कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे योगदान
अहमदनगर -- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपक्रमशील पर्यावरणप्रेमी शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी आपल्या देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीसांबरोबर कार्य करून आपले योगदान दिले आहे.डिसेंबर २०१९ मध्ये चीन मधील वुहान प्रांतातून सुरू झालेला कोरोना विषाणू आपल्या देशात ,राज्यात ,जिल्ह्यात येईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल .आज दळवळणाच्या सोयीमुळे जगातील अनेक देशातील लोक नोकरी ,शिक्षण ,व्यापार ,पर्यटन ,,,,,,,अशा अनेक कारणांमुळे विविध देशात प्रवास करतात ,या प्रवासाबरोबर कोरोना विषानूचाही प्रसार झाला व त्याचा संसर्ग विविध लोकांना झाला .चीनमध्ये या कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून सोशल मिडिया व वृत्तपत्रातून त्यासंबंधी दररोज बातम्या येत होत्या ,उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ व त्यांचे शाळेतील सहकारी शिक्षक नवनाथ आंधळे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू बाबत वेळोवेळी सविस्तर माहिती सांगून तसेच त्यासंबंधी विद्यार्थ्यांना काही व्हिडीओ दाखवून जनजागृती केली .विद्यार्थ्यांमार्फत पालकांमध्येही कोरोना विषाणू बाबत जनजागृती केली ,त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घेतात .
कोरोना विषाणूचा रुग्ण आपल्या राज्यात सापडल्यावर शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या . त्याचा एक भाग म्हणून रस्त्यावरून जाणाऱ्या व विविध ठिकाणावरून येणाऱ्या लोकांची आणि वाहनांची तपासणी करण्यासाठी विविध ठिकाणी रोडवर चेकपोस्ट तयार केले .या चेकपोस्टवर पोलिसांच्या समवेत आपत्ती व्यवसथापन कार्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या . यामध्ये गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ व इतर काही शिक्षकांची पाथर्डी येथील तहसीलदार यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार पाथर्डी तालुक्यातील मिरी चेकपोस्ट वर नेमणूक केली .
काही शिक्षकांना सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत तर काही शिक्षकांना रात्री आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत अशी ही ड्युटी होती .
तहसीलदार पाथर्डी यांच्या आदेशानुसार तुकाराम अडसूळ यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२० रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत ,
३० एप्रिल २०२० रोजी रात्री आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत ,
मे महिन्यात ४ मे २०२० रोजी रात्री आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत ,
२० मे २०२० रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत ,
२२ मे २०२० रोजी रात्री आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत ही ड्युटी प्रामाणिकपणे बजावली आहे ,
कोरोना विषाणू हे एक फार मोठे जागतिक संकट आहे.तसेच ते आपल्या देशावर आलेले फार मोठे संकट आहे.या संकट कार्यात आपण सर्वांनी योगदान दिले पाहिजे .कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येणाऱ्या लोकांची तपासणी तुकाराम अडसूळ , इतर शिक्षक व पोलिसांनी चेकपोस्टवर केली . पोलिसांबरोबर चेकपोस्टवर आपत्ती व्यवस्थापन मध्ये या देशहिताच्या कार्यात तुकाराम अडसूळ यांनी प्रामाणिकपणे आपले कार्य करून योगदान दिले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
देशहिताच्या कार्यात चांगले काम करता आले याचे एक आत्मिक समाधान मिळाल्याचे तुकाराम अडसूळ यांनी सांगितले आहे .उपक्रमशील शिक्षक
तुकाराम अडसूळ हे शैक्षणिक कार्याबरोबर वेळोवेळी देशहितासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणाचे महत्वाचे कार्य करत असतात .या देशहिताच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा