग्रामस्थांना अमेरिकेतील शिक्षण पद्धतीबाबत अनमोल मार्गदर्शन केले.त्यांच्या शुभहस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच ,उपसरपंच ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. आमच्या शाळेच्या उपक्रमात ग्रामस्थांना नेहमी सहभागी केले जाते.अविनाश दादा यांना ग्रामस्थांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांचे अभिनंदन केले.अमेरिकेतील अविनाश दादा ,ग्लोबल नगरी परिवार आणि जिल्हा परिषद अहमदनगर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी ,सर्व अधिकारी यांना आमच्या शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा