मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

स्वाध्याय उपक्रमात यशवंतनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग

स्वाध्याय उपक्रमात यशवंतनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग  ____________________________ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र वतीने आयोजित ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय उपक्रमात यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी कृतीशील सहभाग घेऊन स्वाध्याय सोडवतात.यामुळे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का होण्यासाठी  मदत झाली आहे .आठवड्यातून एकदा शनिवारी हा ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय येत असतो. यामध्ये भाषा ,गणित, विज्ञान या विषयांचा समावेश असतो. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न देऊन त्यासाठी चार पर्याय दिलेले असतात. या चार पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे त्या उत्तराचा पर्याय क्रमांकावर क्लिक करावे लागते .विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोरोना काळापासून म्हणजे नोव्हेंबर 2020 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी स्वाध्याय उपक्रम सुरू केला तेव्हापासून यशवंतनगर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती संजना चेमटे यांनी हा उपक्रम त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे राबविला .कोरोनाकाळात सर्व विद्यार्थ्या...
अलीकडील पोस्ट

बातमी

🇮🇳 *एस डब्ल्यु न्यूज* 🇮🇳 ----- - - - - -SWNEWS - - - - - ----- *निर्भिड निपःक्ष पत्रकारिता हीच जनतेची विश्वासार्हता* 💫✒️🚭++++++🚯✒️ *राज्याचे शिक्षणमंत्री , शिक्षण सचिव यांचे उपस्थितीत शिक्षिका संजना चेमटे यांचे वाचन उपक्रमाबद्दल सादरीकरण* एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क https://swnews.in/?p=6702 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻 विशेष प्रतिनिधी : महेश चव्हाण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी_प्रज्ञाशोध परीक्षेत यश

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे भारत Talant सर्च प्रमाणपत्र वाटप करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

आज शाळा व्यवस्थापन समिती सभेत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत चावडी वाचन, पायाभूत साक्षरता व गणन बाबत चर्चा

आज शाळा व्यवस्थापन समिती सभेत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत चावडी वाचन, पायाभूत साक्षरता , गणन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी शाळेतील विविध उपक्रमांचे अभिनंदन केले.

पर्यावरण संवर्धन उपक्रम

सध्या हवेचे तापमान वाढत आहे.हे जर असेच राहिले तर भविष्यकाळ किती अवघड असेल .हवेतील उष्णता कमी करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हा एक उपाय आहे.त्यासाठी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारभात झाडांची रोपे भेट देऊन प्रत्येकाने ही झाडे लावून संगोपन करणार असल्याचे सांगितले.

उन्हाळ्याच्या सुट्टीतही अभ्यास

उन्हाळा सुट्टीत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुढील इयत्तेची जुनी पुस्तके वाटप करण्यात आली. विद्यार्थी सुट्टीत पुढील वर्गातील विषयांचा अभ्यास करणार आहेत.

पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे भाषण

Search Search... बालशतकाची सुरुवात Published on April 29, 2025 ज्या नूतन बालशिक्षण संघाची मी एक सदस्य आहे तो संघ कै. गिजुभाई यांनी स्थापिला व वाढविला आहे. हा संघ गेली वीस वर्षे बालशिक्षणाचे आपले कार्य मोठ्या श्रद्धेने अविरत करीत आहे. संघाला त्यावेळी कोणाचीहि कसलीहि मदत नव्हती. राष्ट्रीय पुढाऱ्यांचे लक्ष त्याकडे गेले नव्हते. ज्या मुलांच्या शिक्षणाकरिता तो काढण्यांत आला त्यांच्या पालकांनाही त्याचेबद्दल काही आस्था नव्हती. आणि असे असूनहि आम्ही मात्र त्याचे कार्यात दंग झालो होतो. काही झाले तरी मागे फिरायचे नाही अशा नेटाने आम्ही पुढे जात होतो. नियतकालिकें, बाल मंदिर व अध्यापनवर्ग चालविले, परिषदा व पालकांच्या सभा भरविल्या, शहरांतल्या आणि खेड्यांतल्या मुलांच्या शिक्षणासंबंधी निरनिराळे प्रयोग केले व आणखीहि कितीतरी गोष्टी केल्या. हे सर्व करायला आम्हाला कोणी स्फूर्ती दिली, कोणी प्रवृत्त कले असे तुम्हाला वाटते ? ही स्फूर्ती आम्हांला बालकांपासून मिळाली, त्यानेच आम्हाला या कामी प्रवृत्त केले. बालकांचे ते कृतिमय जीवन, जीवनांतील संस्काराच्या प्रतिक्रिया म्हणून झालेल्या त्याच्या स्वयंस्फूर्त हालचाली, त...