,🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
,🙏,,,,,,,,,भूतान देशातून 🙏
आज भूतान देशातील पारो या शहराची पर्यावरण संवर्धन पाहणी केली ,
पारो या शहराचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे ,
,पारो हे शहर पारो नदीच्या काठावर वसलेले आहे ,
,पारो नदिला कायम् स्वच्छ पाणी असते ,
जमिनिची झिज होऊ नये म्हणून नदीच्या दोन्हीही बाजूने दगडाची संरक्षक भिंती बांधलेली आहे .
नदीचे पाणी कायम स्वच्छ असते ,
याचे कारण नदीच्या पाण्यात कोणीही कपड़े ,जनावरे धुत नाही ,
या नदीचे पाणी दूषित होणार नाही ते कायम स्वच्छ राहील यासाठी येथील प्रत्येक नागरिक जागरुक आहे ,
या शहरातील रस्ते स्वच्छ व सुंदर आहे ,
हिमालय पर्वतात असल्यामुळे येथील वनस्पति सुचिपर्णी व घरे उतरत्या छपराची आहेत ,
हिमालयात असल्यामुळे हा देश निसर्गरम्य आहे ,
या देशातील घराना खूप मोठया खिड़क्या आहेत ,
या देशातील प्रत्येकजन राहदारिच्या नियमांचे कड़क पालन करतो ,
या देशात चोऱ्या होत नाहीत ,
या शहराच्या मध्यभागातून ही पारो नदी वाहते ,
संस्कृती व त्यांची जीवन पद्धती प्रत्यक्ष भेटी देवून पाहिली ,भूतान देशातील अनेक नागरिक ,व्यावसायिक ,नोकरवर्ग ,लामा व वेगवेगळे गाइड यांच्याशी भूतान देशातील संस्कृतीची चर्चा केली ,सकाळी भूतमधील म्युझियमला भेट देवून पाहणी केली ,
येथील घराना सारखे काही भागाचे कोरिव काम केलेले आहे ,
या लोकांचे मुख्य अन्न सकाळी रोटी व संध्याकाळी भात भाजी असते ,
या देशात महिलांचा विविध लघुउद्योगमध्ये महिलांचा पुढाकार दिसून आला ,
येथील खूप कमी लोक शेती करतात कारण जमीन कमी त्यामुळे पर्यटकापासुन जास्त उत्पन्न मिळते ,
या देशात 2008 पासून लोकशाही राजाने लोकशाही आनली ,
परंतु राजाला या देशात फार मोठे अधिकार आहेत ,
राजाचा निर्णय अंतिम असतो ,
निवडणुका पाच वर्षाने होवून पंतप्रधान व मंत्रिमंडळ तयार होते ,ते सरकार म्हणून काम करतो परंतु त्यासाठी राजाची परवानगी लागते ,या देशात राजाला फार मोठे स्थान आहे ,
राजाविषयी जनतेत प्रचंड आत्मियता दिसून येते ,
प्रत्येक घरात व हॉटेल मध्ये राजाचा फ़ोटो लावलेला असतो ,
या भूतान देशात 350 वर्षापूर्वीचा रिंगपुंग नावाचा किल्ला आजही या भूतान देशाच्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे ,या किल्ल्याचे बांधकाम दगडी व लाकड़ी असून कोठेही खिळे नाहीत ,
भूतान मधील म्यूजियम मध्ये विविध जंगली प्राण्यांचे मुखवट आहेत,
तसेच आतापर्यंत येथील राजाने ज्या देशात भेटी दिल्या त्याबाबत विविध फ़ोटो व विविध देशातील राष्ट्रपती , पंतप्रधान यांनी भेटी दिल्या त्याबाबत फ़ोटो आहेत ,विविध पक्षांची चित्रे आहेत
तसेच मोठे भव्य किचू टेंपल आहे या टेंपलचे बांधकाम 7 व्या शतकात करण्यात आले आहे ,
हे टेंपल या देशाच्या इतिहासाची साक्ष देत आहे ,
वाहतुकीच्या सोईसाठी पारो येथे भूतान देशातील एक सुंदर विमानतळ आहे,
येथे काही सपाट भाग असल्यामुळे येथे विमानतळ तयार करण्यात आले आहे ,
येथील लोकांचे एक मोठे वैशिष्टय म्हणजे त्यांनी कितीही काम केले तरी त्यांना कामाचा कधीही कंटाळा न येता ते नेहमी आनंदी असतात ,
या देशातील प्रत्येकजन राहदारीच्या नियमांचे कड़क पालन करतात
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा