शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा तेहतीस कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात उल्लेखनीय कार्याबद्दल शासनाच्या वतीने गौरव
अहमदनगर ---अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१९ मध्ये आयोजित केलेल्या तेहतीस कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्याचे वनीकरण विभागाचे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक (भा. व .से.) आदर्श रेड्डी यांनी शासनाच्या वतीने विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे .फेब्रुवारी महिन्यात त्यांना शासनाच्या वतीने गौरविण्यात आले आहे .तुकाराम अडसूळ हे सतत पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे राष्ट्रहिताचे कार्य शाळेत आणि समाजात विविध ठिकाणी करत असतात .गीतेवाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांमध्ये व समाजात विविध ठिकाणी त्यांनी तेहतीस कोटी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन बाबत जनजागृती केली .तसेच गीतेवाडी शाळेत एक विद्यार्थी पाच झाडे ते वीस झाडे वृक्ष लागवड असा प्रकल्प राबविला .शाळेमार्फत प्रत्येक विद्यार्थ्यांला वृक्षारोपणासाठी वर्षभरात दहा ते वीस झाडांची रोपे वाटप केली .ही सर्व रोपे विद्यार्थ्यांनी घर व शेताच्या परिसरात लावून त्यांचे संवर्धन करीत आहे .तसेच गावातील ग्रामस्थ , पालक व माध्यमिक शाळेतीळ विद्यार्थी यांनाही वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन बाबत जनजागृती करून त्यांनाही अनेक झाडांची रोपे वाटप केली .त्यांनीही या सर्व रोपांचे वृक्षारोपण करून संगोपन करत आहे . शाळेत वर्षभर सर्व कार्यक्रमात तसेच विद्यार्थ्यांचे वाढदिवस निमित्त सर्वांना वृक्षरोपणासाठी झाडांची रोपे भेट देण्याचा उपक्रम राबवितात . . त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे मूल्य प्रत्यक्ष कृतीद्वारे रुजविले आहे . तुकाराम अडसूळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या तेहतीस कोटी वृक्षलागवड कार्यक्रम बाबत वृक्षारोपण करण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर आणि बार असोसिएशन अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित १६ जुलै २०१९ रोजी अहमदनगर शहरातील अनेक प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची अहमदनगर शहरातून वृक्षदिंडी आयोजनात वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या बरोबर कृतिशील पुढाकार व सहभाग घेऊन जनजागृती करून विविध ठिकाणी वृक्षारोपण केले .तसेच पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी यापूर्वी नगर तालुक्यातील जेऊर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सुमारे तीन एकर जागेत उपलब्ध सर्व शालेय परिसरात प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण करून त्या सर्व झाडांचे शंभर टक्के संवर्धन केले . पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे मूल्य त्यांनी सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे रुजविले .गीतेवाडी व जेऊर शाळेत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनसाठी कृतिशील सहभाग घेऊन शिक्षणाला पूरक असे निसर्गरम्य व आनंददायी वातावरण निर्माण केले . अहमदनगरचे जिल्हाधिकारी ,जिल्हा परिषदेचे सी .ई .ओ .जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश ,.जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक ,राज्याचे शिक्षण सहसंचालक ,सिव्हिल सर्जन,जिल्हा उपवनसंरक्षक , शिक्षणाधिकारी ,समाजसेवक ,,,, अशा अनेकांनी त्यांच्या शाळेला समक्ष भेट देऊन शाळा परिवर्तन केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे व शाळेचे विशेष अभिनंदन केले .तसेच पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी दरवर्षी ते वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या बरोबर कृतिशील सहभाग घेऊन पर्यावरण मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन आयोजन करतात .यामध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षक ,माध्यमिक शिक्षक ,उच्च माध्यमिक शिक्षक व विविध क्षेत्रातील व्यक्ती कृतिशील सहभाग घेतात . महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१७ साली ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम ,
२०१८ साली १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात शाळेत व समाजात विविध ठिकाणी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन बाबत जनजागृती करून वृक्षारोपण करून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना शासनाच्या वनीकरण विभागाच्या वतीने शासनाचे विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे .तसेच शैक्षणिक ,सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन तुकाराम अडसूळ यांना विविध प्रकारचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा