शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमात उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल तुकाराम अडसूळ यांचा शिक्षण संचालकांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान
अहमदनगर - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांचे हस्ते पंढरपूर येथे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिक्षण संमेलनात विशेष प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. कोरोना काळात विद्यार्थ्याना कृतीतून शिक्षण आणि शिक्षणातून आनंद मिळण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील तत्कालीन संचालक दिनकर टेमकर यांनी राज्यात ३ जुलै २०२१ पासून शिकू आनंदे उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे विक्रम अडसूळ आणि ज्योती बेलवले यांनी कार्य केले. या राज्यस्तरीय शिकू आनंदे उपक्रमात उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी १० जुलै २०२१ रोजी राज्यातील विद्यार्थ्याना पर्यावरण संवर्धन बाबत कृतिशील मार्गदर्शन केले.या उपक्रमात त्यांनी सेंद्रिय परसबाग कशी तयार करावी ,कुंडीतील फुलझाडांची लागवड कशी करावी ,घरच्या घरी रोपे कशी तयार करावीत , आपल्याला ,आपल्या भावी पिढीला आणि सर्व सजीवांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण किती महत्वाचे आहे ,पर्यावरणबाबत अभ्यासक्रमात आलेले पाठ ,कविता या बाबत कृतिशील मार्गदर्शन करून त्यांचे महत्व समजावून दिले.त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन ,प्रदूषण निवारण हे मूल्य रुजण्यास मदत झाली.शिकू आनंदे उपक्रमात राज्यातील विद्यार्थ्याना उत्कृष्ट कृतिशील मार्गदर्शन केल्याबद्दल पंढरपूर येथे राष्ट्रीय शिक्षण संमेलनात त्यांना शिक्षण संचालकांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.तुकाराम अडसूळ यांनी त्यांच्या गितेवाडी शाळेत शिक्षणातून पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण राबवून पर्यावरण पूरक शाळा तयार करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे मूल्य रुजविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा