अहमदनगर--आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटरच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला आहे. स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेंटर ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशातील सहसंबंध सुधारणे ,शैक्षणिक ,सामाजिक , पर्यावरण संवर्धन ,प्रदूषण निवारण ,विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक मूल्य रुजणे यासाठी वेळोवेळी विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. इको ट्रेनिंग सेंटर स्वीडन चे भारतातील समन्वयक नाशिकमधील तंत्रस्नेही शिक्षक प्रदीप देवरे यांचे मार्गदर्शनाखाली भारतातील शिक्षकांना जागतिक पातळीवर या उपक्रमात ,स्पर्धेत सहभागी होण्याची वेळोवेळी संधी मिळते .जुलै महिन्यात इको ट्रेनिंग सेंटरच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर वृक्षारोपन उपक्रम आयोजित केला होता.या आंतरराष्ट्रीय उपक्रमात तुकाराम अडसूळ यांनी कृतिशील सहभाग घेऊन अनेक झाडांचे वृक्षारोपन केले .त्याबद्दल इको ट्रेनिंग सेंटर च्या वतीने ऑनलाईन पद्धतीने तुकाराम अडसूळ यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ऑगस्ट महिन्यात स्वीडन मधील इको ट्रेनिंग सेंटरच्या वतीने एका पर्यावरण स्थळास भेट देऊन त्याविषयी थोडक्यात माहिती लेखन करणे हा उपक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केला होता. या आंतरराष्ट्रीय उपक्रमात तुकाराम अडसूळ यांनी कृतिशील सहभाग घेतला.त्याबद्दल इको ट्रेनिंग सेंटरच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर तुकाराम अडसूळ यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल झालेल्या गौरवाबद्दल तुकाराम अडसूळ यांचे विविध अधिकारी ,शिक्षक ,ग्रामस्थ ,पालक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा