जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी यशोगाथा
विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी
शब्दांकन
तुकाराम अडसूळ
मो .७५८८१६८९४८
अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात नगर पाथर्डी तालुक्याच्या सरहद्दीवर डोंगराळ भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.
शाळेची स्थापना २ जून १९४६ मध्ये झालेली ब्रिटिशांच्या काळात झालेली आहे.त्यामुळे शाळेची इमारत खूप जुनी आहे.गावातील लोकांनी श्रमदान करून म्हणजे शाळेसमोर पाच किमी अंतरावर असणाऱ्या डोंगरातून हे दगड घडवून ते बैलगाडी व काहींनी डोक्यावर आणून या शाळेचे बांधकाम केले आहे असे या गावातील ज्येष्ठ नागरिक नेहमी अभिमानाने सांगतात.
या शाळेत मी तुकाराम अडसूळ व माझ्याबरोबर माझे सहकारी शिक्षक नवनाथ आंधळे बदलीने २९ मे २०१८ रोजी शाळेत हजर झालो.शाळेची इमारत व परिसर पाहून याठिकाणी आपल्याला कार्य करण्यास खूप संधी ,वाव आहे अशी धारणा मनात तयार केली . अध्ययन अध्यापन साठी शाळेत पूरक वातावरण तयार करण्याचे ठरविले. लोकसहभागातून या शाळेचे परिवर्तन करून शाळा स्वच्छ ,सुंदर , निसर्गरम्य ,डिजिटल , ई लर्निग ,पर्यावरण पूरक शाळा निर्माण करण्याचा संकल्प केला.त्यासाठी माझ्या सहकारी शिक्षकाशी, शाळा व्यवस्थापन समिती , माता पालक ,शिक्षक पालक या समितीमधील सर्व सदस्य ,गावातील सरपंच ,उपसरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य ,ग्रामस्थ ,पालक आणि शाळेचे अनेक माजी विद्यार्थी यांचेशी याबाबत चर्चा केली.सर्वांनी लोकसहभागातून शाळा विकास करण्यासाठी लोकसहभाग देण्यास तयारी दर्शविली व सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले .
आम्ही त्याप्रमाणे लगेच तयारीला लागलो. गावाच्या लोकसहभागाबरोबर आपणही समाजाचे देणे लागतो म्हणून आम्हा शिक्षकांचे काही आर्थिक योगदान प्रथम यासाठी दिले .विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात लोकसहभागातून केली .
१)स्वच्छता /सफाई - शाळेच्या परिसरात भिंतीला लागून खूप अडचण होती.शालेय इमारतीला लागून असलेल्या अडचणीची लोकसहभागातून गावातील एक जे.सी.बी. व एक ट्रॅक्टर आणून तसेच त्यांच्या बरोबर आम्ही दोघेही शिक्षक मिळून सर्व शालेय परिसर सफाई व स्वच्छता केली.
२) शाळेची दुरुस्ती - शाळेची इमारत खूप जुनी झालेली असल्यामुळे इमारतीला अनेक ठिकाणी मोठे छिद्र आणि भेगा पडल्या होत्या .काही ठिकाणी भिंत पडलेली होती.शाळा इमारतीमध्ये बाहेरून व आतून अनेक बिळे पडलेली होती.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोकसहभागातून भिंतीची दुरुस्ती केली . शाळेच्या इमारतीची सर्व छिद्रे व बिळे बुजविली.
३) शालेय स्वच्छतागृह दुरुस्ती - शाळेत मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व शौचालय आहे. मुलांच्या स्वच्छतागृहाची अत्यंत दुरावस्था झालेली होती.स्वच्छतागृहाची भिंत पडलेली होती.भिंतीची सर्व फरशी निघालेली होती.शोषखड्डा नादुरुस्त झालेला होता. लोकसहभागातून स्वच्छतागृहाची सर्व प्रकारची दुरुस्ती केली . स्वच्छतागृह स्वच्छ सुंदर तयार केले.सर्व विद्यार्थ्यी स्वच्छतागृहाचा नियमितपणे वापर करून आनंदाने स्वच्छता ठेवतात .
४) हॅन्डवॉश स्टेशन - शाळेत मुला मुलींना हात धुण्यासाठी लोकसहभागातून बांधकाम करून हॅन्डवॉश स्टेशन तयार केले.सर्व मुले मुली त्याचा नियमितपणे वापर करतात.
५)वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन --शाळेतील वातावरण शिक्षणाला पूरक व निसर्गरम्य करण्यासाठी लोकसहभागातून विविध प्रकारच्या झाडांची सुंदर रोपांचे गावातील पदाधिकारी ,ग्रामस्थ ,पालक ,सर्व समित्या सदस्य ,शाळेला भेट देणारे विविध अधिकारी ,शाळेतील विद्यार्थी या सर्वांच्या हस्ते शाळेत प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण करून त्या झाडांचे शंभर टक्के संवर्धन केले आहे.शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात सर्वांना झाडाचे रोप भेट देण्यात येते .विद्यार्थ्यांचे ,आजी माजी सैनिकांचे वाढदिवस झाडाचे रोप देऊन साजरे केले जातात
त्यामुळे शाळेबरोबर गावातील वातावरण निसर्गरम्य झाले आहे.वृक्षारोपण हा उपक्रम शाळेबरोबर गाव पातळीवर राबवून गावातील सर्व लोकांना वृक्षारोपणासाठी अनेक रोपे आम्ही वाटप केली.तसेच शाळेत एक मूल पाच झाडे हा उपक्रम राबविला.अनेक विद्यार्थ्यांनी पाच ते वीस झाडे शेताच्या ,घराच्या परिसरात लावून त्यांचे संवर्धन करत आहे .विद्यार्थ्यांनी झाडाशी मैत्री केली आहे .झाडांना पाणी देण्यासाठी लोकसहभागातून मोटर घेतली .
विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन हे मूल्य रुजविले आहे .शाळेत मार्फत वर्षभर वृक्षारोपण प्रकल्प राबविला जातो त्यासाठी शाळेत रोपांची नर्सरी असते .
६ ) शाळा रंगकाम ,पेंटिंग ,डिजिटल - शाळेला रंग देणे अत्यंत गरजेचे होते म्हणून लोकसहभागातून सर्व वर्गखोल्यांना आतून बाहेरून रंगकाम केले व भिंतीवर आकर्षक चित्रे काढले .
शाळा डिजिटल केली .
शाळा सुंदर व आकर्षक दिसू लागली.विद्यार्थ्यांना व गावाला शाळेचा अभिमान वाटू लागला .
७) एल .ई. डी .,संगणक व इतर साहित्य - शाळा ई लर्निग करण्यासाठी लोकसहभागातून एक एल . ई. डी.व संगणक घेतला.परिपाठ व विविध कार्यक्रमासाठी लाऊड स्पीकर घेतला .खेळासाठी लेझिम साहित्य घेतले. राष्ट्रीय नेत्यांचे काही फोटो घेतले.विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणात अभ्यासासाठी शाळेच्या मैदानात लोकसहभागातून सिमेंटचे पाच बेंच बनवून घेतले .एल. ई. डी.व संगणक या साहित्याचा नियमित वापर झाल्यामुळे मुलांना तंत्रस्नेही शिक्षण मिळू लागले.
८) कुंड्या व परसबाग - लोकसहभागातून शाळेत सिमेंटच्या काही कुंड्या आणून त्यात रोपांची लागवड केली आहे.शालेय पोषण आहारासाठी स्थानिक पातळीवर सेंद्रिय भाजीपाला मिळावा म्हणून परसबाग तयार करून त्यात विविध भाजीपाला लागवड केली आहे.विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व समजले .
९)बालवाचनालाय -विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून लोकसहभागातून बालवाचनालाय तयार केले ,विद्यार्थ्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध केली ,राज्याचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांचे हस्ते या बालवाचनाल्याचे उदघाटन केले .
विद्यार्थी आनंदाने बालवाचनालयातील पुस्तकांचे वेळोवेळी वाचन करतात .
१०) विद्यार्थी ओळखपत्रे - शाळेची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून लोकसहभागातून सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्रे तयार करून घेतली आहेत.
११) पाटी प्रकल्प ,प्रदूषण निवारण ,मूल्यवर्धन ---शाळेत विविध मूल्य ,चांगल्या सवयी ,पर्यावरण संवर्धन ,प्रदूषण निवारण ,स्वच्छता ,चांगल्या सवयी ,विविध मूल्य संबंधी संदेश लोखंडी पाटीवर लेखन करून अनेक पाट्या शाळेच्या पडवीत लावण्यात आल्या आहेत.विद्यार्थी या संदेशाचे पालन करतात. विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रमातून ही मूल्य रुजली आहेत.
१२) पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण , मुल्यवर्धन - आज संपूर्ण जगात पर्यावरण व प्रदूषण निवारण ही जागतिक समस्या निर्माण झाली आहे.पर्यावरणाचा असमतोल व प्रदूषणामुळे सर्व सजीवांच्या जगण्यास बाधा निर्माण होत आहे.पर्यावरण संवर्धन ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन उपक्रम ,प्लास्टिक चा वापर न करणे ,प्रदूषणमुक्त सणसमारंभ साजरे करणे ,पाणी दूषित न करणे ,अन्नाचे प्रदूषण न करणे ,सेंद्रिय भाजीपाला लागवड करणे ,पशू पक्षांना चारा पाणी व्यवस्था करणे ,पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यी आपल्या नातेवाईकांना पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी विविध संदेश लेखन करून पाठवतात .तसेच
विविध चांगल्या सवयींचे पालन करणे ,,,,,असे अनेक समाज व देश हिताचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविली आहेत.
१३)व्हिडीओ कॉन्फरन्स -जिल्हा परिषद व ग्लोबल नगरी फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने शाळेत व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करून विद्यार्थ्यांनी विविध देशातील मान्यवरांना लोकजीवन ,शिक्षण ,पर्यावरण ,प्रदूषण ,व्यवसाय ,शेती ,फळे यांविषयी संवाद साधून प्रश्न विचारून माहिती मिळवतात .तसेच लेखक आपल्या भेटीला या उपक्रमात पाठयपुस्तकातील विविध लेखकांशी व्हिडीओ काँफेरन्स द्वारे संवाद साधून त्या पाठविषयी अधिक माहिती घेतली जाते . हा उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येते .
१४) स्वच्छ सुंदर शाळा - शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगून व विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे मूल्य त्यांच्यामध्ये रुजविली आहेत. विद्यार्थी वही ,पुस्तक यांची पाने फाडत नाही .शाळेत व शाळेच्या परिसरात कचरा करत नाही .त्यामुळे कचरामुक्त शाळा तयार झाली आहे.तसेच ओला व सुका कचरा यांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
१५) बाजार उपक्रम - विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान ,सेंद्रिय शेती प्रत्यक्ष ज्ञान व्हावे म्हणून शाळेत सेंद्रिय भाजीपाला बाजार उपक्रम राबविला जातो .
१६) विविध स्पर्धा - विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते . विविध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची वेळोवेळी तयारी करून घेतली जाते .स्नेहसंमेलन ,बाल आनंद मेळावा ,गणित विज्ञान प्रदर्शन ,केंद्र ,तालुका पातळीवर विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे . जिल्हा परिषद आयोजित विविध स्पर्धेत ,उपक्रमात विद्यार्थी सक्रिय सहभागी होवून उत्कृष्टपणे सादरीकरण करतात. जिल्हा पातळीवर बचतगटाच्या प्रदर्शनात उत्कृष्ट कार्यक्रम सादर केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सी. ई. ओ.यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना त्यांच्या सहीचे विशेष प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव केला आहे.
१७) कोरोना विषाणू ( व्हायरस) जनजागृती व वर्क फ्रॉम होम --सध्या भारतासह संपूर्ण जगावर कोरोना विषाणू चे संकट आले आहे .चीनच्या वुहान प्रांतातून निघालेला हा आजार आपल्या देशात व आपल्यापर्यंत येईल असे स्वप्नातही कोणाला वाटले नसेल .कोरोना विषाणू हा महाभयंकर आजार चीनमध्ये सुरू झाल्यापासून आमच्या शाळेत या आजाराबाबत वेळोवेळी विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्याबाबत कोणती दक्षता घेतली पाहिजे याविषयी जनजागृती करण्यात आली ,
विद्यार्थी याबाबत दक्षता घेतात ,त्यांनी पालकांमध्ये याबाबत जनजागृती केली .पालक सुद्धा याबाबत दक्षता घेतात .कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळेला सुट्ट्या देऊन लॉकडाऊन केले तरी आम्ही सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांना वर्क फ्रॉम होम (नियमित अभ्यास) देऊन आढावा घेतो .आमच्या शाळेला
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर ,गटशिक्षणाधिकारी ,तृप्ती ताई कोलते , प्रभारी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड ,विस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ ,विस्तार अधिकारी अनिल भवार ,केंद्रप्रमुख संतोष नरवडे ,माजी केंद्रप्रमुख देविदास ससे ,केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी ,मूल्यवर्धन विभागाचे सुनील भाकरे यांनी शाळेला भेटी देवून अनमोल मार्गदर्शन करून शाळेच्या उपक्रमाबद्दल शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनीही शिक्षक ,विद्यार्थी ,ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले.
सर्वांच्या मार्गदर्शनातून लोकसहभागमधून विफ्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे.
शब्दांकन
तुकाराम तुळशीराम अडसूळ
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी
ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा