जिल्हा न्यायालयात गेली बालवारकर्यांची वृक्षदिंडी
अहमदनगर .....,
महाराष्ट्र शासन 33 कोटी वृक्ष लागवड जनजागृती साठी
शहरात काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत 4 हजार शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींचा सहभाग
जिल्हा न्यालयाचे प्रधान न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण
कर्तव्य समजून प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लावावे -
जिल्हा न्यायाधीश
एस.आर . जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी मंगळवार दि.16 जुलै रोजी शहरातून शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींची वृक्षदिंडी काढण्यात आली. या दिंडीत तब्बल 4 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद करीत दिंडीत सहभागी असलेल्या बालवारकर्यांसह विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश दिला. तर बालवारकर्यांसह विविध वेशभुषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी नगरकरांचे लक्ष वेधले.
रेसिडेन्शिअल विद्यालयाच्या प्रांगणात उपशिक्षणाधिकारी रामदास हराळ यांच्या हस्ते झाडाला पाणी अर्पण करुन या दिंडीचे प्रारंभ झाले. यावेळी सामाजिक वनीकरण व वनविभागाचे बी.जे. निमसे, एस.आर. पाटील, सुनिल थेटे, सागर माळी, विश्वनाथ चौधरी, भाऊसाहेब कचरे ,आबासाहेब मोरे ,तुकाराम अडसूळ व प्राचार्य उपस्थित होते. डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन डोक्यावर रोपे घेऊन मुली दिंडीच्या अग्रभागी होत्या. सोबतीला असलेल्या बॅण्ड व झांज पथकाने या दिंडीची रंगत वाढवली. विठ्ठल-रुक्मणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, नवनाथ, छत्रपती शिवाजी महाराज, मुक्ताबाई, संत तुकाराम तर विविध पशु, पक्षी व प्राण्यांची वेशभुषा परिधान केलेले लहान विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले. शिस्तबध्द पध्दतीने मार्गक्रमण करीत ही दिंडी लालटाकी, पत्रकार चौक, तारकपूर मार्गे जिल्हा न्यायालयात दाखल झाली. झाडे लावा.. झाडे जगवा..., अंगणी लावा एक तुळस.. प्राणवायूचा होई कळस... पर्यावरणाची रक्षा जगाची सुरक्षा... अशा जोरदार घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. बालवारकर्यांसह रोपे घेऊन दिंडीत सहभागी झालेले विद्यार्थी व युवक-युवतींनी जिल्हा न्यायालयाचा परिसर गजबजला होता. या दिंडीत न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय, रेसिडेन्शिअल विद्यालय, पेमराज सारडा महाविद्यालय, काकासाहेब म्हस्के विद्यालय, यशवंत माध्यमिक विद्यालय, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, सेंट झेवियर्स कॉलेज, समर्थ विद्या मंदिर आदि शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.
जिल्हा सत्र न्यायाधीश कमलाकर अ.कोठेकर यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश एस.आर. जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम.व्ही. देशपांडे, ए.बी. भिल्लारे, श्रीमती के.एस. बाकरे, वृक्षमित्र तथा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आबासाहेब मोरे, ए.एम. शेटे, एच.एस. सातभाई, एन.एल. काळे, जिल्हा सरकारी वकिल एस.के. पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष शेखर दरंदले, खजिनदार राजेश कावरे, समीर सोनी, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित, प्राचार्य भास्करराव झावरे, अमरजा रेखी, डी.डी. पाटील, अशोक दोडके, ज्योत्सना शिंदे,विस्तार अधिकारी लाळगे ,केंद्रप्रमुख सुनील चौधरी ,सौ.बडे आदिंसह दिंडीत सहभागी महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, लायन्स व रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश सुनीलजीत पाटील यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करुन गुरुजनांचा आदर करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. नम्रता व कृतज्ञता अंगीकारुन जीवनाय यशस्वी होण्याचा कानमंत्र देत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण करण्याचे सांगितले. वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून भगीरथ राजा, अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज आदि महापुरुषांनी पर्यावरण व जल संवर्धनासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.
जिल्हा न्यायाधीश एस.आर. जगताप म्हणाले की, पुर्वी प्रमाणे ऋतूचक्र राहिले नसून, पावसासाठी सर्वांना प्रतिक्षा करावी लागत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना पशु, पक्ष्यांसह मनुष्याचे असतित्व देखील धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. तर पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे. कर्तव्य समजून प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लावले पाहिजे. यासाठी कायदा करण्याची वेळ येऊ नये. तसेच लावलेल्या झाडाची आपल्या कुटूंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.डी. वडगांवकर यांनी केले. मंडळाच्या कार्याध्यक्षा शारदा होशिंग यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे सचिव तुकाराम अडसूळ , प्रा.डॉ.भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद मोरे, जयसिंगराव जवक, वैभव मोरे, गोरख शिंदे, छाया राजपूत, दत्ता दिक्षीत, अमल ससे, हेमलता बरमेचा, निलम परदेशी, शोभा भालसिंग, राजश्री मांढरे, अॅड.अनुराधा येवले, पुष्पा शिंदे, सुनंदा तांबे, अजिता ऐडके, कावेरी मोरे आदिंसह निसर्ग व सामाजिक पर्यावरण, प्रदुषण निवारण मंडळाचे सदस्य, शालेय शिक्षक व महाविद्यालयीन प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा