शिक्षक परिचय,
तुकाराम तुळशीराम अडसूळ ,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी,
ता पाथर्डी जि अहमदनगर,
१) एकूण सेवा २५ वर्ष
२)लोकसहभागातून जेऊर व गितेवाडी शाळेचे परिवर्तन करून गावाला शाळेचा अभिमान वाटेल अशी शाळा तयार केली.
३)जिल्हाधिकारी ,जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ,जिल्हा परिषदेचे सी.ई. ओ ,जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ,शिक्षण संचालक ,शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या शाळेला भेटी देऊन कार्याचे अभिनंदन केले
४)शाळेची विद्यार्थी पट संख्या वाढली त्यामुळे शिक्षक संख्या वाढली,
५)शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कायम१०० टक्के लागला.याबद्दल २००६ मध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
६)पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण या राष्ट्रहिताच्या कार्यासाठी सन २०१६ पासून राज्यातील शिक्षकांचे दरवर्षी पर्यावरण संमेलन आयोजित करतात
.७) ऑक्टोबर २०१८ मध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण अभ्यासासाठी भूतान देशात जाऊन विविध शाळा ,खेडेगाव ,शहरे ,शेती ,नद्या यांना भेटी देऊन ,विद्यार्थी ,ग्रामस्थ ,शिक्षक यांच्या मुलाखती घेऊन अभ्यास केला.भूतान देशाची राजधानी थिंपु येथे भारतीय दूतावास मधील कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत विचार मांडले ,७)जानेवारी २०२० मध्ये हैद्राबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी परिषदेत जगातील विविध देशातील शिक्षकांपुढे इंग्रजी विषयावर प्रोजेक्ट सादर केला.
८)आतापर्यंत विविध विषयांवर सहा पुस्तकांचे राज्याचे शिक्षण संचालक यांचे हस्ते प्रकाशन केले ,
९)सन २०१९ मध्ये कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय शिक्षण संमेलनात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत प्रेझेंटेशन केले.
१०)जून २०२१ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मध्ये गणित विषयाची कार्यपुस्तिका तयार करण्यासाठी शासनाने निवड केली.
११)जुलै २०२१ मध्ये शिकू आनंदे या राज्यस्तरीय उपक्रमात राज्यातील विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने विशेष कृतील मार्गदर्शन केले.
१२)शिक्षणासाठी गरीब कुटुंबातील चार विद्यार्थी दत्तक घेतले.
१३)कोरोनाकाळात जून २०२०पासून गुगलमीटवर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तास घेऊन वेळोवेळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या गृहभेटी देऊन सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रकारे ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण चालू ठेवले.
१४)कोरोनाकाळात सन जून २०२० पासून ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविली.
१५)कोरोनाकाळात रोपे विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबवून वृक्षारोपण उपक्रम घरोघरी व्यापक प्रमाणात राबवून वृक्षसंवर्धन केले.
१६) महाराष्ट्र शासन पाठयपुस्तक मंडळ पुणे यांना विज्ञानातून पर्यावरण संवर्धन प्रदूषण निवारण हा नवोपक्रम सादर केला त्या उपक्रमाचा राज्यात दुसरा क्रमांक आला.त्याबद्दल पाठयपुस्तक मंडळाने विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
मिळालेले पुरस्कार-
१)महाराष्ट्र शासनाच्या वनीकरण विभाग अहमदनगर च्या वतीने २०१७ ,२०१८ ,२०१९ मध्ये शासनाच्या चार कोटी ,१३ कोटी ,३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विशेष प्रमाणपत्र देऊन सलग तीन वर्षे सन्मानित केले.
२)२०१९ मध्ये किनो एज्युकेशन सोसायटी नाशिकच्या वतीने समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे हस्ते किनो शिक्षा गौरव पुरस्कार मिळाला.
३)विविध संस्थांचे जिल्हा ,राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
४)निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा सन २०१९ मध्ये राज्यस्तरीय पर्यावरण मित्र व सन २०२० मध्ये राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार मिळाला .
५)सन २०२० मध्ये पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत च्या वतीने राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार मिळाला .
६)सन रोटरी क्लब अहमदनगर च्या वतीने २०१८ मध्ये नेशन बिल्डर अवॉर्ड मिळाले.
७) रोटरी क्लब मुबंई च्या वतीने सन २०२० मध्ये राज्यस्तरीय नेशन बिल्डर अवॉर्ड मिळाले.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे इयता तिसरी ते पाचवीच्या गणित कार्य पुस्तिका निर्मितीबाबत पुस्तिकेतील आम्हा सर्व गणित विषय सदस्यांना मार्गदर्शन करताना SCERT पुणे च्या गणित विभागप्रमुख मा.रत्नप्रभा भालेराव मॅडम
८)पर्यावरणातील कार्याची दखल घेऊन सन २०२० मध्ये स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटर च्या वतीने पर्यावरणातील ग्लोबल टीचर अवॉर्ड ( आंतरराष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार) देण्यात आला.
९) ५ ऑक्टोबर २०२० रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनी स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटरच्या वतीने शैक्षणिक व पर्यावरण कार्याबद्दल विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
१०)५ सप्टेंबर २०२१ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेने जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा