तुकाराम तुळशिराम अडसूळ
प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी
ता.पाथर्डी जि. अहमदनगर
एकूण सेवा २५ वषे
उल्लेखनीय कार्य
१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोसपुरी ता.नगर येथे सन २००४ मध्ये इयता पहिली ते सातवी मधील एकूण २५० विद्यार्थ्यांना लोकसहभागातून बेंचेस घेतले.
२) शिष्यवृत्ती परीक्षेत वर्गाचा निकाल नेहमी १०० टक्के लागला त्याबद्दल सन २००६ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ,सी.ई. ओ,उपाध्यक्ष ,शिक्षणाधिकारी यांनी विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले,
३) लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर ता.नगर या शाळेचे परिवर्तन करून पर्यावरणपूरक सुंदर शाळा तयार केली. शाळेचा विद्यार्थी पट वाढला आठ शिक्षकी शाळा दहा शिक्षकी झाली ,गावाला शाळेचा अभिमान वाटू लागला ,ग्रामसभेने अभिनंदनाचा ठराव घेतला ,
या शाळेला जिल्हाधिकारी ,जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ,सी.ई. ओ.,जिल्हा पोलीस अधीक्षक ,सिव्हिल सर्जन ,शिक्षणाधिकारी ,जिल्हा उपवनसंरक्षक अशा अनेक अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी देऊन कार्याचे अभिनंदन केले.
४)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी शाळेचे लोकसहभागातून परिवर्तन करून पर्यावरणपूरक सुंदर शाळा तयार केली.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा उपक्रम शाळा व गाव पातळीवर राबविला ,
पर्यावरणप्रेमी विद्यार्थी तयार केले,
५)जेऊर व गितेवाडी शाळा परिवर्तनासाठी स्वतःच्या वेतनातील काही रक्कम खर्च केली.
६)दिवाळीच्या सुट्टीत राज्यातील शिक्षकांसाठी पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन घेण्यासाठी वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या बरोबर परिश्रम घेतात.
७ ) सन २०१८ मध्ये पर्यावरण अभ्यासासाठी भूतान देशात जाऊन आठ दिवस पर्यावरणाचा अभ्यास केला केला ,भूतान देशाची राजधानी थिंपु येथे भारतीय दूतावास मध्ये पर्यावरणाबाबत विचार मांडले ,
८)महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी ,तेरा कोटी व तेहतीस कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सक्रिय सहभाग घडवून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शासनाच्या वनविभागाच्या वतीने सतत तीन वर्षे विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
९)कोरोनाकाळात सुट्ट्या लागल्यापासून विद्यार्थ्यांचे गुगलमीटवर उत्कृष्ट ऑनलाईन अध्यापन ,शंभर टक्के विद्यार्थी हजर असतात तसेच गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन केले जाते ,
१०)व्हिडीओ कॉन्फरन्स व पाठयपुस्तकातील लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रम दरवर्षी राबविला जातो.
११) सन २०२० मध्ये स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटरचा पर्यावरणाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
१२)पर्यावरणात करीत असलेल्या कार्याबद्दल हिवरे बाजार येथील प्रयास फौंडेशन च्या वतीने २०१९ मध्ये पद्मश्री पोपट पवार साहेब यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
१३)नाशिक जिल्ह्यातील किनो एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मालेगाव येथे २०१९ मध्ये समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
१४)पर्यावरणात करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन अनेक वेळा सन्मानित करण्यात आले.
१५)शाळेतील विद्यार्थी तालुका ,जिल्हा ,राज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ऑनलाईन स्पर्धेत यश मिळवितात .
१६)रोटरी क्लब अहमदनगर कडून २०१८ मध्ये जिल्हास्तरीय नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मान
१७)२०२० मध्ये रोटरी क्लब मुंबई कडून राज्यस्तरीय नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मान
१८)जून २०२१ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत अभ्यासक्रम मंडळावर निवड करण्यात आली.
१९)जून २०२१ मध्ये शाळा स्वछता कृती आराखड्यात संगमनेर डायट मध्ये तज्ञ मार्गदर्शन म्हणून निवड
२०)१०जुलै २०२१ रोजी शासनाच्या वतीने शिकू आनंदे या राज्यस्तरीय ऑनलाईन उपक्रमात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणावर ऑनलाईन मार्गदर्शन केले.
२१)जानेवारी २०२० मध्ये हैद्राबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी परिषदेत जगातील विविध देशातील शिक्षकांपुढे इंग्रजी विषयावर प्रोजेक्ट प्रेझेंटेशन बाबत शासनाने निवड केली ,हैद्राबाद येथे हे प्रेझेंटेशन केले.
२२)२०१९मध्ये नाशिक येथे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय शिक्षण संमेलनात राज्यातील शिक्षकांना शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत प्रेझेंटेशन केले.
२३) आतापर्यंत एकूण सहा पुस्तकांचे स्वतः लेखन करून ते राज्याचे शिक्षण संचालक यांचे हस्ते प्रकाशित केले आहे .
२४)गरीब कुटुंबातील चार विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
२५) शिक्षण व पर्यावरण कार्याबद्दल विविध संस्थांचे जिल्हा ,राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा