माणसांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान
_________________________
जगात अनेक दिवसांचे महत्व अलग आहे .परंतु १४ जून हा दिवस संपूर्ण जगात जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो . रक्तदान केल्यामुळे अनेक माणसांचे प्राण वाचतात म्हणून रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान असे म्हणतात . सन २००४ पासून जागतिक आरोग्य संघटना १४ जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करते .त्यामुळे संपूर्ण जगामध्ये हा दिवस रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १४ जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो.ऑस्ट्रीया देशातील शास्त्रज्ञ डॉ.कार्ल लँड स्टेनर यांनी ए.बी .ओ .या रक्तगटांचा यशस्वीपणे शोध लावला .त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला .त्यांच्या जन्मदिनानिमित हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो . समाजामध्ये अनेक व्यक्तींना अनेक कारणांमुळे रक्ताची गरज भासते .अपघात ,रक्तश्राव ,प्रसवकाळ ,शस्रक्रिया ,कुपोषण ,,,,अशा प्रसंगी रक्ताची गरज भासते .आज जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित झाले .अनेक शोध लागले परंतु कृत्रिमरीत्या रक्त तयार करण्याचा शोध लागलेला नाही किंवा कृत्रिमरीत्या रक्त तयार केले जात नाही .आपण जर एकमेकांना रक्तदान केले नसते तर माणसांचे प्राण वाचले असते का ? म्हणूनच या दिवसाला खूप महत्व आहे . रक्तदान चळवळ वाढण्यासाठी समाजात अनेक स्वयंसेवी संस्था व सामाजिक संस्था कार्यरत आहेत .अशा अनेक संस्थांच्या वतीने अनेकवेळा रक्तदान शिबिरे आयोजित केल्याचे आपण पाहतो .रक्तदानास हातभार लावण्यासाठी अनेक रक्तपेढ्या कार्य करत आहेत .रक्तदानाची किंमत आपल्याला ज्यावेळी दवाखान्यात जातो तेथे त्यावेळी डॉक्टर आपल्याला रक्ताची गरज लागेल असे सांगतात मग आपली रक्त आणण्यासाठी धावपळ होते मग आपल्याला रक्तदानाचे महत्व खऱ्या अर्थाने समजते .म्हणून अनेक संस्था जरी रक्तदानाचे कार्य करीत असल्या तरी आपण रक्तदान शिबिर किंवा रक्तदान घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे .रक्तदान कमी प्रमाणात आहे ते प्रमाण वाढणे गरजेचे आहे. म्हणून आपण समाजात रक्तदानाबाबत जनजागृती केली पाहिजे .रक्तदान करणारी व्यक्ती ही निरोगी असावी लागते .रक्तदान करण्यापूर्वी त्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करावी लागते .विविध प्रकारचे गंभीर आजार असणारी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही .रक्तदान केल्याने रक्त पुन्हा वाढू लागते .रक्तदान करताना किंवा रक्तदान केल्यावर रक्तदात्याला कोणताही त्रास होत नाही .रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला क्षयरोग ,मलेरिया ,मधुमेह ,हिपॅटा यटीस ,कॅन्सर ,एड्स ,,,असे आजार नसावेत .
रक्तदान करणारी व्यक्ती निर्व्यसनी असावी .रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वय सुमारे १८ वर्ष ते ६० वर्ष असावे लागते .रक्तदात्याचे वजन सुमारे ४८ किलो पेक्षा जास्त असावे लागते .रक्तदात्याची वर्षभरात कोणतीही शस्रक्रिया झालेली नसावी .
रक्तदात्याने तीन महिने आधी रक्तदान केलेले नसावे .उपाशीपोटी खाऊन झाल्यावर अर्ध्या तासांपर्यंत रक्तदान करू नये .तसेच रक्तदात्याची इतर आजाराची तपासणी केली जाते .
सर्व माणसांमध्ये रक्तांचा एकच रंग म्हणजे लाल रंग असतो .
रक्तदानासाठी पाचे ते दहा मिनिटे लागतात .रक्त आपल्या शरीरात संतुलन राखण्याचे महत्वाचे कार्य करते .जर शरीरातील रक्त कमी झाले तर ते आपल्या शरीराला घातक असते .रक्त कमी झाल्याने अशक्तपणा येतो , थकवा जाणवतो ,दम लागतो .डायबिटीस आजार हा रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढल्यामुळे होतो .म्हणून त्याबाबत खुप दक्षता घ्यावी लागते .तंदुरुस्त असलेली व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते . रक्त ए. बी.ओ.एबी .असे चार प्रकारचे असते.
रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी अनेक घरगुती उपाय सांगितले गेले आहेत.रक्त वाढण्यासाठी मोड आलेली कडधान्ये यांचा आहारात समावेश करणे .बिट खाल्ल्याने रक्त वाढते .गूळ व शेंगदाणे खाल्ल्याने रक्त वाढते . एक ग्लास सफरचंदचा ज्यूस घेतल्याने रक्त वाढते.टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळे रक्त वाढते .
आज रक्तदान ही चळवळ आणखी गतिमान होणे काळाची गरज आहे .वेगवेगळे सामूहिक समारंभ आपण साजरे करतो त्यावेळी या सामूहिक समारंभात समाजाच्या विकासासाठी असे रक्तदान शिबिर आयोजित केले पाहिजे .रक्तदान ही चळवळ सर्वांची झाली पाहिजे .त्यासाठी समाजात मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन जनजागृती करणे गरजेचे आहे .समाजात अनेक संस्था ,व्यक्ती अशा कार्यासाठी पुढाकार घेत आहेत .रक्तदान शिबिर हे आपल्या प्रत्येकासाठी भावी काळासाठी नियोजन आहे हा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे व त्यानुसार कृती करणे गरजेचे आहे .
आज आपण काहीजण असा विचार करतो की जाऊ द्या मला काय रक्ताची गरज लागणार नाही .त्यामुळे माझा आणि रक्तदानाचा काय संबंध असे म्हणून चालेल का ?कारण आपला प्रत्येकाचा भविष्यकाळ प्रत्येकाला माहीत नसतो. म्हणून प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे जरी मला भविष्यात रक्त लागले नाही तरी ते रक्त माझ्या एखाद्या बंधू भगिणीस नक्की उपयोगी पडेल .ज्यावेळी एखाद्या रुग्णास अर्जंट रक्ताची गरज असते त्यावेळी त्या कुटुंबातील माणसांची काय परिस्थिती होत असते हे त्या कुटुंबालाच माहिती असते .म्हणून रक्तदानाची मानवता जपली पाहिजे .जरी एखाद्या व्यक्तीस रक्तदान करता येत नसेल तर त्यांनी आपल्या जवळच्या माणसांमध्ये रक्तदानाबद्दल जनजागृती केली पाहिजे . तर जे निरोगी आहेत त्यांनी वेळोवेळी रक्तदान केले पाहिजे कारण आपल्या रक्तदानामुळे कोणाचे तरी अनमोल प्राण वाचणार आहेत .
चला तर मग मानवता जपण्यासाठी तसेच माणसांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान बाबत जनजागृती करू आणि रक्तदान करू या .
लेखक
तुकाराम अडसूळ
उपक्रमशील शिक्षक
अहमदनगर
मो.७५८८१६८९४८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा