२५ व २६ डिसेंबरला राळेगणसिद्धी येथे पाचवे राज्यस्तरीय पर्यावरणसंमेलन अहमदनगर - स्वर्गीय ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने पाचवे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली २५, २६ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न होत आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्वांना आदर्श गाव ‘राळेगणसिद्धी क्षेत्रभेट’ संधी उपलब्ध होणार आहे. राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या सभागृहात ‘कोरोना’चे सर्व नियम पाळून संपन्न होणाऱ्या या संमेलनात मर्यादित प्रवेश असणार आहे. शनिवार, २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता नावनोंदणी होईल ,सकाळी १० वाजता संमेलनाध्यक्ष ‘पद्मभूषण’ अण्णासाहेब हजारे यांच्या उपस्थितीत श्रीसाईबाबा संस्थान ट...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ