मुख्य सामग्रीवर वगळा

निरोगी जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण काळाची गरज

निरोगी जीवन जगण्यासाठी पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण काळाची गरज

पर्यावरण हा शब्द आपण अनेकवेळा विविध ठिकाणी  ऐकतो.  विविध वर्तमान पत्रात तसेच सोशल मिडियावर वेळोवेळी पर्यावरणाविषयी माहिती येते ती आपण वाचतो का?पर्यावरणावर ,प्रदूषणावर विविध पुस्तके उपलब्ध आहेत .ही पुस्तके आपण वाचतो का?आपल्या  दैनंदिन जीवनात पर्यावरणाचे काय महत्व आहे ? आपला आणि पर्यावरणाचा काय संबंध आहे?  या पर्यावरणाचे आपल्याला काय फायदे आहेत  ? पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही जबाबदारी कोणाची ? आपण एकट्याने पर्यावरणात कार्य करून उपयोग होईल का ?,,,,,,,अशा अनेक प्रश्नांचा आपण कधी  विचार केला का आणि या  विविध प्रश्नांची उत्तरे आपण  कधी शोधली का? हा खरा प्रश्न आपल्या समोर आहे.माणसांच्या आणि सर्व सजीवांच्या जीवनात पर्यावरण किती महत्वाचे आहे हे समजण्यासाठी प्रथम पर्यावरण म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यानंतर पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे  कार्य आपण शिक्षणातून  विविध उपक्रम राबवून  सहजपणे करू शकतो . शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे.शिक्षणातून देशाचे सुजाण नागरिक घडविले जातात . त्यामुळे शिक्षणातून देश बदलत असतो . देशाची भावी पिढी घडविताना जर त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारणाचे मूल्य रुजविली तर आपल्याला  आणि आपल्या पुढच्या पिढीला आरोग्यसंपन्न जीवन जगता येईल.मूल्य शिकवावी लागत नाही ती विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी लागतात.समाज व देशहितासाठी अशी मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजणे काळाची गरज निर्माण झाली आहे.कारण
पर्यावरणाचा आणि  मानवासह सर्व सजीवांचा पूर्वीपासून  परस्परसंबंध आहे.पर्यावरण हा शब्द जरी लहान  वाटत असला तरी त्याची व्याप्ती खूप विस्तारित आहे.पर्यावरणात सजीव आणि निर्जीव  या दोन्हींचाही समावेश होतो .हवा ,पाणी ,जमीन ,नद्या ,नाले ,ओढे ,डोंगर ,झाडे ,वेली , पक्षी ,माणूस,प्राणी ,कीटक ,,,,,,अशा अनेक  सजीव व निर्जीव घटकांनी मिळून पर्यावरण तयार होते.थोडक्यात पर्यावरण म्हणजे आपण ज्या ठिकानी राहतो तेथील आपल्या सभोवतालचा नैसर्गिक व मानवनिर्मित  सर्व परिसर होय.पर्यावरण संवर्धन म्हणजे काय हे पण आपणास माहीत असणे गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धन म्हणजे जीवन जगण्यासाठी आपल्या सभोवतालची नैसर्गिक व मानवनिर्मित परिस्थिती अनुकूल असणे . पृथ्वीवरील सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी ही परिस्थिती अनुकूल असली पाहिजे .या पृथ्वीवर राहण्याचा अधिकार सर्व सजीवसृष्टीला आहे.माणूस या पर्यावरणाच्या केंद्रस्थानी आहे.माणूस हा पर्यावरणाचा रक्षक आहे.माणसाने पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे . या सजीवसृष्टीत माणूस हा सर्वात बुद्धिमान  आहे .पर्यावरणाचा वापर कसा करायचा हे माणसाच्या हातात आहे.म्हणून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी माणसाची भूमिका खूप महत्त्वाची आहे.माणसाने आपल्याबरोबर इतर सजीवांच्या जीवनाचा विचार केला पाहिजे.
पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण ही फक्त आपल्या देशापुरती समस्या नाही तर ती एक फार मोठी जागतिक समस्या अनेक वर्षांपासून  निर्माण झालेली आहे.म्हणून आपल्या परिसरातील सर्व सजीव व निर्जीव यांची आपण जपणूक आपण केली पाहिजे. निसर्गाचे आपण रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करील .आपण  निसर्गावर आक्रमण केले तर आपल्या  जीवनास धोका निर्माण  होईल.हवा ,पाणी ,अन्न सजीवांच्या या मूलभूत गरजा आहेत .पर्यावरणात आपण  महत्वाच्या या तीन घटकांचा आपण विचार करू या .या तीन पैकी एका घटकाचे जरी प्रदूषण झाले तरी मानवासह सर्व सजीवांच्या जगण्यास बाधा निर्माण होते.यामध्ये हवा ही सर्वात महत्वाची गरज आहे कारण हवेशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही .सजीवाचा जन्म झाल्याबरोबर त्याची पहिली गरज म्हणजे हवा आहे .पृथ्वीवरील सर्व सजीवांना शुद्ध हवा ,शुद्ध पाणी व प्रदूषणमुक्त अन्न मिळाले पाहिजे .माणसाने प्रगतीच्या व सुधारणेच्या निमित्ताने 
औद्योगिकरण केले. त्यामुळे कारखाने ,शहरीकरण वाढले. कारखान्यांचा धूर  ,वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांचा धूर  हवेत मिसल्यामुळे  हवा दूषित होऊन हवेचे प्रदूषण होते.या दूषित हवेमुळे माणसाला व इतर सजीवांना विविध प्रकारचे विकार होत आहेत .हवेच्या प्रदूषणामुळे अनेक सजीव  मृत्युमुखी पडतात .पर्यावरणात अनेक सजीव आपल्याला उपयुक्त आहेत .म्हणून  सर्व सजीवांचे संरक्षण होणे गरजेचे आहे कारण काही सजीव जरी आपल्याला प्रत्यक्ष उपयोगी पडत नसले तरी  पर्यावरण साखळीत सर्व  सजीव महत्वाचे आहेत .दिल्लीमध्ये हवेचे प्रदूषण झाल्यामुळे तेथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते हे आपल्याला माहीत आहे .शाळांना तर प्रदूषणामुळे सुट्ट्या देण्याची वेळ आली होती .ही वेळ का आली ? याला जबाबदार आपण माणूसच ना . तसेच  वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी  माणसाने  निसर्गात म्हणजे पर्यावरणात आपल्या बुद्धीचा वापर करून सोयीनुसार बदल केले . शेतीसाठी व इतर बाबीसाठी माणसाने जंगलातील व इतर ठिकाणची वृक्षतोड  केली .त्यामुळे झाडे कमी झाली .झाडे आपल्याला सावली ,फळे ,फुले ,औषध ,,,अशा अनेक वस्तू देतात
 परंतु  सर्वात महत्वाचे म्हणजे झाडे आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देतात आणि  आपल्याला त्रासदायक असलेला कार्बन डायऑक्साईड हा विषारी वायू शोषून घेतात . ऑक्सिजनची किंमत आपल्याला दवाखान्यात गेल्यावर समजते पण जे झाड आपल्याला आयष्यभर मोफत ऑक्सिजन देते त्याची किंमत आपल्याला समजली पाहिजे . वृक्षतोड केल्यामुळे  प्राणवायूचे प्रमाण कमी झाले आणि  हवेतील कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण वाढले त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढले.त्याचे दुष्परिणाम आपल्यावर  होत आहेत .पर्यावरण संवर्धन व प्रदूषण रोखण्यासाठी  शासन वृक्षलागवड कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करत आहे.हा वृक्षलागवड कार्यक्रम फक्त शासनापुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक माणसाचा झाला पाहिजे .प्रत्येकाने अनेक झाडे लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे .कारण झाड आहे तर आपण आहे हा विचार सर्व माणसांमध्ये रुजला पाहिजे .आपल्या जगण्यासाठी  झाडांचे जगणे खूप महत्वाचे आहे .म्हणून शाळेतून विद्यार्थ्यांमार्फत बियांचा संग्रह करून  बीजगोळे ,झाडांची रोपे तयार करून वृक्षारोपन व  वृक्षसंवर्धन हा उपक्रम आपल्याला राबविता येईल  .कोणत्याही कार्यक्रमात आपण यासाठी झाडाचे रोप भेट दिले पाहिजे .अनेक फळे आपण खाते त्यावेळी त्या बियांचा वृक्षारोपणासाठी संग्रह केला पाहिजे.आमच्या गितेवाडी शाळेत वर्षभर कोणत्याही कार्यक्रमात झाडाचे रोप भेट म्हणून देण्यात येते. शाळेत  झाडाचे रोप भेट देऊन वाढदिवस साजरे केले जातात .प्रत्येक विद्यार्थी प्रतिवर्षी किमान पाच ते वीस झाडे  शेतात ,घराजवळ लावून त्यांचे संगोपन करतात. झाडांचे महत्व त्यांना समजल्यामुळे झाडांशी त्यांनी मैत्री केली आहे .वृक्षारोपन व वृक्षसंवर्धनमुळे शाळेतील वातावरण निसर्गरम्य व आनंददायी झाले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना  शाळा सुटली तरी घरी जाऊ वाटत नाही .घरापेक्षा मुलांना शाळा जास्त आवडते .गावाला शाळेचा व शाळेला गावाचा खूप अभिमान आहे .तसेच हवेचे प्रदूषण थांबविण्यासाठी सर्वांनी प्रदूषणमुक्त सण समारंभ आनंदाने  साजरे करणे गरजेचे आहे .आमच्या शाळेतील विद्यार्थी  आनंदाने प्रदूषणमुक्त संण समारंभ साजरे करतात .त्यांच्यामध्ये तसे मूल्य रुजविली आहेत.
हवेनंतर माणसाची दुसरी महत्त्वाची गरज म्हणजे पाणी  .पाण्याला जीवन असेही म्हणतात .म्हणून हे पाणी शुद्ध असले पाहिजे असे सर्वांनाच वाटते .कारखान्याचे दूषित पाणी  ,गावातील व शहरातील 
,दूषित सांडपाणी नदीत सोडले जाते ,नदीच्या पाण्यात कपडे धुणे ,जनावरे धुणे ,गाड्या धुणे ,पाण्यात कचरा टाकणे ,,,,,अशा अनेक कारणाने हे पाणी आपण दूषित होऊन प्रदूषण होते.दूषित पाण्यामुळे आपल्याला व सजीवांना विविध प्रकारचे आजार होतात . अनेक जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात.नदीचे पाणी उगमाजवळ खूप  स्वच्छ असते आणि मानवी वस्तीत आल्यावर ते पाणी दूषित का होते? याचा आपण विचार केला पाहिजे .दूषित पाणी नदीत न सोडता उपाययोजना  करून बंदिस्त  शोषखड्ड्यात सोडले पाहिजे .शोषखड्ड्याभोवती झाडे लावली पाहिजे म्हणजे त्याचा विनियोग होईल. कचऱ्याचे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून त्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे . पाण्यानंतर सजीवांची गरज अन्न आहे.हे अन्न दूषित होण्यामागे माणूस कारणीभूत आहे.अनेकवेळा आपण म्हणतो अन्नात भेसळ आहे .ही भेसळ कोण करतो माणूसच ना .ही भेसळ अन्न व इतर पदार्थांची होते .तसेच  शेतात अनेक प्रकारची पिके घेतली जातात त्यावर कीटकनाशकांची  जास्त फवारणी  केली जाते ,रासानिक खते जास्त प्रमाणात वापरली जातात त्यामुळे  जमीन नापीक होते .तसेच दूषित पाण्यामुळेही जमीन नापीक होते .कीटकनाशक फवारणी व रासानिक खाते वापरलेले अन्न आरोग्यास चांगले असते का हा विचार आपण केला पाहिजे .दूषित व भेसळ अन्नामुळे विविध आजार होतात .त्यामुळे सेंद्रिय शेतीचे महत्व सांगून सेंद्रिय खतांचा पिकांसाठी वापर केला पाहिजे. यासाठी  शाळेत आपल्याला परसबाग तयार करून  सेंद्रिय भाजीपाला लागवड करून विद्यार्थ्यांना सेंद्रीय  शेतीचा  प्रत्यक्ष अनुभव देता येईल.तसे मूल्य त्यांच्यामध्ये रुजवता येईल .तसेच  प्लॅस्टिक मुळेही प्रदूषण होते .प्लॅस्टिकच्या विघटनास अनेक कालावधी  लागतो .प्लॅस्टिक पिशव्या न वापरता कापडी किंवा पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर आपण  केला पाहिजे .कारण प्लॅस्टिक पिशवीत कचरा भरून तो कचराकुंडीत टाकला तर मुके प्राणी ते खाऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो कारण त्या कचऱ्यात प्लॅस्टिक ,फुटक्या काचा वगैरे कचरा असू शकतो .आपल्या परिसरात क्षेत्रभेट आयोजित करून त्यामधून पाणी प्रदूषण ,अन्न प्रदूषण रोखण्यासाठी अनुभव विद्यार्थ्यांना देता येतील.निसर्ग माणसाशिवाय राहू शकतो पण माणूस निसर्गाशिवाय राहू शकत नाही .म्हणून आपल्याला निरोगी व आनंददायी  जीवन जगण्यासाठी  निसर्गाचे म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असून ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

लेखक
तुकाराम तुळशिराम अडसूळ
     मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर 
मो.७५८८१६८९४८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग साठी नमुना माहिती

 *मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*  *जुन महिना*---------------- 1) SMC मिटिंग आयोजन 25/6 2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन. 3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन 4) Student pramotion करणे. 5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे. 6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे. 7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे. 8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी. 9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम  10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड 11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे. 12) Staff Attach-deteach करणे. 13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6 14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ 15) Student Request पाठविणे व coinfirm करणे. 16)शा.पो.आ. करारनामा करणे. 17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. 18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे. *जुलै महिना*---------------- 1) माता-पालक संघ सभा 2) सरल st. request-coinfirm पाठविणे. 3) मीना राजु मंच सभा 4) SMC मिटिंग 5) कथाकथन स्पर्धा आयोजन 6) शा.पो.आ.सभा 7) दिंडी उपक्रम आयोजन 8) पालक सभा आयोजन 9) आदर्श परि...

SQAAF माहिती

*SQAAP अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन*  मानक 1-  मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो  मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय  मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर  मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो  मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग  मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो  मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो  मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही  माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो मानक 13- प्राथमिक...

G 20 Summit विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर

G 20 Summit विषयावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर येथे आमच्या शाळेत राबवित असलेल्या निरंतर वाचन उपक्रम बाबत ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे सादरीकरण संगमनेर DIET प्राचार्य मा.भगवान खारके साहेब, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय अशोक कडूस साहेब , जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्कर पाटील साहेब यांचे समोर सादरीकरण करताना एक आनंदाचा क्षण. G 20 Summit हा उपक्रम भारतासह जगातील 20 देशात राबविला जात आहे, यावर्षी या उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे, दरवर्षी दुसऱ्या देशाकडे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. या कार्यशाळेसाठी पुढाकार घेणारे संगमनेर DIET प्राचार्य आदरणीय भगवान खारके साहेब व सर्व डाएट स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏