विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहण्यासाठी वर्क /लर्निंग फ्रॉम होम नावीन्यपूर्ण उपयुक्त उपक्रम
कोरोना विषाणूचा (व्हायरस) प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळांना सुट्ट्या दिल्या नंतर लॉक डाऊन केले .शासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्कृष्टपणे उपाययोजना करत आहे .सुट्टीच्या काळात घरात राहून आपल्याला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सोशल मिडिया द्वारे प्रयत्न करता येतात हे या वर्क /लर्निंग फ्रॉम होममूळे अनेक शिक्षकांना समजले व चांगला अनुभव येत आहे .विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ,
विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहण्यासाठी ,शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जिल्ह्याचे उपक्रमशील शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्क /लर्निंग फ्रॉम होम हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सुरू करण्यात आला .शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी वर्क /लर्निंग फ्रॉम होमचे महत्व सोशल मिडियाद्वारे शिक्षक ,अधिकारी यांना पटवून दिले .त्यासाठी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्ह्यातील विविध उपक्रमशील शिक्षक आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधून सविस्तर चर्चा करून या उपक्रमाचा आढावा घेतला आहे .यामध्ये राज्याचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर ,उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे , यांचेसह अनेक अधिकारी व आम्ही अनेक शिक्षक या चर्चेत सहभागी झाले होतो .
हा उपक्रम गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यात उत्कृष्ट नियोजन करून सोशल मिडियाद्वारे सर्वांना वर्क फ्रॉम होमचे महत्व पटवून देऊन आपापल्या तालुक्यात यशस्वीपणे सर्वांच्या सहकार्याने सुरू केला .
यामध्ये अनेक शाळांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध शैक्षणिक अँप डावूनलोड करून दिले आहेत .या अँपचा वापर प्रभावीपणे वर्क फ्रॉम होम मध्ये केला जात आहे .
शिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी यांनी आवाहन केल्यानुसार प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक पालकांचे व्हाट्सअप ग्रुप शिक्षकांनी तयार करून त्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी वर्क /लर्निंग फ्रॉम अभ्यास नियमितपणे दिला जातो .यामध्ये सर्व विषयांचा समावेश आहे. उदा -मराठी विषयात समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द ,कथा वाचन,कथा लेखन ,गोष्टीची पुस्तके वाचन ,निबंध लेखन ,लिंकवरून चाचणी प्रश्नपत्रिका सोडवणे ,वाक्प्रचार वाचन लेखन ,जोडाक्षरे वाचन लेखन ,कठीण शब्द वाचन लेखन , शब्द डोंगर वाचन लेखन ,शुद्धलेखन ,व्याकरण वर आधारित स्वाध्याय ,,,,,प्रमाणे
गणित विषयाचे पाढे पाठांतर ,संख्या अंकी अक्षरी लेखन वाचन ,बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार यांवरील विविध उदाहरणे ,,,,,यापमाणे विविध विषयांचा अभ्यास देन्यात आला . .तसेच समान्यज्ञानावर आधारित रोज पाच ते दहा प्रश्न ,ऑनलाइन किंवा लिंक देऊन त्यावरून चाचणी प्रश्नपत्रिका सोडवणे . असा विविध प्रकारचा वर्क /लर्निंग फ्रॉम देण्यात आला .तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी नमुनादाखल
पोस्ट केलेला वर्क/लर्निंग फ्रॉम होम केंद्रप्रमुख यांनी केंद्राच्या ग्रुपवर नियमित पोस्ट केला आहे.तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार तालुक्यातील अनेक उपक्रमशील शिक्षक विद्यार्थ्यांना वर्क फ्रॉम होम साठी स्वतः अभ्यास ,स्वाध्याय तयार केला आहे . त्यांचाही उपयोग गटशिक्षणाधिकारी यांनी इतर शिक्षकांना मिळवून दिला आहे . हा वर्क /लर्निंग फ्रॉम होम आम्ही नियमितपणे शिक्षक पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर पोस्ट करून त्याबाबत नियमित आढावा घेतला आहे . वर्क/लर्निंग फ्रॉम होम साठी पालक व विद्यार्थी यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे . विद्यार्थी नियमित अभ्यास करतात असे दिसून आले आहे .
तसेच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे कोरोना विषाणूबाबत कोणती दक्षता घेतली पाहिजे याबाबत पालक शिक्षक व्हाट्सअप ग्रुपमधून वेळोवेळी विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये जनजागृती करण्याची संधी शिक्षकांना मिळाली आहे .विद्यार्थी व पालक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घेतात .सोशल मिडीयाचा सदुपयोग कसा करावा हे विद्यार्थ्यांना व पालकांना या वर्क/लर्निंग फ्रॉम होम या उपक्रमातून समजले आहे .पालकही विद्यार्थ्यांच्या वर्क फ्रॉम होम अभ्यासामध्ये सहभागी झाले आहे .पालकांनी वर्क/लर्निंग फ्रॉम होम या उपक्रमाबद्दल खूप समाधान व्यक्त केले आहे . लॉकडाऊन किंवा ज्यावेळी शाळेला सुट्ट्या असतील त्यावेळी वर्क /लर्निंग फ्रॉम होम हा उपक्रम आपल्या या विद्यार्थ्यांच्या जीवन शिक्षणासाठी अत्यंत मार्गदर्शक व उपयुक्त आहे .
शब्दांकन
तुकाराम अडसूळ
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा