🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌸*शिक्षण संवाद 2.0 🌸
(EduTalk 2.0)
🌸 शिक्षण संवादात झालेली काही मुद्दे ,चर्चा 🌸
*'कृतिशील शिक्षक महाराष्ट्र' (ATM) व निशंक* आयोजित शिक्षण संवाद 2.0
(EduTalk 2.0) फेसबुक व YouTube Live
*🌸विषय:-*
कोरोनानंतर शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने
*🌸संवादक:-*🌸
मा.ज्ञानेश्वरजी मुळे साहेब
माजी -- परराष्ट्र सचिव,
माजी राजदूत ,भारत सरकार
अमेरिका ,जपान ,रशिया ,,,,,, अशा अनेक देशात भारताच्या दूतावास मध्ये
महान कार्य
त्यांच्या कार्यकाळात विविध बाबतीत
भारताचे इतर देशांशी चांगले संबंध सुधारले .
तसेच
सदस्य
मानव अधिकार आयोग,भारत सरकार नवी दिल्ली येथे उत्कृष्टपणे कार्य .
🌸निवेदक व सूत्रसंचालन 🌸
विक्रम अडसूळ सर
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक ,
सदस्य -महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम मंडळ ,
सदस्य -NCERT अभ्यासक्रम मंडळ नवी दिल्ली
सदस्य--महाराष्ट्र शासन गुणवत्ता कमिटी ,शालेय शिक्षण विभाग ,
संयोजक ATM
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
अध्यक्ष -- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष - निशंक भारत
संवादातील काही मुद्दे--
भारत सरकारचे मा.परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे साहेब यांचा
कोल्हापूर येथील गरीब शेतकरी कुटुंबात जन्म होऊन जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन
शाळेत आलेल्या एक IAS सी .ई. ओ .यांची प्रेरणा व शिक्षकांनी केलेले अनमोल मार्गदर्शन यातून स्वयंस्फूर्तीने खूप अभ्यास करून विविध देशांचे राजदूत व परराष्ट्र सचिव या उच्च पदापर्यंत गरुड भरारी घेतली .
महाराष्ट्रात त्याकाळी MPSC मध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला .आत्मविश्वास वाढला नंतर१९८३ मध्ये UPSC मध्ये खूप अभ्यास करून त्यातही चांगले यश मिळवून केंद्रसरकरमधील राजदूत ,परराष्ट्रसंचिव या उच्च पदावर उत्कृष्टपणे कार्य करण्याची मिळालेली संधी ही कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता स्वयंअध्ययनाने मिळाली .
जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका गरीब कुटुंबातील मुलगा देशाच्या महान पदावर कार्य करून आपल्या कार्याचा आदर्श निर्माण करून ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीला कधीही विसरत नाही हे साहेबांचे वैशिट्ये आहे.
या मातृभूमीसाठी खूप महान कार्य करतात ते म्हणजे कोल्हापूरचे सुपुत्र मा.ज्ञानेश्वर मुळे साहेब यांच्या महान कार्याची आपल्याला एक वेगळी प्रेरणा यातून मिळते .
साहेबांचे बालपण ,प्राथमिक शिक्षण कोल्हापूरमध्ये शिरूर हातकणंगले तालुक्यातील एका खेड्यात व पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरला आले.
साहेबांनी बालपणीच्या खूप गमतीजमती व आठवणी सांगून त्यांच्या बालपणात आम्हा सर्वांना घेऊन गेले हसत खेळत आम्हा सर्वांना बालपणातील विविध प्रसंग सांगितले.
घरात खूप चांगले संस्कार झाले त्यासाठी पूरक वातावरण कुटुंबात होते.
सहावीला असताना शाळेत जिल्हा परिषदेचे सुंदर व्यक्तिमत्व असलेले एकदम तरुण आय.ए. एस.झालेले सी.,ई. ओ. मा.शरद काळे साहेब शाळेत एका कार्यक्रमासाठी आले होते.त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमासाठी शिक्षकांची धावपळ व नियोजन सुरू होते.तेव्हा शिक्षकांना मी विचारले शाळेत कोण येत आहे त्यांनी सांगितले खूप मोठे साहेब येत आहेत .ते साहेब होण्यासाठी म्हणजे आय .ए .एस . होण्यासाठी काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन अनेकांकडून घेत राहिलो.
सी .ई. ओ .शाळेत येऊन गेल्यावर त्याच रात्री ठरवले आपल्याला पण आय.ए. एस .व्हायचे म्हणून त्यासाठी सतत अभ्यास करून ,अपडेट माहिती मिळवत राहिलो.
प्रथम MPSC दिली त्यात राज्यात पहिला आलो .
MPSC मुलाखत देताना त्यावेळी MPSC चे अध्यक्ष के.जी .देशमुख म्हणाले होते तू काहीतरी मोठा होण्यासाठी जन्माला आला आहेस .त्यावेळी माझी मुलाखत चांगली झाली असा आत्मविश्वास माझ्यात आला.
कोल्हापूरला मोठा सत्कार समारंभ ठेवला ,
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पद भूषविलेले मा. यशवंतराव चव्हाण ,
मा. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व अनेक मान्यवर हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी त्यांनी सांगितले होते मराठी माणसाने कितीही मोठ्या पदावर गेले तरी आपल्या मातीला आपल्या मातृभूमीला विसरू नये ,
माझ्या भाषणात त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की मी कधीही या मातीला व मातृभूमीला विसरणार नाही .आज ते असते तर त्यांना माझ्या कार्याचा खूप आनंद झाला असता.
शालेय जीवनात फुले ,शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव पडला .
अनेक महान नेत्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली त्यामुळे सतत एक वेगळी प्रेरणा मिळत राहिली.
कोल्हापूरला कॉलेजलाअसताना एस.टी .जेवणाचा डबा येत असे .
कॉलेजला असताना खऱ्या जीवनाचे दर्शन घडले .
कोल्हापूरला बी.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले.
त्याकाळी अनेक जिल्हाधिकारी यांना पत्रलेखन करून आय.एस .एस.होण्यासाठी मार्गदर्शन मागविले .
काहींनी उत्तर देऊन मार्गदर्शन केले.
अभ्यासात सातत्य ठेवून जिद्द ठेवली .
त्याकाळी असणाऱ्या अनेक महान नेत्यांची अनेक भाषणे ऐकली .
१९८४ मध्ये UPSC परीक्षेत यश मिळवून आय.ए. एस. झालो.
जपान ,रशिया अशा अनेक देशात
राजदूत म्हणून उकृष्टपणे कार्य केले
भारत देशाच्या परराष्ट्र सेवेत दाखल झाल्यावर विविध देशातील भाषा शिकलो.
राजीव गांधी पंतप्रधान असताना ते जपानला आले त्यावेळी तेथे मी त्यांच्या भाषणाचा अनुवाद केला .
विदेश सेवा हे फार मोठे भाषा शिकण्याचे साधन आहे.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी परदेशात आले तेव्हा त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याची संधी मिळाली.
अनेक शिक्षक मित्र आहेत तसेच इतर क्षेत्रातही अनेक मित्र आहेत त्यांचेही नेहमी संवाद असतो .
कोरोनानंतरचे शिक्षणापुढे अनेक आव्हाने असतील असेही त्यांनी सांगितले ,
विविध प्रकारचे प्रश्न ,समस्या निर्माण होतील.
कोरोनामुळे शिक्षणात व्यत्यय आलेला आहे.
त्यामुळे आवश्यक त्याठिकाणी तंत्रज्ञान वापरून शिक्षण द्यावे लागेल.
कोरोनामुळे सोशल डिस्टन्स ठेवून खेळ खेळता येत नाही.
आपल्याला कोण आजारी आहे हे समजेल मानसिक आजार समजणे अवघड असते.
शिक्षण व विद्याग्रहन कसे करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
सर्व पालकांकडे अँड्रॉइड फोन ,नेट ,रेंज नसते त्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात अडचणी येतात .
परंतु सध्या शिक्षणात तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही .
जिल्हा परिषदेच्या शाळेबाबत बोलताना त्यांनी सांगितले जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या आहेत ,
अनेक शिक्षक चांगली मेहनत करून शाळा चांगल्या केल्या आहेत ,विद्यार्थी गुणवत्ता चांगली असल्याचे समजले आहे.
जिल्हा परिषद शाळेतील वीजबिल खूप येते ,अनेक शाळेतील वीजपुरवठा यामुळे कट केलेला आहे ,त्यामुळे शिक्षणात काही बाबींची अडचण येते बाबत त्यांना विचारले असता शासनाने योग्य निर्णय घेणे खूप गरजेचे आहे .कारण प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाय आहे तो भक्कम होणे अत्यंत गरजेचे आहे ,
असेही त्यांनी सांगितले .
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मुलांना खेड्यात विविध कामे करायला शिकवा ,त्यांना निसर्गात जाऊ द्या ,निसर्गाची माहिती द्या ,निसर्गाविषयी आपुलकी निर्माण करा ,
भारताचे पासपोर्ट मॅन--
परराष्ट्र सचिव झाल्यावर पासपोर्ट ची आणखी सोपी व सुलभ पद्धत त्यांनी सुरू केली.त्यामुळे पासपोर्ट काढायला जास्त लांब जावे लागत नाही ,
पासपोर्ट बाबत लोकांचा खूप त्रास वाचला ,पासपोर्ट काढणे खूप सोपे झाले त्यामुळे त्यांना पासपोर्ट मॅन म्हणून ओळखले जाते.
मातृभूमीसाठी पासपोर्ट बाबत खूप महत्वाचे निर्णय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज असताना त्यांच्या मदतीने घेतले असेही त्यांनी सांगितले .
यावेळी त्यांना मी पासपोर्ट बाबत अनेक बाबी शक्य आहेत हे पटवून दिले त्यांनी कार्य करण्याची परवानगी दिली त्यामुळे पासपोर्ट बाबत खूप सोपी पद्धत आणू शकलो .
पासपोर्ट साठी केंद्रसरकारच्या पोस्ट खात्याच्या इमारतीचा कार्यालय म्हणून वापर सुरू केला .
२०१६ मध्ये देशात पासपोर्ट चे ५०० च्या पुढे कार्यालय सुरू करून विस्तार केला.
प्रत्येक लोकसभा मतदार संघात पासपोर्ट कार्यालय सुरू केले.
देशात पासपोर्टसाठी आपण कोठेही अर्ज करू शकतो ,तसेच पासपोर्ट नूतनीकरण करू शकतो त्यासाठी आपल्याला जास्त लांब जाण्याची गरज नाही.
पासपोर्ट हे खूप महत्वाचे डॉक्युमेंट आहे.
पासपोर्ट ही आज एक जीवनावश्यक वस्तू आहे.
त्यामुळे ते आपल्याला जवळ असले पाहिजे म्हणून परराष्ट्र मंत्री यांच्या सल्ल्याने ही जनतेची खूप महत्त्वाची सोय केली.हे एक जीवनातील फार मोठे समाधान आहे.
या पदावर राहून जनहीताचे चांगले कार्य करता आले.
चांगुलपणा चळवळ --या विषयावर दहा वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता.म्हणून चांगुलपणा ही चळवळ राबवून आपण नव्या सामाजिक बदलाची चळवळ राबवू शकतो.
यासाठी सर्वांनी एकमेकांशी चांगले राहणे ,चांगले वागणे ,चांगले आचार ,विचार यांचे पालन करणे गरजेचे आहे.
या चांगुलपणाच्या चळवळीत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.
साहेबांनी अनेक पुस्तके लेखन केली आहेत,त्यापैकी माती पंख आणि आकाश,
रशिया नव्या दिशांचे आमंत्रण हे पुस्तक जरूर वाचा .
आपल्या देशात विविधतेतून एकता आहे ,
त्यासाठी मातृभाषेतून शिक्षण खूप महत्वाचे आहे.
जगातील अनेक देशातील सेवेमुळे तेथील संस्कृती जवळून अभ्यासली ,
आपली भारतीय संस्कृती खूप प्राचीन आहे.विश्वबंधुत्वाची कल्पना आहे.आपली भारतीय संस्कृती खूप महान आहे.
MPSC व UPSC परीक्षेत यश मिळविण्यासाठी सतत अभ्यास करा ,नवनवीन माहिती मिळवा ,वाचन करा ,स्वयंअध्ययनाचे पंख बळकट करा असाही सल्ला त्यांनी दिला .
शिक्षण --
शिक्षणाचा जीवनाशी संबंध आला पाहिजे ,
घेतलेल्या शिक्षणाचा जीवनात वापर करता आला पाहिजे .
समाजात अनेक प्रकारच्या समस्या आहेत ,
या सामाजिक समस्या सोडवणारे शिक्षण असले पाहिजे .
संदेश --- समाजात विसंवाद आहे.समाजात चांगला संवाद कसा निर्माण करता येईल हे करणे गरजेचे आहे.
संवादाचा अभावामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
घराघरात संवाद कमी झाले आहेत ,
म्हणून आपण संवाद वाढवून सुसंवाद निर्माण करणे गरजेचे आहे .असा अनमोल संदेश त्यांनी दिला .
या राष्ट्रीय ऑनलाईन संवादात अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र महान आय.पी.एस .अधिकारी व सध्या तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत साहेब हे सुद्धा सहभागी झाले होते.
यावेळी त्यांनीही शिक्षणावर काही प्रश्न विचारले .
या संवादात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विक्रम अडसूळ सर यांनी साहेबांच्या संवादात उत्कृष्टपणे मुद्द्यांची मांडणी करून सवित्तर संवाद घडवून अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन केले तसेच अनेक शिक्षकांनी विचारलेले प्रश्न साहेबांच्या पुढे त्यांनी उत्कृष्टपणे मांडले
साहेबांनी सर्व प्रश्नांची समर्पक सवित्तर उत्तरे दिली .
यावेळी साहेबांनी कृतिशील शिक्षक समूहाने ATM ने एक मे पासून सुरू केलेल्या या ऑनलाईन संवाद मालिकेबद्दल विक्रम अडसूळ सर व सर्व ATM परिवाराचे विशेष अभिनंदन केले.
या संवादातील संवादक मा.परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे साहेब ,
आपल्या व्यस्त कार्यातून वेळ देऊन या संवादात सहभागी
अतिरिक्त पोलीस महासंचालक
महेश भागवत साहेब ,
या संवादाचे अतिशय चांगले सूत्रसंचालन करणारे ATM चे संयोजक विक्रम अडसूळ सर
यांना विशेष धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
या संवादात अनेक शिक्षक बंधू भगिनी व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांना विशेष धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
फेसबुक पेजवर झालेला संवाद पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.facebook.com/groups/1382080702112569/
तसेच यू ट्यूब वर झालेला संवाद पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा .
Youtube लिंक:
https://www.youtube.com/channel/UCoZwLmC1zemIcM3m8O0DjUA
शब्दांकन
तुकाराम अडसूळ
ATM परिवार
अहमदनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा