कोरोना काळातील माझे ऑनलाईन शिक्षण डिसेंबर२०१९ मध्ये चीनच्या वूहान प्रांतातून सुरू झालेला कोरोना आपल्या देशात आपल्या पर्यंत येईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.अखेर आपल्या राज्यात कोरोनाचा रुग्ण सापडला. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतरा मार्चपासून सुट्ट्या दिल्या नंतर लॉक डाऊन केले.शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण हे आम्ही दुसऱ्या दिवसापासून लगेच चालू केले.पालकांशी चर्चा करून लगेच त्यांचे व्हाट्सएप चे ग्रुप तयार केले.या ग्रुपच्या माध्यमातून सुरुवातीला हे ऑनलाईन शिक्षण चालू केले.ज्या पालकांकडे अँड्रॉईड फोन होते त्यांचा अभ्यास व्यवस्थितपणे सुरू असे पण ज्यांच्याकडे अँड्रॉईड फोन नव्हते त्यांना फोन करून अभ्यास दिला.असे आमचे ऑनलाईन शिक्षण सुरुवातीला सुरू झाले. मात्र जून पासून यामध्ये बदल करून प्रत्यक्ष ऑनलाईन अध्यापन करण्याचे ठरवले.त्यानुसार पुन्हा पालकांशी चर्चा करून त्यांना गुगल मीट हे अँप डाऊनलोड करून दिले.ज्यांच्या कडे अँड्रॉईड फोन नाही त्यांना आपल्या जवळ ,शेजारी राहत असलेल्या मुलांना कोरोनाबाबत योग्य ती दक्षता घेऊन मद...
शिक्षण संवाद हा ब्लाॅग शिक्षण व पर्यावरण या विषयावर आधारित आहे - तुकाराम अडसूळ