उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी शिक्षणासाठी घेतले चार विद्यार्थी दत्तक
अहमदनगर-जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी शिक्षणासाठी त्यांच्या गितेवाडी येथील दत्तू गांगुर्डे यांच्या कुटुंबातील चार मुले प्राथमिक शिक्षणासाठी दत्तक घेतले आहेत .गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता चौथी पर्यंत वर्ग असून हे चार विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.या कुटुंबाची अर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे.ते मजुरी करून आपले कुटुंब चालवतात .या मुलांना शिक्षणासाठी अनेक प्रकारच्या आवश्यक सुविधा नसतात त्यामुळे त्यांच्या शिक्षणात वेळोवेळी अडचण निर्माण होते .ओम दत्तू गांगुर्डे इयत्ता पहिली ,राहुल दत्तू गांगुर्डे इयत्ता तिसरी ,महेश दत्तू गांगुर्डे इयत्ता चौथी ,अक्षदा दत्तू गांगुर्डे इयत्ता चौथी अशी ही चार मुले शिक्षण घेत आहेत.या मुलांच्या प्राथमिक शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून शिक्षक तुकाराम अडसूळ यांनी या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.त्यांच्या पालकांशी चर्चा करून त्यांना शिक्षणासाठी तुकाराम अडसूळ यांनी दप्तर ,वह्या ,कंपासपेटी ,पेन ,पेन्सिल ,रंगपेटी ,उजळणी ,राजापाटी ,पाटीपेन्सिल बॉक्स ,पॅड ,असे अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य दिले आहे.तसेच त्यांना वेळोवेळी शिक्षणात ज्या ज्या शैक्षणिक वस्तू लागतील त्या वस्तू वेळोवेळी देणार आहे.तसेच शिक्षणात जेथे त्यांना आर्थिक अडचण येईल त्यासाठी वेळोवेळी सर्व प्रकारचा खर्च शिक्षक तुकाराम अडसूळ हे करणार आहेत.या गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन मदत केल्याने या मुलांना व त्यांच्या आई वडिलांना खूप आनंद झाला आहे. या वेगळ्या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल शिक्षक तुकाराम अडसूळ यांचे गावातील सरपंच ,उपसरपंच ,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत सदस्य ,पालक , ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.या शाळेतील मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ व त्यांचे सहकारी शिक्षक नवनाथ आंधळे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा