मुल्यवर्धन कार्यक्रमातील उपक्रमांतून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण
___________________
आज संपूर्ण जगापुढे पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी अनेक देशात विविध उपाययोजना केल्या जात आहेत .त्याप्रमाणे आपल्या देशात पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हवा ,पाणी ,अन्न या आपल्या मूलभूत गरजा आहेत .यामधील एका बाबीचे जरी प्रदूषण झाले तरी मानवी जीवन व इतर सजीव यांना जीवन जगण्यास बाधा निर्माण होते .
राज्यातील प्राथमिक शाळेत मागील दोन वर्षांपासून मुल्यवर्धन कार्यक्रम सुरू केलेला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये बालपणी व प्राथमिक शिक्षणात रुजलेली मूल्ये ही कायम टिकणारी असतात.शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार ,संवेदनशील आणि आदर्श नागरिक बानावेत म्हणून संविधानातील मूल्ये व त्या सबंधित कौशल्य विकसित करण्यासाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मुल्यवर्धन कार्यक्रमातील उपक्रमात नियोजित संधी दिली आहे.देशाच्या गरजा ,प्राधान्यक्रम ,उपलब्ध असणारी साधनसामग्री यानुसार आवश्यक वाटतील असे बदल करून राबविता येणारा लवचिक कार्यक्रम म्हणजे मुल्यवर्धन उपक्रम आहे.
जीवन जगत असताना समाज व देशहितासाठी आवश्यक असलेले मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी हा मुल्यवर्धन कार्यक्रम प्रेरणादायी ,मार्गदर्शक व उपयुक्त आहे.
हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण थांबण्यासाठी मुल्यवर्धन कार्यक्रमात विविध प्रकारचे उपयुक्त उपक्रम दिलेले आहेत .ते उपक्रम यशस्वीपणे राबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्याचे खूप महत्वाचे मूल्ये रुजले आहेत .या मूल्यवर्धन कार्यक्रमात असलेल्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे चांगले गुण व मूल्ये रुजून विद्यार्थी देशाचा आदर्श नागरिक तयार होईल असे नियोजित उपक्रम आहे.पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यासाठी यामध्ये अनेक उपक्रम दिलेले आहेत .त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व समजले ते वेळोवेळी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करतात . पर्यावरण संवर्धन म्हणजे जीवन जगण्यास आपल्या सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असणे. यामधून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल आत्मीयता निर्माण होऊन ते हवा ,पाणी ,अन्न यांचे प्रदूषण होणार नाही म्हणून विशेष काळजी घेतात .त्यांच्यात योग्य परिवर्तन झाले आहे.आज प्रदूषण वाढत आहे व हे प्रदूषण थांबविण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज निर्माण झाली आहे .म्हणून शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी या मुल्यवर्धन कार्यक्रमात असलेल्या विविध उपक्रमांचा फार मोठा उपयोग होत आहे.हवेचे प्रदूषण थांबविण्यासाठी यामध्ये मी नियम पाळणार ,योग्य की अयोग्य ,चांगल्या वाईट सवयी ,झाडांचे चित्र रंगवा ,निसर्गचित्र रंगवा ,कुटुंबाचे झाड,आपण झाडे कशी वाचवू शकतो ,कॅलेंडर पाहून सणसमारंभ साजरे करणे ,,,,,,,असे अनेक उपक्रम दिलेले आहेत .यामुळे विद्यार्थी प्रदूषणमुक्त सण समारंभ साजरे करतात .
उदा.विद्यार्थी फटाकेमुक्त दिवाळी आनंदाने साजरी करतात.
झाडांमुळे सर्वात महत्वाचे म्हणजे झाडांमुळे प्राणवायू मिळतो .जगातील सर्व पैसे एकत्र केले तरी प्राणवायूची निर्मिती आपण करू शकत नाही. म्हणून यामध्ये असलेल्या उपक्रमातून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना आमच्या जिल्हा प्राथमिक शाळा गितेवाडी या शाळेमार्फत वृक्षारोनासाठी दहा ते वीस झाडे प्रत्येक वर्षी वाटतो .विद्यार्थी ही रोपे आपले घर व शेताच्या परिसरात लावतात व त्यांचे शंभर टक्के संगोपन करतात .अशा प्रकारे या मूल्यवर्धन उपक्रमातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हे पर्यावरण संवर्धनाचे महत्वाचे मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे.निसर्गाबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता निर्माण झाली आहे.
पाणी प्रदूषण थांबविण्यासाठी यामध्ये विविध उपक्रम दिलेले आहेत.मी नियम पाळणार ,आपण पाणी कसे वापरायला हवे,आपण पाणी कसे वाचवू शकतो ,पाणी वाचवा जीवन वाचवा ,,,,,अशा अनेक उपक्रमातून पाण्याचा वापर जपून करावा ,दूषित पाणी पिऊ नये ,पाण्याचा गैरवापर करू नये ,पाण्याचे प्रदूषण करू नये ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये यामधील विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून रुजविली आहेत .
अन्न प्रदूषण थांबविण्यासाठी योग्य की अयोग्य ,चांगल्या वाईट सवयी ,हे असे का होते , स्वयंमुल्यमापन ,मी नियम पाळणार अशा विविध उपक्रमातून सकस आहार घेणे,दूषित अन्न खाऊ नये ,तेलकट पदार्थ खाऊ नये ,अन्नामध्ये भेसळ करू नये ,शिल्लक अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे, परसबागेतून सेंद्रिय शेती करणे ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविली आहेत .
प्रदूषण निवारण करण्यासाठी कचऱ्याचा गुणाकार ,विघटणास लागणारा कालावधी , स्वयंमूल्यमापन ,सणसमारंभ ,चांगल्या वाईट सवयी या उपक्रमातून हवा ,अन्न ,पाणी यांचे प्रदूषण करू नये ,प्लॅस्टिक चा वापर टाळणे कारण त्यामुळे मुक्या प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो .तसेच प्लॅस्टिक मुळे मानवी जीवनास धोका निर्माण होत आहे.असे अनेक उपयुक्त मूल्ये गावातील प्लॅस्टिक गोळा करून ,जनजागृती करून विद्यार्थ्यांमध्ये रुजविली आहेत .यामध्ये असलेल्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक ,पर्यावरण संवर्धन ,प्रदूषण निवारण असे देशहिताचे विविध मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविली आहेत .मूल्ये शिकविली जात नाहीत हे सत्य असून ती आनंददायी पद्धतीने विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जातात आणि आम्ही ती विद्यार्थ्यांमध्ये रुजविली आहेत .आदर्श नागरिक तयार होण्यासाठी त्या नागरिकांमध्ये बालवयापासून विविध आदर्श मूल्य रुजणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी हा मुल्यवर्धन कार्यक्रम खूप उपयुक्त व पूरक आहे . शिक्षणातून आदर्श नागरिक घडविण्यासाठी हा मूल्यवर्धन उपक्रम प्राथमिक शाळांमधून राबविला जातो हा एक समाजहितासाठी , राष्ट्रहितासाठी स्तुत्य उपक्रम आहे .
लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
.उपक्रमशील शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता. पाथर्डी जि.अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा