लॉकडवूनच्या विद्यार्थ्यांच्या लर्निंग ,वर्क फ्रॉम होम उपक्रम यशस्वीपणे राबविणारी गितेवाडी शाळा .
अहमदनगर -- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळांना सुट्ट्या दिल्या .नंतर शासनाने लॉकडावून केले .या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहण्यासाठी व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जिल्ह्याचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी मा.रमाकांत काठमोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लर्निंग ,वर्क फ्रॉम होम हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला .हा उपक्रम राबविण्यासाठी शिक्षक पालकांचे वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले .या पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर शिक्षक दैनंदिन अभ्यास लर्निंग ,वर्क फ्रॉम देतात .तसेच यासाठी विविध अँपचाही वापर केला जातो .लर्निंग ,वर्क फ्रॉम होम हा उपक्रम कशा प्रकारे चालू आहे ,यामध्ये कोणत्या अडचणी आहेत ,यामध्ये आणखी कोणकोणते विषय , घटक घेता येईल ,यामध्ये आणखी काय बदल करता येईल म्हणून शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी जिल्ह्यातील काही उपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्याबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला . आमच्या पाथर्डी तालुक्यात गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या उपक्रमाचे महत्व शिक्षकांना सांगितले . सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी शिक्षक पालक यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले .त्यानुसार तालुक्यात अनेक व्हाट्सअप ग्रुप तयार होऊन गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली विविध विषयांचा विविध प्रकारचा वर्क फ्रॉम होम नियमित पणे या व्हाट्सअप ग्रुपवर दिला जात आहे . अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना लर्निंग ,वर्क फ्रॉम साठी विविध प्रकारचा अभ्यास ,स्वाध्याय , लिंकवर ऑनलाइन चाचणी तयार करतात .अशा अनेकप्रकारचा लर्निंग ,वर्क फ्रॉम होम अभ्यास सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांना दिला जतो .तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडूनही संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना लर्निंग ,वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होमसाठी नियमितपणे अभ्यासमाला पाठवली जाते .पाथर्डी तालुक्यात लर्निंग ,वर्क फ्रॉम होम हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मिडियाद्वारे उत्कृष्टपणे चालू आहे. पाथर्डी तालुक्यात डोंगराळ भागात आमची द्विशिक्षकी गितेवाडी शाळा आहे .मी तुकाराम अडसूळ व माझे सहकारी शिक्षक नवनाथ आंधळे आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकांच्या ,ग्रामस्थांच्या सहकार्याने नेहमी विविध उपक्रम आमच्या गीतेवाडी शाळेत यशस्वीपणे राबवित आहे . शासनाने शाळेला सुट्ट्या दिल्यापासून आम्ही लर्निंग ,वर्क फ्रॉम होम हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी आमचे शिक्षक पालकांचे वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप करून त्यावर दररोज विविध विषयांमधील विविध घटकांचा विद्यार्थ्यांना लर्निंग ,वर्क फ्रॉम साठी अभ्यास ,स्वाध्याय देतो .पालक व विद्यार्थी यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून विद्यार्थी नियमित अभ्यास करत आहे असे दिसून आले आहे .तसेच कोरोना विषाणूबाबत कोणती दक्षता घेतली पाहिजे याबाबत पालक शिक्षक व्हाट्सअप ग्रुपमधून वेळोवेळी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची संधी मिळाली .सोशल मिडीयाचा सदुपयोग कसा करावा हे विद्यार्थ्यांना या वर्क फ्रॉम होम उपक्रमातून समजले आहे .पालकही विद्यार्थ्यांच्या वर्क फ्रॉम होम अभ्यासामध्ये सहभागी होत आहे .पालकांनी वर्क फ्रॉम होम या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे .आज अशा परिस्थितीत वर्क फ्रॉम हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक व उपयुक्त आहे .या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संचालक दिनकर पाटील ,
जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा.रमाकांत काठमोरे , पाथर्डी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.शिवाजी कराड ,विस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ ,विस्तार अधिकारी अनिल भवार ,केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी ,मा .केंद्रप्रमुख संतोष नरवडे ,सर्व शिक्षक बंधू भगिनी परिश्रम घेत आहेत .
शब्दांकन
तुकाराम अडसूळ
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा