मुख्य सामग्रीवर वगळा

प्रदूषण टाळू या .... ...आरोग्याची काळजी घेऊ या

लेख 

प्रदूषण टाळू या ,,,,,,,आरोग्याची काळजी घेऊ या 

शब्दांकन 
तुकाराम तुळशिराम अडसूळ
     मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता .पाथर्डी जि. अहमदनगर
मो ७५८८१६८९४८
पिनकोड ४१४१०६


आपली लोकसंख्या वाढली .त्याबरोबर लोकांच्या  गरजा वाढल्या .या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाने विविध यंत्रांचा ,तंत्रज्ञानाचा शोध लावला .या नादात  प्रदूषण वाढले ,हे प्रदूषण थांबविण्यासाठी    माणसाने जेवढे प्रयत्न करणे गरजेचे होते तेवढे झाले नाही .प्रदूषण वाढत चालले आहे .हवा ,पाणी ,अन्न या सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत .त्यांचे प्रदूषण वाढत आहे .त्यामुळे सजीवांच्या जगण्यासाठी बाधा निर्माण होत आहे .प्रदूषण ही एक जागतिक समस्या आहे .म्हणून प्रदूषण थांबविणे ही काळाची गरज आहे .प्रदूषण निवारण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे .या पृथ्वीवर मानवासह सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे .सर्व सजीवांना शुद्ध हवा ,शुद्ध पाणी ,प्रदूषणमुक्त अन्न मिळाले .परंतु आज हवा ,पानी ,अन्न यांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे .त्यामुळे विविध प्रकारचे आजार माणसांना  व इतर प्राण्यांना  होत आहेत .हे प्रदूषण  जर आपण वेळीच थांबविले नाही तर माणसांच्या जीवितास माणसेच  जबाबदार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . 

म्हणून प्रदूषण टाळण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील  आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी येथे  विविध उपक्रम राबवून प्रदूषण निवारण केले आहे .प्रदूषण निवारण करण्याचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये तसेच अनेक ग्रामस्थांमध्ये  रुजविले आहे . गावातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून प्रदूषण निवारण केले आहे.यासाठी आम्ही आमच्या शाळेत प्रदूषण टाळण्यासाठी  पुढीलप्रमाणे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत .
प्रदूषणमुक्त सण समारंभ  -- हवा ही सर्व सजीवांची सर्वात महत्वाची मूलभूत गरज आहे .
हवेचे प्रदूषण कारखान्यातील धूर ,फटाके मधील धूर ,विविध वाहनांचा धूर यामुळे होते .म्हणून हवेचे  प्रदूषण  थांविण्यासाठी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करण्याचे महत्त्व पटवून दिले  .आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू  श्वसनासाठी आवश्यक असतो .प्रदूषणामुळे हवेतील प्राणवायू कमी होऊन कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण वाढत आहे .त्यामुळे हवेचे तापमान वाढत आहे म्हणजे उष्णता वाढत आहे .यामुळे मानवाला ,प्राण्यांना 
खूप त्रास होत आहे.तसेच श्वसनाचे विविध  विकार होत आहेत .हवेचे प्रदूषण थांविण्यासाठी विद्यार्थी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करतात ,ग्रामस्थांनाही वेळोवेळी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करण्याचे महत्व पटवून दिले आहे .ग्रामस्थही प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करतात .

१) वृक्षारोपण -- झाडांमुळे आपल्याला शुद्ध हवा मिळते.झाडांमुळे हवेचे प्रदूषण थांबते . आपल्याला प्राणवायू  म्हणजे ऑक्सिजन  देण्याचे महत्वाचे कार्य झाड करत असते .
या ऑक्सिजनची किंमत आपल्याला दवाखान्यात गेल्यावर ज्यावेळी ऑक्सिजन लावला जातो त्यावेळी समजते. म्हणून झाडे लावण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले .शाळेत विविध प्रकारची प्रचंड झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आहे .
शाळेतील परिसर निसर्गरम्य केला आहे .
 शाळेतील विद्यार्थ्यांना पाच ते वीस झाडांची रोपे वाटप केली ,माध्यमिक शाळेतील विद्यार्थी ,ग्रामस्थ यांना शाळेच्या वतीने प्रत्येक कुटुंबास पाच झाडांची रोपे वाटली .ही सर्व रोपे विद्यार्थ्यांनी शेताच्या  व घराच्या  परिसराजळ लावून त्यांचे संगोपन केले आहे .शाळेत वर्षभर होणाऱ्या विविध  कार्यक्रमात  सर्वांना वृक्षारोपणासाठी झाडाचे रोप भेट देण्यात येते .तसेच विद्यार्थ्यांचे व आजी माजी सैनिकांचे वाढदिवस शाळेत झाडाचे रोप देऊन साजरे केले जातात .दरवर्षी वृक्षारोपणासाठी सुमारे दोन हजार झाडांची रोपे शाळेमार्फत विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना वाटली जातात  . म्हणून हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी वृक्षारोपणाचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे .

२) पाणी प्रदूषण --हवेनंतर पाणी ही सजीवांची मूलभूत गरज आहे . नदीच्या ,ओढ्याच्या पाण्यात दूषित पाणी सोडणे , कचरा टाकणे ,सांडपाणी सोडणे ,कपडे धुणे ,जनावरे धुणे ,गाड्या धुणे ,भांडी धुणे यामुळे  पाणी प्रदूषण होते .हे प्रदूषण शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पावसाळ्यात नदीवर ,ओढयावर नेऊन दाखवून माहीती दिली . हे दूषित पाणी आपण पितो त्यामुळे कावीळ ,कॉलरा यासारखे आजार आपल्याला  होतात हे त्यांना समजावून दिले  . विद्यार्थी शाळेत  पाणी  पिताना ओगराळ्याने घेतात .पिण्याच्या पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ केली जाते .
 प्रदूषण थांबविण्यासाठी आपण या बाबी टाळल्या पाहिजेत हे त्यांना समजावून दिले .त्यांना ते पटले .विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती केली.सांडपाण्याची  साठी पालकांनी घराजवळ शोषखड्डे घेतले आहेत व त्या शोषखड्डयाजवळ वृक्षारोपण केले आहे .त्यामुळे ते ओढयाचे  नदीचे  व इतर ठिकानावरील पाण्याचे प्रदूषण होऊ देत नाही .

३) प्लॅस्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या -- प्लॅस्टिक च्या पिशवीमुळे प्रदूषण होते .प्लॅस्टिक च्या  पिशव्यामुळे व प्लॅस्टिक मुळे जनावरांच्या  जीवितास धोका निर्माण होऊन जनावरे मरतात. गावातील सर्व प्रकारचे  प्लॅस्टिक वेळोवेळी गोळा केले . प्लॅस्टिकच्या पिशवी ऐवजी कापडी पिशव्या ,कागदी पिशव्यांचा वापर  ,प्लॅस्टिक च्या विविध वस्तू वापर न करणे विषयी विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली .शाळेत कापडी व कागदी पिशव्या तयार करण्याची कार्यशाळा घेतली ,शाळेतील सर्व विद्यार्थी कागदी व कापडी पिशव्या बनवतात .या पिशव्या बाल आनंद मेळाव्यात व गणित विज्ञान प्रदर्शनात मांडून प्रदूषण थांबविण्यासाठी जनजागृती केली .विद्यार्थी प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिक च्या विविध वस्तू वापरत नाही .

४) अन्न प्रदूषण --हवा ,पाणी नंतर सजीवांची अन्न ही मूलभूत गरज आहे .सर्व सजीवांना प्रदूषणमुक्त अन्न मिळाले पाहिजे .तसेच अन्न खाल्ल्यानंतर उरलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे .अन्न इकडे तिकडे कोठेही टाकू नये .शाळेतील विद्यार्थी उरलेले अन्न पशु पक्षांना देतात . उरलेल्या अन्नासाठी तशी स्वतंत्र व्यवस्था शाळेत केली आहे . तसेच विद्यार्थी  जेवताना ताटात शक्यतो अन्न शिल्लक ठेवत नाही . पिकांवर ,भाजीपाल्यांवर कीटकनाशके फवारणी केली जाते ,रासायनिक खते वापरली जातात त्यामुळे अन्नाचे प्रदूषण होऊन माणसे व जनावरे यांना विविध आजार होतात .हे प्रत्यक्ष शेतातील पिकांना क्षेत्रभेट देऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली .विद्यार्थ्यांना हे समजले.अन्नाचे प्रदूषण रोखण्यासाठी  आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे .सेंद्रिय शेतीला सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे .हे शाळेत परसबाग तयार करून दाखवून दिले .त्यामध्ये सेंद्रिय भाजीपाला केला ,तो भाजीपाला वेळोवेळी शाळेतील शालेय पोषण आहार मध्ये वापरला जातो .
तसेच शाळेत दरवर्षी सेंद्रिय भाजीपाला बाजार भरवला जातो .गावातील सर्व लोक या बाजाराला भेट देतात व भाजीपाला खरेदी करतात .यावेळी त्यांच्यामध्ये सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती केली जाते ,त्यांनाही सेंद्रिय शेतीचा महत्व समजले आहे .

५) कचरा व्यवस्थापन --कचऱ्यामुळे खूप मोठे प्रदूषण होते .म्हणून कचरा कशामुळे होतो .कचऱ्यात कोणकोणत्या बाबी असतात .याबाबत विद्यार्थ्यांना शोध घेण्यास सांगितले .  ओला कचरा व सुका कचऱ्या बाबत माहिती देऊन हा कचरा दोन कचरा कुंडीत  वेगळा ठेवला जातो . तसेच कचऱ्यापासून खत तयार केले जाते व झाडांना दिले जाते .विद्यार्थी कचरा होऊ देत नाहीत तसेच कचरा होऊ  नये म्हणून ते वही,पुस्तक यांची पाने फाडत नाहीत .

६) ध्वनी प्रदूषण -- डिजेचा  
 आवाज ,हॉर्न वाजवणे ,घरातील टी .व्ही .,टेप चा आवाज ,फटाक्यांचा आवाज जर मोठा असेल तर त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते.शाळेत विद्यार्थी व ग्रामस्थ यांना वेळोवेळी ध्वनी प्रदूषण बाबत माहिती देऊन जनजागृती केली .कारण या प्रदूषणामुळे बहिरेपणा येतो ,कानांना त्रास होतो ,ज्यांना ह्रदयविकार आहे त्यांनाही त्रास होतो.विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना या प्रदूषणाचे दुष्परिणाम समजले ते गावात डी .जे .वाजवत नाहीत व आवाजाचे प्रदूषण होऊ देत नाही .

७) भूमी प्रदूषण --जमिनीवर विविध प्रकारचा कचरा टाकल्यामुळे भूमी  प्रदूषण होते .रासानिक खते व कीटकनाशके फवारणी करताना जमिनीवर ही औषधे पडून जमिनीचे प्रदूषण होते .हे परिसर भेटीतून विद्यार्थ्यांना समजावून दिले .हे प्रदूषण थांबविण्यासाठी सेंद्रिय खते वापरण्याचे महत्व सांगुन जनजागृती केली . 
अशाप्रकारे प्रदूषण टाळण्यासाठी व रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यामध्ये जनजागृती करून प्रदूषण निवारणाचे मूल्य रुजविले .
तसेच इतर अनेक शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रदूषण रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यांविषयी मार्गदर्शन करून जनजागृती करत आहे .
तसेच राज्यातील शिक्षकांसाठी  राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत मार्गदर्शन केले जाते .
विद्यार्थी हे आपल्या देशाचे उद्याचे सुजाण नागरिक होणार आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये बालपणी जर आपण प्रदूषण थांबविण्याचे मूल्य रुजविले तर भविष्यात प्रदूषण निवारणासाठी हे फार मोठे समाजहिताचे , देशहिताचे कार्य घडेल .तसेच आपल्या भावी पिढीला आनंदाने  प्रदूषणमुक्त जीवन जगता येईल .चला तर मग आपण प्रदूषण टाळू आणि आपल्या आरोग्याची काळजी घेवू या .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏