जिल्हा परिषद अहमदनगर आणि ग्लोबल नगरी फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांना वेळोवेळी विविध उपक्रमांद्वारे मार्गदर्शन केले जाते.यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील १०० शाळांची तीन वर्षापूर्वी निवड करण्यात आली आहे.४७ देशातील अहमदनगर जिल्ह्यातील भूमिपुत्रांना अमेरिकेतील ग्लोबल नगरीचे अध्यक्ष डॉ.किशोर गोरे यांनी एकत्र केले आहे. अमेरिकेतून आज ग्लोबल नगरीचे सचिव रोहित दादा काळे ,अविनाश दादा मेहेत्रे , अमेरिकेत स्थायिक झालेल्या माजी खा. स्व.शंकरराव काळे यांची कन्या लता ताई शिंदे , उद्योजक शिंदे साहेब ,मोरोक्को देशातील रचना ताई फासाटे हे भारत भेटीवर आले.त्यांचे ग्लोबल नगरीत निवड झालेल्या शाळेतील शिक्षकांनी स्वागत केले.आज त्यांनी अहमदनगर मध्ये आमच्याशी विविध विषयावर संवाद साधून चर्चा केली.परदेशात राहून भारतमातेची सेवा करणाऱ्या ग्लोबल नगरीतील अहमदनगरच्या भूमिपुत्रांच्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन.👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
ग्लोबल नगरीचे अध्यक्ष डॉ.किशोरदादा गोरे यांनी अमेरिकेतून सर्वांशी ऑनलाईन संवाद साधून विविध बाबींवर चर्चा केली.यापूर्वी कधीही समोरासमोर भेटलो नव्हतो वेळोवेळी ऑनलाईन भेटत होतो,आज समक्ष भेट झाली.
समक्ष भेटीचा आनंद अवर्णनीय असतो.
ग्लोबल नगरी फाऊंडेशन अमेरिका समवेत निवड झालेल्या शाळेतील काही उपक्रमशील शिक्षक बंधू भगिनी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा