वृक्षारोपनासाठी ग्रामस्थांना विविध झाडांची रोपे वाटप ,
शाळेचा उपक्रम झाला गावाचा उपक्रम
अहमदनगर--पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील पर्यावरणप्रेमी शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घेऊन गितेवाडी येथील विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ यांना वृक्षारोपणासाठी विविध झाडांची रोपे घरोघरी जाऊन वाटप केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत .शाळा बंद असल्या तरी गितेवाडी येथील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण चालू आहे.या शिक्षणाबरोबर वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन हा उपक्रम नेहमी यशस्वीपणे राबविला जात आहे .त्यासाठी अनेक कुटुंबाला पाच विविध प्रकारच्या झाडांची रोपे वाटप केली आहेत .उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ हे गितेवाडी येथील शाळेत जून २०१८ पासून बदलीने हजर झाल्यापासून शिक्षणातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम समाजहितासाठी नेहमी राबवितात.त्यासाठी ते दोन वर्षांपासून शाळेतील व गावातील सर्व विद्यार्थी ग्रामस्थ ,पालक यांच्या मध्ये वृक्षारोपन ,पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत जनजागृती करतात . त्यांना वृक्षारोपनासाठी दरवर्षी सुमारे दीड ते दोन हजार रोपे वाटून त्यांचे वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन करून घेतात. त्याबाबत वेळोवेळी आढावा घेतात .ते शाळेत राबवित असलेला हा पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हा नवोपक्रम संपूर्ण गावाचा झाला आहे.विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी या नवोपक्रमातून पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण हे समाजहिताचे व राष्ट्रहिताचे मूल्य यशस्वीपणे रुजविले आहे.विद्यार्थी वर्षभर विविध प्रसंगी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करतात. त्यांनी झाडांशी व निसर्गाशी मैत्री केली आहे . या नवोपक्रमामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यामध्ये योग्य परिवर्तन झाले आहे .ग्रामस्थ ,पालक हे वेळोवेळी वृक्षारोपन करून वृक्षसंवर्धन करतात.तुकाराम अडसूळ यांच्या या पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण कार्याबद्दल अधिकारी ,पालक व ग्रामस्थ नेहमी अभिनंदन करतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा