पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण जनजागृती मध्ये शिक्षकांचे योगदन
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
माणसाने निसर्गावर मात केली आणि मानवी जीवन सुधारले हे जरी खरे असले तरी एकीकडे आमची प्रगती झाली ,सुधारणा झाल्या परंतु त्याचवेळी दुसरीकडे आम्हाला फार मोठ्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली .ते संकट संपूर्ण जगापुढे आहे .
हे संकट म्हणजे प्रदूषण होय .आज माणूस सुधारला परंतु पर्यावरणाचे संतुलन बिघडले .त्यामुळे प्रदूषण वाढले व हे प्रदूषणाचे महाभयंकर संकट आमच्या सर्वांच्या दारात येवून उभे राहिले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .म्हणून आज या पृथ्वी वरील माणसे व इतर सजीव वाचवायचे असेल तर पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे .पर्यावरण संवर्धन करणे व प्रदूषण निवारण करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
पर्यावरण व प्रदूषण हे शब्द जरी लहान असले तरी त्यांची व्याप्ती फार मोठी आहे .पर्यावरण म्हणजे सजीवांना जगण्यासाठी सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असणे .अशी सरळ व साधी व्याख्या पर्यावरणाची आपल्याला करता येते.
सर्वात प्राचीन कला वारसा लाभलेला आपला देश आहे.देशातील विविध कलांचे संवर्धन आणि देश हिताचे सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था आपल्या देशात कार्यरत आहेत.त्यांपैकी निशंक भारत ही संस्था देशहितासाठी संपूर्ण देशभर विविध उपक्रमांचे आयोजन करते.या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक शिक्षक देशहिताचे विविध सामाजिक व राष्ट्रीय कार्य करत असतो.महाराष्ट्रात
सर्वात मोठ्या दिंडीपैकी संत ज्ञानेश्वर माऊली आळंदी ही महान दिंडी ,पालखी आहे.
या दिंडी , पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ( ए. टी.एम.)परिवारातील अनेक उपक्रमशील शिक्षक बंधू भगिनी यांनी कृतिशील शिक्षक परिवाराचे संयोजक विक्रम अडसूळ आणि निशंक भारत या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एन.सी. ई.आर.टी. नवी दिल्ली कला विभाग प्रमुख डॉ .पवन सुधीर ,राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक ए.टी.एम.परिवारातील अनेक शिक्षक व निशंक चे राज्याचे पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी २०१९ मध्ये एका रविवारी दिवसभर पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत उपक्रम राबवून लोकांमध्ये जनजागृती केली . जेजुरीला प्लास्टिक वापराबाबत संत ज्ञानेश्वर दिंडी आळंदी आणि इतर अनेक दिंडीतील भाविक भक्तांना प्लास्टिक मुळे होनारे प्रदूषण व दुष्परिणाम याबाबत दिंडीतील वारकरी यांचे प्रबोधन केले . पूर्वीच्या मानवी जीवनात वापरात असणाऱ्या वस्तू आणि सध्याच्या जीवनात माणूस वापरत असलेल्या वस्तू यामधील फरक त्यांना सांगून सध्याच्या जीवनातील प्लॅस्टिक मुळे होणारे प्रदुषण व त्यामुळे सर्व सजीवांना होणारे दुष्परिणाम समजावून देवून दिंडीतील भाविकांचे पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी जनजागृती करून मत परिवर्तन केले.
त्यावेळी जेजुरीच्या श्री. मार्तंड देवस्थान व नगर पालिका आणि निशंक भारत यांनी स्टेज व माईक व्यवस्था उपलब्ध करून संपूर्ण सहकार्य केले आणि यावेळी अनेक वारकऱ्यांनी प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिक साहित्य की ज्यामुळे प्रदूषण होते असे काहीही आम्ही वापरणार नाही असे ठामपणे सांगितले .प्रदूषणामुळे मानवाच्या व सजीवांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कोणतेही साहित्य अथवा वस्तू कधीही वापरणार नाही असे परिवर्तन त्यांच्यात केले.यावेळी पर्यावरणावर आधारित विविध प्रकारचे भारुड, विविध कलाकृती , भावगीते, वारी नृत्य ,फुगडी नृत्य , या कलागुणांचा आविष्कार अनेक शिक्षकांनी वारकऱ्यांसमोर उत्कृष्टपणे सादर केला. शिवाय प्लॅस्टिक का टाळावे? प्लास्टिकला पर्याय काय असावे याची माहिती देखील त्यांना सविस्तरपणे देऊन जनजागृती केली.
यापुढे आम्ही प्लास्टिकच्या वस्तू न वापरता जास्तीत जास्त टिकाऊ पर्यावरण पोषक टिकाऊ साहित्य आम्ही वापरू असे अनेक दिंडीमधील वारकरी यांनी सांगितले .
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्या कशा वापरता येईल याची माहिती आम्ही दिंडीतील अनेक वारकरी यांना देवून त्यांच्यामध्ये तसे परिवर्तन केले.
आनेक वारकरी यांच्या जवळ कापडी पिशव्या होत्या त्यांचे फुल देवून आम्ही सर्व शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले.
तसेच आम्ही शिक्षकांनी जेजुरी येथील विविध व्यावसायिक व दुकानदार यांच्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या , प्लॅस्टिक वस्तू न वापरणेबाबत जनजागृती केली.त्यांनाही प्लॅस्टिक वापराबाबत दुष्परिणाम पटवून देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती केली.
त्यांनीही प्लॅस्टिक पिशव्या आम्ही वापरणार नाही व त्यांची विक्री करणार नाही असे विश्वासाने सांगितले .
यावेळी केंद्रशासनाच्या एन. सी.ई. आर .टी .नवी दिल्ली येथील विभाग प्रमुख श्रीमती डॉ. पवन सुधीर मॅडम आणि निशंक भारत चे कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन करून त्यांनीही आमच्या बरोबर प्लॅस्टिक विरोधी जनजागृती केली.या महान राष्ट्रीय व सामाजिक कार्यात केंद्रशासनाच्या
एन.सी.आर.टी.नवी दिल्ली विभाग प्रमुख डॉ.पवन सुधीर ,
उपक्रमशील शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त
विक्रम अडसूळ ,
नारायण मंगलारम ,
, तुकाराम अडसूळ ,संजय खाडे ,संजय जगताप ,
भरत काळे ,बबन थोरे ,श्रीनिवास एल्लाराम ,प्रतिभा लोखंडे , ज्योती कोहळे , सविता साळुंके , शोभा शेंडगे, बाळासाहेब कोपले ,सारिका बद्दे , विद्या मंगलारम , गीता एल्लाराम ,संजना चेमटे यांनी सक्रिय सहभागी होवून हे सामाजिक व राष्ट्रीय कार्य अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले.
.या सामाजिक व राष्ट्रीय कार्याबद्दल जेजुरी येथील अनेकांनी आम्हा शिक्षकांच्या या पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण उपक्रमाबद्दल सर्व सहभागी शिक्षकांचे व निशंक भारत टीमचे विशेष अभिनंदन केले .
तसेच पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण करण्यासाठी आम्ही शाळेतून विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांवर प्रदूषणमुक्त भारत निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे संस्कार करून तसे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले आहे.
लेखक
तुकाराम अडसूळ
पर्यावरणप्रेमी उपक्रमशील शिक्षक अहमदनगर
अहमदनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा