🌸 प्रदूषण 🌸
गरज हवेची जीवनाला
कळणार कधी रे मानसाला
प्रदूषण करी हवेचे
विकार होई श्वसनाचे .
प्रदूषणमुक्त सण साजरे
आरोग्य माणसा गोजिरे
धूर हवेतील बंद करू
शुद्ध हवा होई सुरू .
पाणी हे जीवन
करा त्याचे रक्षण
होईल प्रदूषण पाण्याचे
आरोग्य बिघडेल माणसांचे
स्वच्छ पाणी शुद्ध पाणी
होणार नाही आपली हानी
थांबवू प्रदूषण पाण्याचे
समृद्ध जीवन सजीवांचे .
तुकाराम तुळशिराम अडसूळ
पर्यावरणप्रेमी उपक्रमशील शिक्षक अहमदनगर
मो ७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा