पर्यावरण संवर्धन ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी - सुनेत्रा पवार ,बारामती येथे पर्यावरण परिषद संपन्न
:एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया (Environmental Forum Of India), बारामती आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून व ६ जून रोजी राज्यस्तरीय पर्यावरण अभ्यास आणि परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी Environmental forum of India बारामतीच्या अध्यक्षा तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्याला व सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे असून ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.त्यासाठी आपण सर्वांनी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. बारामती येथील पर्यावरण अभ्यास व पर्यावरण परिषदेत पर्यावरण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे, पर्यावरण मंडळाचे सल्लागार जलदुत राज देशमुख ,पर्यावरण मंडळाचे सचिव वनश्री मोरे ,अहमदनगर जिल्ह्याचे पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम अडसूळ,पर्यावरण मंडळाचे मार्गदर्शक चिपळूणचे धीरज वाटेकर ,विलास महाडिक यांचेसह राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनी, पर्यावरणप्रेमी उपस्थित राहून कृतिशील सहभाग घेतला.या पर्यावरण परिषदेत बारामती येथील शारदा प्रांगणात मातीच्या विविध पर्यावरण पूरक खेळांची जत्रा भरविण्यात आली होती.तंत्रज्ञानाच्या युगात आपली नाळ मातीशी पुन्हा एकदा जोडली जावी यासाठी मातीतल्या खेळांची जत्रा भरविण्यात आली होती. निसर्गाशी एकरुप होऊन जगुया अशी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे. याच संकल्पनेला अनुसरूनच एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामतीमध्ये उत्कृष्ट कार्य करतेय. बारामती येथील शारदा प्रांगणात आणि वृद्धाश्रमात पर्यावरण मंडळाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. वृद्धाश्रमात वृक्षमित्र स्व.आबासाहेब मोरे यांची जयंती साजरी करून त्यांचे समरणार्थ वृद्धश्रमास एक एल. ई. डी.भेट देण्यात आला. स्व.आबासाहेब मोरे यांच्या पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल अनेकांनी आपले विचार मांडले.
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती या संस्थेच्या पर्यावरण संवर्धन ,प्रदूषण निवारण बाबत कार्याचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. बारामती येथे निसर्गरम्य पर्यावरणपूरक वातावरण तयार केले आहे. आपल्याला आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन केलेले बारामतीत दिसून आले. सुनेत्रा ताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण परिषद झाली.या पर्यावरण परिषदेत माधुरी काकडे , प्रियवंदा तांबोटकर , तुकाराम अडसूळ ,बाळासाहेब चोपडे ,गौतम सावंत ,सुनील माळी ,सुनील आहेर ,कमलाकर मोरे ,स्वाती चव्हाण यांनी पर्यावरणावर आपले विचार मांडले. यावेळी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामतीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संवर्धनबाबत सविस्तर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी या परिषदेत राज्यभरातून आलेल्या पर्यावरणप्रेमींच्या पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल विशेष अभिनंदन केले. बारामतीला पर्यावरणपुरक बारामती तयार केल्याबद्दल देशाचे नेते शरद पवार ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार मानले.उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की “प्रत्येकाने काम करत असताना स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी वेळ काढणे गरजेचं आहे. कारण पर्यावरण संवर्धन झाले तर आपण चांगले जीवन जगणार आहोत”. देवराई प्रकल्पासंदर्भात देखील फोरम विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पर्यावरण परिषदेत पर्यावरण मंडळाच्या वतीने सुनेत्रा ताई पवार यांना पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.तसेच पर्यावरण मंडळाचे मार्गदर्शक राज देशमुख यांनाही पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.या पर्यावरण अभ्यास, पर्यावरण परिषदमध्ये सहभागी झालेल्या सर्व व्यक्तींना सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल विशेष प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले . यावेळी पर्यावरण मंडळाचे धीरज वाटेकर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.त्यानंतर पर्यावरण पूरक आदर्श काटेवाडी गावाला भेट देवून पर्यावरण बाबत माहिती घेण्यात आली. पर्यावरण पूरक गाव कसे तयार झाले ,गावाला देश पातळीवर पर्यावरण पूरक आदर्श गाव पुरस्कार मिळाला. याबद्दल काटेवाडीचे सरपंच विद्याधर काटे व ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धन बाबत सविस्तर माहिती दिली.गावातील सर्व बाबींची पाहणी केली. तसेच बारामती येथील रॉक गार्डनला भेट देवून तेथील विविध औषधी वनस्पतींची माहिती घेण्यात आली.बारामती येथील राज्यस्तरीय पर्यावरण अभ्यास पर्यावरण परिषदेत अहमदनगर जिल्ह्यातून तुकाराम अडसूळ , राम वाकचौरे,शोभा भालसिंग ,छाया रजपूत ,मीनाक्षी जाधव ,प्रकाश केदारी यांनी कृतिशील सहभाग घेतला.या पर्यावरण अभ्यास, पर्यावरण परिषदेतून राष्ट्रहितासाठी ,समाजहितासाठी पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा