कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे योगदान
अहमदनगर -- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीसांबरोबर चेकपोस्ट वर कार्य करून आणि गितेवाडी येथे गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन त्याबाबत सर्दी ,ताप ,खोकला यांची तपासणी करून सर्वेक्षनाचे कार्य केले आहे .डिसेंबर २०१९ मध्ये चीन मधील वुहान प्रांतातून या कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून सोशल मिडिया व वृत्तपत्रातून त्यासंबंधी दररोज बातम्या येत होत्या ,उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ व त्यांचे सहकारी शिक्षक नवनाथ आंधळे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू बाबत वेळोवेळी सविस्तर माहिती सांगून तसेच त्याबाबत काही व्हिडीओ दाखवून जनजागृती केली .विद्यार्थ्यांमार्फत पालकांमध्येही कोरोना विषाणू बाबत जनजागृती केली ,त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घेतात . शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या . त्याचा एक भाग म्हणून रस्त्यावरून जाणाऱ्या व विविध ठिकाणावरून येणाऱ्या लोकांची आणि वाहनांची तपासणी करण्यासाठी विविध ठिकाणी रोडवर चेकपोस्ट तयार केले .शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी पोलिसांच्या समवेत आपत्ती व्यवस्थापन कार्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिरी येथील चेक पोस्ट वर एप्रिल २०२० या महिन्यात एक दिवस आणि एक रात्र अशी ही ड्युटी बजावली आणि मे २०२०या महिन्यात एक दिवस आणि दोन रात्री अशी ही ड्युटी प्रामाणिकपणे बजावली आहे ,कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येणाऱ्या वाहनांची लोकांची तपासणी तुकाराम अडसूळ यांनी व पोलिसांनी चेकपोस्टवर केली . पोलिसांबरोबर चेकपोस्टवर या देशहिताच्या कार्यात तुकाराम अडसूळ यांनी प्रामाणिकपणे आपले कार्य करून योगदान दिले त्याबद्दल अनेकांनी त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले.तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी एकतीस जुलै ते तेरा ऑगस्ट दोन हजार वीस या कालावधीत पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथे लोकांना सर्दी ,ताप ,खोकला याबाबत घरोघरी जाऊन माहिती घेऊन सर्वेक्षण केले . यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी नवनाथ आंधळे तसेच अंगणवाडी सेविका माया गिते ,आशा वर्कर उषा गिते यांनींही या कार्यासाठी मदत केली. यावेळी त्यांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणाला ताप ,सर्दी ,खोकला येतो का याबाबत चर्चा करून माहिती घेतली तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी लोकांशी चर्चा करून जनजागृती केली. देशहिताच्या कार्यात कोरोना योद्धा म्हणून त्यांनी चांगले काम केले . तसेच शिक्षक
तुकाराम अडसूळ यांनी कोरोना काळात कर्जत तालुक्यातील काही गरीब लोकांना किराणा माल घेण्यासाठीही आर्थिक मदत केली आहे. कोरोना काळात केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विविध प्रकारचे कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार व प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा